ओघळणाऱ्या स्तनांवर कसे कराल उपचार

स्तनांचा आकार आणि घट्टपणा व्यक्तीपरत्वे बदलतो आणि वयानुसार त्याचा विकास आणि त्यानुसार बदल झाल्याचे दिसून येते. पण वाढत्या वयाव्यतिरिक्त स्तन सैल (Breast Sagging) होण्याची अनेक कारणे असतात. कारणं समजून घेतली (Reason of Breast Sagging) तर त्यावर उपाय करणे सोपे जाते. डॉ. रिंकी कपूर, कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटो-सर्जन, द एस्थेटिक क्लिनिक यांच्याकडून आम्ही अधिक माहिती घेतली आहे. 

स्तन ओघळण्याची नक्की कारणे कोणती? (Reason of Breast Sagging) 

Breast Sagging – freepik.com
 • वृद्धत्व
 • गुरुत्वाकर्षण
 • हार्मोनल असंतुलन आणि गर्भनिरोधकाचा वापर
 • रजोनिवृत्ती
 • व्यायामाच्या चुकीच्या पद्धती
 • तुम्ही परिधान करता करत असलेल्या ब्रा चुकीच्या मापात असणे
 • वजनामध्ये येणारा चढ उतार
 • लठ्ठपणा किंवा उच्च बीएमआय
 • धूम्रपान
 • एकाधिक गर्भधारणा
 • स्तनपानाचा इतिहास
 • शरीराच्या वरच्या भागातील व्यायामाचा अभाव

ऊती कमकुवत झाल्यामुळे स्तनाची त्वचा सैल होते आणि या स्थितीला वैद्यकीयदृष्ट्या ब्रेस्ट पीटोसिस असे म्हणतात. सॅगिंग ब्रेस्टमुळे महिला सर्वच कपड्यांमध्ये फिट दिसू शकत नाही. लिफ्ट ब्रा (Lift Bra) सारख्या पर्यायामुळे स्तनाची त्वचा काही प्रमाणात घट्ट दिसू लागते मात्र हा एक तात्पुरता उपाय ठरतो. कॉस्मेटिक सर्जन (Cosmetic Surgeon) ब्रेस्ट लिफ्टसाठी सर्जिकल आणि नॉन-सर्जिकल अशा दोन्ही उपचारांची शिफारस करतात.

काय आहेत उपचार ( Breast Sagging Treatment) 

Breast Sagging – freepik.com

लेझर उपचार: 

लेसर किरण हे त्वचेला नवीन कोलेजन आणि इलास्टिनचे उत्पादन करण्यास उत्तेजित करतात. यामुळे वृद्धत्वाचा परिणामही कमी होतो. पहिल्या उपचारात तुम्ही परिणाम पाहू शकता.

थर्मेज: 

त्वचेच्या खोल थरांपर्यंत उष्णता पोहोचवण्यासाठी ही प्रक्रिया रेडिओफ्रिक्वेंसी लहरींचा वापर करते. तुम्हाला लगेच ऊती घट्ट झाल्याचे दिसून येईल.

थ्रेड लिफ्ट: 

खूप पातळ विरघळणारे धागे स्तनांखाली ठेवले जातात आणि नंतर कॉलर बोनकडे वर खेचले जातात. हे स्तनांना अधिक चांगल्या स्थितीत ठेवण्यास मदत करते.

 • ब्रेस्ट लिफ्टींग शस्त्रक्रिया (Breast Lifting Operation) किंवा मास्टोपेक्सी ही एक शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये सर्जन स्तनांवरील अतिरिक्त त्वचा काढून टाकतो आणि त्याचा आकार गोलाकार आणि मजबूत बनवतो. ब्रेस्ट लिफ्टमुळे स्तनाग्र बिंदूंची स्थिती देखील दुरुस्त होऊ शकते. ब्रेस्ट लिफ्टमुळे स्तनांचा आकार बदलत नाही. हे फक्त सॅगिंग स्तनांना एक घट्टपणा देण्यास मदत करते. या व्यतिरिक्त प्लास्टिक सर्जन काही घरगुती उपाय वापरण्याची शिफारस करतात ज्यांचा समावेश तुम्ही स्तनांची मजबूती आणि सैलसरपणा कमी करण्यासाठी तुमच्या दैनंदिन क्रियाकलापांमध्ये केला पाहिजे
 • छातीचा व्यायाम ज्यामध्ये बेंच प्रेस, पुश अप्स सारख्या व्यायामांचा समावेश आहे. परंतु हे प्रयत्न करण्यापूर्वी प्रशिक्षकाकडून योग्य मुद्रा आणि प्रकार जाणून घ्या
 • व्यायाम करताना योग्य सपोर्टिव्ह ब्रा घाला कारण ते ऊतींना आधार देतील
 • धुम्रपान करू नका
 • निरोगी वजन राखा आणि निरोगी आहार घ्या
 • आपल्या स्तनांना दररोज मॉइश्चरायझ करा

येथे काही सोपे घरगुती पॅक आहेत ज्यांचा वापर तुम्ही स्तनांचा सैलसरपणा टाळण्यासाठी करू शकता

 • एक काकडी किसून घ्या आणि त्यात एक अंड्याचा पिवळा बलक आणि एक चमचे लोणी मिसळा. आता हे मिश्रण स्तनांवर वरच्या दिशेने आणि त्याभोवती लावा. कोरडे होऊ द्या आणि सुमारे 30 मिनिटानंतर थांबून ते थंड पाण्याने धुवा
 • अंड्याचा पांढरा भागात 1 टीस्पून दही आणि मध घालून चांगले फेटा. हे मिश्रण तुमच्या स्तनांवर हलक्या हाताने लावून मसाज करा सुमारे एक तास ते तसेच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या
 • पाव कप मेथी पावडर पाण्यात मिसळून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या स्तनांवर लावा.  आता चांगली मालिश करा हे त्या भागातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करेल सुमारे 10 मिनिटे हे मिश्रण तसेच राहू द्या आणि त्यानंतर कोमट पाण्याने धुवा

तुमचे स्तन सैलसर झाले असते अथवा ओघळत असतील तर तुम्हाला ही माहिती जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. 

Leave a Comment