रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये दिसतोय ऑस्टिओपोरोसिसचा धोका

रजोनिवृत्तीनंतर बऱ्याचदा महिलांना विविध आरोग्य समस्या निर्माण होतात त्यातली एक महत्त्वाची समस्या म्हणजे हाडांची झीज होणं. वैद्यकीय भाषेत याला ऑस्टियोपोरोसिस असं म्हणतात. हाडांच्या दुखण्यांकडे, कुरकुरण्याकडे पाळीनंतर होतंच असं म्हणून दुर्लक्ष केल्यास ऑस्टियोपोरोसिसचा (World Osteoporosis Day – 20 Oct) धोका वाढतोच. याशिवाय हार्मोनल बदलांमुळे रजोनिवृत्तीनंतरच्या काळात स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिस अधिक दिसून येत आहे. त्यामुळे पाळी थांबल्यावर महिलांनी स्वतःच्या आऱोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. रजोनिवृत्तीनंतर पहिल्या पाच वर्षांत 20% पर्यंत हाडांचे नुकसान होते असे म्हटले जाते. 

तज्ज्ञांचे मत 

सौजन्य – Freepik.com

तज्ज्ञांच्या मते, रजोनिवृत्तीनंतर पहिल्या पाच वर्षांत 20% पर्यंत हाडांचे नुकसान होते. यामुळे ऑस्टियोपेनिया (कमी हाडांची खनिज घनता) आणि ऑस्टिओपोरोसिस होऊ शकते, या दोन्हीमुळे हाडे फ्रॅक्चर (कमकुवत हाडे) होण्याचा धोका वाढतो. तरूणवयात आपली हाडं मजबूत असतात. पण वाढत्या वयाबरोबर हाडांची काही प्रमाणात झीज व्हायला लागते. ही हाडांची झीज 30 वर्षांपासून सुरू होते. तुम्ही रजोनिवृत्तीच्या जवळ येत असताना, तुमचे शरीर कमी एस्ट्रोजन तयार करू लागते, ज्यामुळे तुम्हाला हाड कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे रजोनिवृत्ताच्या टप्प्प्यावर असताना वेळीच डॉक्टरांच्या सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण तुमचा कौटुंबिक इतिहास व जीवनशैलीनंतर तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी डॉक्टर योग्य तो उपाय सुचवतील.

स्वतःच्या आरोग्याची नीट काळजी घेणं आवश्यक

सौजन्य – Freepik.com

चेंबूर येथील एसआरव्ही रूग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. ओंकार सदीगळे म्हणाले की, बर्‍याच स्त्रियांना प्रिस्क्रिप्शन उपचारांची आवश्यकता असते, विशेषत: ज्यांची हाडे फ्रॅक्चर झाली आहेत किंवा ज्यांना अनेक जोखीम घटक आहेत. याव्यतिरिक्त, हाडांचे पातळ होणे थांबवण्यासाठी, हाडांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करण्यासाठी स्वतःच्या आरोग्याची नीट काळजी घेणं आवश्यक आहे. याकरता दर वर्षातून एकदा जीवनसत्त्वाचे प्रमाण, थायरॉईड आणि पॅराथायरॉइड संप्रेरक यांसारख्या विशिष्ट रक्त चाचण्या करून घेणं गरजेचं आहे. कारण वेळीच निदान आणि उपचार झाल्यास हाडांची होणारी अतिरिक्त झीज टाळता येऊ शकते. जर तुम्हाला गंभीर ऑस्टियोपोरोसिस असेल, तर तुमचे डॉक्टर इंजेक्टेबल बोन बिल्डिंग अॅनाबॉलिक औषधांची शिफारस करू शकतात.

अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. ओम पाटील म्हणाले की, ऑस्टिपोरोसिसचा धोका टाळण्यासाठी डी3 जीवनसत्त्वाच्या पूर्ततेकडे लक्ष द्यायला हवं. हाडांचे आरोग्य सांभाळण्याचं काम डी3 जीवनसत्त्व करतं. शरीराला जर पुरेसं डी3 जीवनसत्त्व मिळालं नाहीतर हाडं आतड्यातून कॅल्शियम शोषून घेऊ शकत नाही. त्यामुळे डी जीवनसत्त्व शरीराला पुरेस मिळण्यासाठी कोवळ्या उन्हात फिरा. रजोनिवृत्तीनंतर हाडांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. ऑस्टिओपोरोसिससाठी संतुलन आणि हलक्या स्वरूपाचा व्यायाम करावा, कोणतेही जड वजन उचलू नयेत, संतुलित आहाराचे सेवन करा, धुम्रपान आणि मदयपानाचे सेवन करणं टाळा. रजोनिवृत्तीनंतर ऑस्टिओपोरोसिसचा धोका टाळण्यासाठी महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कॅल्शियमच्या गोळ्या घेतलं पाहिजे. याशिवाय वर्षातून एकदा हाडांचे स्क्रिनिंग करून घेणं आवश्यक आहे. यामुळे हाडांची झीज किती झाली आहे हे पाहून वेळीच यावर उपचार करता येतात. अशा स्थितीत हार्मोनल चाचणी करून घेतो किंवा एन्डोक्रोनॉलॉजिस्टची मदत घेतो. विशेषतः साठीनंतर हाडांची झीज होत असल्याने मणक्याचे फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. अशा स्थिती सिमेंट भरण्याची शस्त्रक्रिया केली. सिमेंट भरण्यामुळे हाडांमधील वेदना कमी होते.

Sugar Addiction चे नेमके संकेत काय आहेत, जाणून घ्या

विषाणूजन्य आजारांचे वाढते प्रमाण, सणासुदीच्या काळात चिंतेचे वातावरण

Period Smell: मासिक पाळीत येत असेल अधिक दुर्गंध तर टाळा या चुका

Leave a Comment