हाताची करंगळी सांगते तुम्ही कधी होणार श्रीमंत

आपल्याकडे ज्योतिषशास्त्र, हस्तरेखाशास्त्र याचा अभ्यास मोठ्या प्रमाणात केला जातो. यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा नाही. मात्र इतर अभ्यासाप्रमाणे याकडे पाहिले जाते. हस्तरेखाशास्त्राप्रमाणे आपल्या हाताचे प्रत्येक बोट हे कोणत्या ना कोणत्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करते. हाताच्या सर्वात लहान बोटाला करंगळी असे संबोधले जाते आणि करंगळीचा स्वामी हा बुध ग्रह आहे. बुध ग्रह बुद्धी आणि विवेक याचा कारक मानला जातो. त्यामुळे आपल्या हाताच्या करंगळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धनाचा संबंध हा बुद्धी आणि विवेकाशी लावला जातो. कारण बुद्धीच्या बळावरच अधिक पैसा कमावला जातो. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला आपल्या हाताच्या करंगळीच्या बाबतीत काही रोचक संकेत आणि गोष्टी सांगणार आहोत. तुम्हीही ही माहिती मिळाल्यानंतर तुमची करंगळी तपासून पाहा. 

बुध पर्वत असल्यास

सौजन्य – Freepik

करंगळीच्या खाली बुध पर्वत असल्यास आणि तो स्पष्ट उठावदार दिसत असल्यास, तुमच्या आयुष्यात प्रसिद्धी आणि धन दोन्ही गोष्टीची कमतरता भासणार नाही हे दर्शविते. तसंच तुम्ही किती बुद्धीवान आहात याचेही संकेत या बुध पर्वतावरून मिळतात. बुध पर्वतावर स्पष्ट रेषा दिसत असल्यास, या व्यक्ती अत्यंत यशस्वी होतात आणि त्यांना त्यांच्या मेहनतीमुळे यश प्राप्त होते. तसंच ज्यांच्या हातावर ही रेषा स्पष्ट नाही त्या व्यक्ती अविवेकीपणाने काम करत असल्याचे स्पष्ट होते. बुध रेषा सरळ, पातळ आणि खोल तसंच लालसर असेल तर याला भद्र योग असे संबोधित केले जाते. यामुळे एखाद्या व्यक्तीची बुद्धी किती तल्लख आहे हे सिद्ध होते.अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही पैसे कमी पडत नाहीत आणि या व्यक्ती खूप प्रसिद्ध होतात. 

करंगळीची उंची सांगते करिअरमध्ये काय होणार 

तुमच्या हाताची करंगळी ही अनामिका बोटाच्या उंचीसमान असल्यास अथवा अधिक उंच असल्यास अशा व्यक्ती अत्यंत भाग्यवान समजण्यात येतात. अशा व्यक्तींना आयुष्यात प्रतिष्ठा आणि सन्मान प्राप्त होतो. तसंच अशा व्यक्तींना पैशाची चणचण कधीही भासत नाही. या व्यक्ती अत्यंत चांगल्या लीडर होतात आणि त्याशिवाय अशा व्यक्तींची वाणी अनेक लोकांना अधिक चांगली वाटते. या व्यक्तींचा शब्द खाली पडू दिला जात नाही. त्यामुळे त्यांचे करिअर अतिशय चांगले राहाते. 

लहान वा मोठी कोणती करंगळी आहे शुभ?

सौजन्य – Freepik

शास्त्रानुसार करंगळी जितकी लहान तितकी ती शुभ. ज्या व्यक्तींची करंगळी लहान असते, अशा व्यक्ती खूपच तल्लख असतात. पण चुकीच्या कामामध्ये त्याचा अधिक वापर करण्यात अशा व्यक्ती जास्त गुंततात. त्यामुळे अशा व्यक्तींपासून इतरांनाही सावधानता बाळगावी लागते. तर काही व्यक्ती स्वतःला सावरून चांगल्या कामातून पैसे कमावतात. 

तुटलेली लहान करंगळी 

तुमची करंगळी तुटली आहे अथवा वाकडी असेल तर अशा व्यक्तींचा स्वभाव चांगला नसतो. या व्यक्ती खूपच क्रूर स्वभावाच्या आणि दुसऱ्यांना नुकसान पोहचले अशा पद्धतीने वावरणाऱ्या असतात. तसंच या व्यक्तींपासून सावध राहण्याची गरज भासते. 

आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. एक माहिती या स्वरूप या लेखातून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाप्रमाणे ही माहिती देण्यात आली आहे. 

Leave a Comment