व्हाईट ब्रेड आणि ब्राऊन ब्रेडमध्ये काय आहे फरक, जाणून घ्या

घरात नेहमी कोणता ब्रेड आणायचा यावरून वाद होत असतीलच ना? काही जणांना वाटतं व्हाईट ब्रेड (White Bread) खाणे चांगले तर काही जणांना ब्राऊन ब्रेड (Brown Bread) खाणे चांगले वाटते. घरात काहीही नसेल तर नेहमीच ब्रेड उपयोगी ठरतो. पण या दोन्ही ब्रेडमध्ये नक्की फरक काय असतो हे तुम्हाला माहीत आहे का?  या दोन्ही ब्रेडचे केवळ रंगच वेगळे नाहीत तर यामध्ये फरकही आहे. यामधील नक्की काय फरक आहे आणि कोणता ब्रेड अधिक चांगला हे आपण जाणून घेऊया. 

व्हाईट ब्रेड (White Bread)

White Bread – Freepik.com

व्हाईट ब्रेड सर्वाधिक खाल्ला जातो. अगदी सकाळच्या चहासह कोणत्याही वेळी हा ब्रेड खाता येतो. काहीच खायला नसेल तेव्हा ब्रेडच्या कोणत्याही रेसिपी बनवून खाल्लं जातं, मग यामध्ये ब्रेड बटर असो, फोडणीचा ब्रेड असो वा सँडविच असो. हे सर्व बनवणे अतिशय सोपं आहे. 

व्हाईट ब्रेड हा गव्हापासून बनविण्यात येतो. पण हा बनविण्यासाठी जो गहू वापरला जातो तो चाळून घेतलेला असतो. यामधून गव्हाचे बीज हटविण्यात येतात. या कारणामुळेच हा ब्रेड पांढऱ्या रंगाचा असतो. ब्राऊन ब्रेडच्या तुलनेमध्ये व्हाईट ब्रेडमध्ये पोषक तत्व हे कमी असतात. तसंच या ब्रेडमध्ये साखरेचे प्रमाणही अधिक असते आणि त्यामुळे कॅलरीही वाढते. म्हणूनच व्हाईट ब्रेडपेक्षा ब्राऊन ब्रेडला अधिक महत्त्व देण्यात येते. 

ब्राऊन ब्रेड (Brown Bread)

Brown Bread – Freepik.com

बऱ्याच व्यक्तींना पांढऱ्या ब्रेडपेक्षा ब्राऊन ब्रेड अधिक आवडतो. हा ब्रेड व्हाईट ब्रेडच्या तुलनेत अधिक स्वादिष्ट असतो आणि याला एक वेगळी चव असते. हा ब्रेड नुसतादेखील खाता येतो. यामध्ये मिठाचे प्रमाण अधिक असते. तसंच ब्राऊन ब्रेड ज्या पिठापासून बनविण्यात येतो, त्यामध्ये कोणतीही काटछाट करण्यात येत नाही. यामध्ये गव्हातील सर्व पोषक तत्व आढळतात. तसंच याचा स्वाद व्हाईट ब्रेडच्या तुलनेत अधिक चांगला असतो आणि पचायलाही हलका असतो. 

ब्रेडचा असा करावा वापर (How to Use Bread)

  • या दोन्ही ब्रेडपासून कोणत्याही पद्धतीची रेसिपी बनवता येऊ शकते. ब्रेड थोडा सुकला असेल तर तुम्ही त्याचा फोडणीचा ब्रेड करा अथवा त्याचा चुरा (Bread Crumbs) करून कबाबसाठी वापरू शकता 
  • एखाद्या भाजीचा रस्सा घट्ट करायचा असेल तर तुम्हाला ब्रेडचा वापर करता येईल
  • ब्रेडपासून वेगवेगळे स्नॅक्स आणि टोस्ट बनवू शकता
  • सँडविच बनविण्यासाठी तर होणारा उपयोग सर्वांनाच माहीत आहे
  • याशिवाय शाही तुकडा बनविण्यासाठीही ब्रेडचा उपयोग करून घेता येतो

तुमच्या घरात कोणता ब्रेड खाल्ला जातो आम्हाला नक्की सांगा. तसंच तुम्हालाही जर फरक माहीत नसेल तर हा लेख नक्की वाचून घ्या. अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी तुम्ही dazzlemarathi.com वर क्लिक करा. 

Leave a Comment