Chandra Grahan 2022: कोणत्या राशीवर काय होणार परिणाम

दिवाळीच्या वेळी नुकतेच खंडग्रास सूर्यग्रहण झाले. तर आता 8 नोव्हेंबर रोजी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्ष पौर्णिमेच्या तिथीला अर्थात देवदिवाळीदरम्यान चंद्रग्रहण (Lunar Eclipse) होणार आहे. या वर्षातील हे शेवटचे ग्रहण आहे. यावर्षी मे महिन्यात चंद्रग्रहण झाले होते. पण देवदिवाळीच्या दिवशी चंद्रग्रहण आल्याने ज्योतिषशास्त्रात याचे अधिक महत्त्व मानण्यात आले आहे. चंद्राचा प्रभाव हा पृथ्वीवर आणि राशींवर प्रत्यक्षपणे जाणवतो असं म्हटलं जातं. चंद्रग्रहण हे वृषभ राशीमध्ये (Taurus Zodiac) लागणार आहे. त्यामुळे कोणत्या राशीसाठी या ग्रहणाचा काय परिणाम होणार आहे, शुभ अशुभ परिणामाबाबत अधिक जाणून घेऊया. त्यापूर्वी चंद्रग्रहण कधी आहे आणि याचा काय कालावधी आहे समजून घ्या. 

चंद्रग्रहणाचा कालावधी 

Lunar Eclipse – Freepik.com

 8 नोव्हेंबर, 2022 रोजी चंद्रग्रहण होणार असून संध्याकाळी 5.32 मिनिट्सने याचा आरंभ होणार आहे आणि रात्री 7.27 वाजेपर्यंत हे चंद्रग्रहण राहील. चंद्रग्रहणाचा साधारण कालावधी हा 1 तास 95 मिनिट्स इतका असणार आहे. तर चंद्रग्रहणाचा सुतक काळ हा साधारण 9 तासांचा राहणार आहे. कोणत्याही ग्रहणाचे वेध हे साधारण नऊ तास आधी सुरू होतात. अर्थात या काळामध्ये कोणतेही चांगले काम करणे हे वर्ज्य मानण्यात येते. ग्रहण समाप्त झाल्यावर आंघोळ करून पूजा करून मग जेवावे असे सांगण्यात येते. 

या देशात दिसेल चंद्रग्रहण (A lunar eclipse will be seen in these countries)

देवदेवाळी दरम्यान होणारे हे चंद्रग्रहण भारत (India) आणि त्याशिवाय दक्षिण अमेरिका (South America), आशियाई द्वीप (Asia Islands), पूर्व आणि दक्षिण युरोपमधील देश (East and South Europe), ऑस्ट्रेलिया (Australia), पॅसिफिक अटलांटिक (Pacific Atlantic) and हिंदी महासागर (Hindi Mahasagar) या ठिकाणी दिसेल. 

चंद्रग्रहणाचा सर्व राशींवर काय होईल परिणाम (What will be the effect of lunar eclipse on all zodiac signs?)

Zodiac Signs – Freepik.com

ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा प्रत्येक राशीवर वेगवेगळा परिणाम होतो. तुमच्या राशीनुसार काय परिणाम होणार आहे ते घ्या जाणून 

मेषः 

मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक परिस्थितीत चढउताराचा सामना करावा लागू शकतो. तसंच संपत्तीची हानी होण्याचेही संकेत आहेत. या ग्रहणाचा वाईट परिणाम तुमच्या आरोग्यावरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्याकडे अधिक लक्ष द्या. 

वृषभः 

विद्यार्थ्यांसाठी हे चंद्रग्रहण आव्हानात्मक असणार आहे. कोणत्याही परीक्षेची तयारी करत असल्यास, तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यावे लागेल. कारण यामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. तसंच अभ्यासात तुमचे मन लागणार नाही. पैशाच्या बाबतीत या राशीच्या व्यक्तींना जास्त त्रास होणार नाही. भाग्यात पैसे मिळण्याची शक्यता आहे. तसंच धनप्राप्तीचे योग आहेत आणि तुमची आर्थिक बाजू अधिक मजबूत होईल. 

मिथुनः 

नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ शुभ आहे. तुम्हाला बढती मिळण्याचे योग आहेत. तसंच तुमच्या पगारात वाढ होण्याचीही शक्यता आहे. तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला नोकरीदेखील मिळेल. आर्थिक स्थिती बदलण्याची शक्यता आहे. तसंच तुमच्या आर्थिक समस्यांचे समाधान तुम्हाला या काळात नक्की मिळेल. तुमचे अडकलेले पैसेही मिळू शकतात. 

