घरातील शांतता भंग झाल्यासारखे वाटत असेल तर करा या गोष्टी

 ‘घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती.. तिथे असावा मायेचा ओलावा नकोत नुसत्या नाती’ घरावर किंवा कुटुंबावर निबंध लिहिताना कित्येक वेळा या ओळी लिहिल्या गेल्या असतील. घर, कुटुंब म्हटलं की, माया- भांडण आलीच.पण ती सातत्याने होत असेल तर एकाच घरात राहून अज्ञात असल्यासारखे वाटू लागते. घरात ऐश्वर्य असूनही काही वेळा घरातील लोकांची तोंड मात्र कायम वाकडी असतात. अशांचे घर कितीही मोठे असले तरी देखील घरात शिरल्यानंतर एक वेगळीच उर्जा आपल्याला जाणवते. तुमच्याही घरात सतत भांडण, हेवेदावे आणि रुसव्या फुगव्यांनी शांतता भंग झाल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही या काही सोप्या गोष्टी करायला हव्यात. 

बेडरुममध्ये अशी आणा पॉझिटिव्हिटी

निगुतीने विषय हाताळा

घरात माणसं आहेत म्हटल्यावर वाद होणे अगदी स्वाभाविक आहे. काहींना अगदी पटकन राग येतो. घरात अशाही व्यक्ती असतात ज्यांना असे सतत वाटते की,त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. अशावेळी त्या व्यक्तीच्या मनातून तो विषय काढून टाकताना थोडे निगुतीने हाताळणे गरजेचे असते. घरात सगळ्यांनाच निगुतीने काही गोष्टी करता येत नसेल त्यामुळे जी व्यक्ती निगुतीने हाताळू शकत असेल त्याच व्यक्तीने या गोष्टी केल्या तरी अधिक चांगल्या पद्धतीने ते विषय सुटू शकेल. 

तुलना टाळा

घरात अनेकदा भांडणासाठी कारण तुलना करणे असते. खूप जण सतत भावंडाची तुलना करत राहातात. त्यामुळे भावंडांमध्येही नाहक दुरावा येतो. शिवाय जर घरात भाऊ- भाऊ, बहिणी- बहिणी असतील तर अशी तुलना करणे टाळा. कारण एखाद्याची प्रशंसा दुसऱ्याच्या रागाचे कारण ठरु शकते. भावंडामध्ये असे सतत वाद होत असतील आणि त्यामुळे जर घराती शांतता भंग झालेली असेल तर तुम्ही घरात तुलना करणे टाळा. 

मोठ्यांनी प्रयत्नशील राहा

घरातील शांतता कोणत्याही कारणांमुळे भंग झाली असेल तरी घरातील मोठ्यांनी असे विषय सोडवण्याचा प्रयत्न करा.  कधी कधी समान वयाची लोकं भांडण सोडवू शकत नाही. अशावेळी मोठ्यांनी थोडासा विषय बदलला तर त्यामुळे भांडण कमी होण्यास मदत मिळते. 

शांतता ही एकाएकी येत नसते. घरातील वातावरण शांत आणि आनंदी करण्यासाठी घरात काही नियमही हवेत. हल्ली अनेक जण फोनमध्ये इतके गुरफटलेले असतात की, त्यांना इतर कोणाशीही बोलण्यास वेळ नसतो. अशावेळी घरी जेवणासाठी एकत्र बसणे, गप्पा मारणे अशा काही गोष्टी करायला हव्यात. मुलांसोबत किंवा घरातल्यांसोबत गप्पा मारतानाच एकमेकांचे स्वभाव कळतात, आवडीनिवडी कळतात. असे करुन भांडण होणार नाहीत किंवा शांतता भंग होणार असे नाही. पण त्यामुळे एकमेकांबद्दलचा आदर वाढेल जो नक्कीच तुम्हाला एकत्र धरुन ठेवण्याचे काम करेल.

Leave a Comment