Bigg Boss मराठी : किरण माने घराबाहेर पण तरीही खेळात

 बिग बॉस मराठीच्या घरात यंदा डबल एविक्शनचा वार झाला. अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि किरण माने  (Kiran Mane) हे घराबाहेर जाणार हे ऐकून अनेकांना धक्का बसला. किरण माने(Kiran Mane)  यांच्यासंदर्भात हा धक्का थोडा अधिक होता. कारण किरण माने यांचा घरातील वावर पाहता ते एकटेच घरात सगळ्यांना भारी पडताना दिसतात. काहींना त्यांचा रागही येत असेल पण तरीही तो खेळात उत्तम आहे हे अनेकदा दिसून आले आहे. किरण माने घरातल्यांसाठी घराबाहेर गेले असले तरी देखील ते अजूनही खेळात आहेत. कारण किरण माने (Kiran Mane) हे घराबाहेर पडले नाहीत तर त्यांना ‘सिक्रेट रुम’मध्ये ठेवण्यात आले आहे.

 किरण माने (Kiran Mane)  सिक्रेट रुममध्ये 

 मराठी बिग बॉसने घरात आता अर्धा टप्पा पूर्ण केला आहे. 50 दिवसात आता अनेकांचे स्वभाव खूप जणांच्या लक्षात आलेले आहेत. घरात अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर आणि नव्याने आलेली स्नेहलता वसईकर यांचा दबदबा दिसून येतो. घरात सगळं काही आपल्याप्रमाणे करण्यासाठी ते काहीही करताना दिसतात. या सगळ्यांना विरोध करुन आपली मतं स्पष्ट मांडणारा किरण माने (Kiran Mane) हा सगळ्यांना पुरून उरतो. खेळात कदाचित तो इतका पुढे दिसत नसला तरी टास्क डोक्याने कसे खेळायचे हे त्याला नक्कीच माहीत आहे. पहिल्या काही दिवसात प्रेक्षकांनाही किरण माने प्रकरण नेमकं काय आहे? हे कळत नव्हते. पण आता किरण माने कोण?  आणि ते कसे योग्य आहेत अशी त्यांची एक इमेज तयार होऊ लागली आहेत. त्यामुळे ज्यावेळी अपूर्वा विरुद्ध किरण असा वाद होतो तेव्हा तो अधिक चर्चिला जातो. पण आता खेळातून किरण माने गेला असे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे नक्कीच काही जणांना याचा आनंद आणि आपला विजय झाला असे वाटत असणार. त्यामुळेच सिक्रेट रुममध्ये जाऊन नेमकी काय मजा येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

सिक्रेट रुममधून ठेवणार नजर

बिग बॉस या रिॲलिटी शोमधील हा टप्पा सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. कारण अनेकांना सिक्रेट रुममध्ये कोणाला ठेवण्यात येतं ते पाहायचं असतं. खेळात राहून आपल्याबद्दल कोणं काय बोलतं? किंवा काय खेळ खेळतं हे पाहून त्याचा अभ्यास करुन आत पुन्हा एकदा खेळण्याची चांगली संधी मिळत असते. ही संधी किरण माने याला मिळाली आहे. त्यामुळे काही नाती घट्ट करायची की नाही हे त्यांना आता या रुममधून त्यांना करणे सोपे जाईल. काही दिवस सिक्रेट रुममध्ये राहिल्यानंतर तो या खेळात परत येणार आहे. त्यावेळी घरातील अनेकांचे चेहरे पाहण्यासारखे असणार आहेत. 

विक्या राखू शकेल का मैत्री

या घरात विकास आणि किरण माने यांची चांगली मैत्री दिसून आली आहे. यांच्या मैत्रीमुळे खूप जणांनी विकास हा किरण मानेचा प्यादा आहे असेही म्हटले. किरण माने त्याला वापरुन घेतो. त्याची मत बदलतो असे अनेक आरोप किरणवर त्यामुळे लागले आहेत. पण तरीही विकासची साथ किरणने काही सोडली नाही. आता सिक्रेट रुममध्ये गेल्यानंतर विकास एकटा पडेल की, विकास दाद्याच्या विरोधात पलटेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

आता सिक्रेट रुममधून किरण मानेला नेमका काय काय फायदा होतो ते लवकरच कळेल. 

Leave a Comment