कर्कः 

कामासंबंधित जर एखादी समस्या उद्भवू शकते. तुम्हाला लहानसहान गोष्टीतही आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे. या दरम्यान मानसिक स्वरूपात तुम्हाला आधाराची गरज आहे. तुम्हाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल. तसंच तुमचे आरोग्यही तुम्हाला त्रासदायक ठरेल. अधिक तणावापासून दूर राहण्याची तुम्हाला गरज आहे. 

सिंहः 

वैवाहिक जीवनात तुम्हाला सुख प्राप्त होईल आणि वृद्धी मिळेल. तुमच्या जोडीदारासह तुमचे संबंध अधिक घट्ट होतील. रोमँटिक आयुष्यात स्थिरता प्राप्त होईल. जोडीदारासह तुमचे प्रेम आणि नाते अधिक घट्ट होण्याचा हा काळ आहे. जर तुम्ही अविवाहित असाल तर या दरम्यान तुम्हाला विवाहाचा प्रस्तावही येऊ शकतो. तुमचे लग्न ठरण्याची शक्यता आहे. 

कन्याः 

कौटुंबिक जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसंच तुमच्या जवळच्या व्यक्तींसह तुमचे संबंध बिघडू शकतात. यादरम्यान तुम्हाला मानसिक आधाराची गरज भासेल. नोकरदार वर्गाला त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. तसंच तुमच्या नोकरीत तुम्हाला बढती होण्याची शक्यता आहे. तुम्हाला एखादी नवी मिळकत वा वाहनाची खरेदी करायची असेल तर यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होऊ शकते. 

तूळः 

आर्थिक गोष्टीमध्ये तूळ राशीच्या व्यक्तींनी सांभाळून राहावे. घाईघाईत कोणताही पैशांसंबधित तुम्ही निर्णय घेऊ नका. याशिवाय तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे या काळात अत्यंत गरजेचे आहे. कोणताही बेजबाबदारपणा तुम्ही करू नका. चंद्रग्रहणाचा हा काळ तुमच्या आर्थिक परिस्थितीसाठी चांगला नाही हे लक्षात ठेवा.  

वृश्चिकः 

वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यावर चंद्रग्रहणाचा शुभ प्रभाव होणार आहे. तसंच संततीकडून तुम्हाला सुखप्राप्ती मिळणार आहे. तसंच तुमचे कामही चांगले चालू होईल. नोकरी मिळेल. तुम्ही मनात ज्या योजना आखल्या आहेत, त्या सर्व या काळात पूर्ण होतील आणि तुम्ही त्या पद्धतीने पुढे जाऊ शकता. 

धनुः 

या राशीच्या व्यक्तींना चंद्रग्रहणाच्या काळात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. तसंच नोकरीच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या वाणी आणि व्यवहाराकडे अधिक लक्ष द्या. उच्च अधिकाऱ्यांना कारणाशिवाय अहंकार आणि इतरांना त्रास देण्यापासून सावध पवित्रा घेण्याची गरज आहे. आपल्या सहकाऱ्यांशी चांगले वागण्याचा या काळात प्रयत्न करा आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला आहे. 

मकरः 

मकर राशीच्या व्यक्तींना चंद्रग्रहणाच्या काळात मोठा सन्मान मिळण्याची शक्यता आहे. तुमचे पदप्रतिष्ठा वाढून कामासंबंधित अधिक यश प्राप्त होईल. नोकरी अथवा व्यापार दोन्हीमध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल. तसंच एखादी महाग वस्तूही या काळात तुम्हाला मिळू शकते. 

कुंभः 

या राशीच्या अविवाहित व्यक्तींना त्यांच्या मनाप्रमाणे जोडीदार या काळात मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला प्रेमविवाह करायचा असेल तर तुमच्या मार्गात अडचण येत असल्यास, या काळात ती दूर होऊ शकते. आपल्या चांगल्या वाणी आणि व्यवहारामुळे तुम्ही लोकांची मनं आणि विश्वास जिंकू शकता. तुमच्यावरील जबाबदारी वाढू शकते आणि यासाठी तुम्ही आधीच तयार राहावे. 

मीनः 

आरोग्यासंबंधित तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः खाण्यापिण्याच्या बाबतीत अधिक लक्ष द्या. आर्थिक स्थिती ही ठीकठाक राहील. विचार न करता तुम्ही वाटेल तसे पैसे खर्च करू नका. भविष्यात आर्थिक संकट ओढावण्याची भीती आहे. त्यामुळे या काळात विचारपूर्वक तुम्ही पैसे खर्च करा. 

आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. एक माहिती या स्वरूप या लेखातून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाप्रमाणे ही माहिती देण्यात आली आहे. 

Leave a Comment