Diwali 2022: सूर्यग्रहणाचा लक्ष्मीपूजनावर काय होणार परिणाम

Diwali 2022 Surya Grahan Effect: हिंदू धर्मात सर्वात मुख्य सण मानला जातो तो म्हणजे दिवाळी (Diwali Festival 2022). लक्ष्मी, भगवान कुबेर आणि गणपतीची विशेष पूजा आणि अर्चना या दिवसांमध्ये करण्यात येते. मात्र यावर्षी दिवाळीमध्ये सूर्यग्रहणाची (Surya Grahan) सावली पडली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात अमावास्येच्या दिवशी 25 ऑक्टोबर, 2022 रोजी असणारे हे सूर्यग्रहण (Solar Eclipse 2022) अंशिक असून 27 वर्षाने दिवाळीच्या वेळी सूर्यग्रहण होणार आहे. मात्र ग्रहण कालावधी हा खूप आधी सुरू होते. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रीच ग्रहणकाळ सुरू होणार आहे. मात्र याचा लक्ष्मीपूजनावर नक्की काही परिणाम होणार आहे का? असाही प्रश्न अनेकांना सतावत आहे. त्याबाबत ही महत्त्वाची माहिती. 

सूर्यग्रहणाचा काय होणार लक्ष्मीपूजनावर परिणाम (Diwali 2022 Surya Grahan Effect)

सौजन्य – Freepik.com

24 ऑक्टोबर, 2022 रोजी लक्ष्मीपूजना आहे आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी सूर्यग्रहण आहे. त्यामुळे ग्रहणाचे वेध हे दिवाळीच्या रात्रीच लागणार आहेत. आपल्याकडे लक्ष्मीपूजनाचे अनन्यसाधारण महत्त्व असते. वास्तविक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणामुळे लक्ष्मीपूजनावर कोणताही परिणाम होणार नाही. यानंतर 8 नोव्हेंबर, 2022 रोजी देवदिवाळीच्या दिवशी यावर्षीचे सर्वात शेवटचे ग्रहण चंद्रग्रहणाचा परिणामही दिसून येणार आहे. मात्र या सूर्यग्रहणाचा भारतात अधिक परिणाम जाणवणार नाही असंच सध्या सांगितलं जात आहे. त्यामुळे कोणत्याही राशीच्या व्यक्तींना अथवा लक्ष्मीपूजनाच्या दिवसाचा कोणत्याही व्यक्तीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता नाही असंच सांगण्यात येत आहे. 

https://dazzlemarathi.com/2022/10/07/diwali-2022-these-things-are-unlucky-for-laxmi-pujan-in-marathi/

ग्रहणातील सुतक काळ

ग्रहणातील सुतक काळ अर्थात ग्रहणाचे वेध असं ज्याला म्हटलं जातं ते साधारणतः 12 तास आधी सुरू होतात. त्यानुसार 24 ऑक्टोबर, 2022 रोजी मध्यरात्री ग्रहणाचे वेध सुरू होतील. 2.30 मध्यरात्री हा काळ सुरू होऊन 25 ऑक्टोबर, 2022 रोजी पहाटे 4.22 वाजता हा काळ समाप्त होईल. त्यामुळे त्याचा कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही आणि ग्रहणाचे वेध पाळण्याचीही गरज नाही.

https://dazzlemarathi.com/2022/10/07/diwali-2022-significance-of-lahya-and-batashe-in-marathi/

27 वर्षांनी दिवाळीला सूर्यग्रहण

ज्योतिषशास्त्रानुसार, यावर्षी 27 वर्षांनंतर दिवाळीच्या काळात सूर्यग्रहण (Solar Eclipse 2022) येत आहे. यापूर्वी 1995 मध्ये सूर्यग्रहण आले होते. मात्र त्यावेळी हे ग्रहण पाळावे लागले होते. भारतामध्ये अंशिक सूर्यग्रहण होणार असून हे ग्रहण दुपारी 02.29 सुरू होईल आणि संध्याकाळी 06.32 पर्यंत समाप्त होईल. ग्रहाणाचा कालावधी हा साधारण 4 तास 3 मिनिट्स इतका आहे. मात्र या कालावधीत तुम्ही तुमचे काम करू शकता. 

आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. सूर्यग्रहणाच्या दिवशी येणाऱ्या सणावर कोणताही विपरीत परिणाम होणार की नाही होणार याची अभ्यासपूर्ण माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून इतर कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा आमचा हेतू नाही. आपणा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा! (Happy Diwali)

Leave a Comment