Bigg Boss 16 च्या घरात होणार ही धमाकेदार वाईल्ड कार्ड एंट्री

 BB 16 च्या घरात रोज काही ना काही मजेशीर घडत आहे. शिव– अर्चना- प्रियांका- साजिद हे घरातील असे ॲक्टिव्ह सदस्य आहेत. ज्यांच्यामुळे घरात काही ना काही घडत असते. पण आता या घरातील वातावरण अजून तापवण्यासाठी वाईल्ड कार्ड एंट्री होणार असल्याचे सांगितले जात आहे. या वाईल्डकार्डमधून कोणाची एंट्री होईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यासाठी जे नाव पुढे येत आहे ते ऐकून तुम्हालाही धक्का बसल्यावाचून राहणार नाही. वाईल्ड कार्डमधून ज्या सदस्याची एंट्री होणार आहे तो सदस्य आहे  अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukle) हो! तुम्ही ऐकताय ते एकदम खरंय….वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून अभिजीत बिचुकलेचे नाव पुढे येत आहे. यासोबतच रिधिमा पंडीतच्या नावाची चर्चाही होत आहे. चला जाणून घेऊया या विषयी अधिक 

अभिजीत बिचुकले परत?

सलमान खानसोबत अभिजीत बिचुकलेचा झालेला वाद आपण सगळेच जाणतो. सलमानलाही उद्धट बोलणारा बिचुकले पुन्हा कधी बिग बॉस या रिॲलिटी शोमध्ये परतेल असे वाटले नव्हते. पण आता त्याच्याच नावाने अधिक जोर धरला आहे. अनेक सोशल मीडिया हँडल्सवर अभिजीतच्या नावावर मोहोर लावण्यात आली आहे. शिवाय काही जणांनी या सीझनचा रटाळपणा घालवायला अभिजीत बिचुकलेला परत आणा अशी विनंती देखील केली आहे. आतापर्यंत घरात 3 एविक्शन झाले आहेत. श्रीजिता, मान्या आणि गौरी नागौरी या तिघांनी घराला कधीच टाटाबायबाय केले आहे. आता या घराला थोडे जागे करण्याची गरज आहे. त्यामुळेच वाईल्ड कार्ड एंट्रीचा विचार केला जात असल्याचे देखील कळत आहे. यामध्ये अभिजीत बिचुकले याचे नाव पुढे आहे असे समजत आहे. आता अभिजीत बिचुकले परत आल्यानंतर घरातील अनेक समीकरणं बदलतील यात काहीही शंका नाही. 

अभिजीत बिचकुलेच्या येण्याने पडेल फरक

अभिजीत बिचुकले हा मराठी बिग बॉसमधून आलेला आहे. त्याने गेल्या हिंदी सीझनमध्ये आपली ओळख निर्माण केली होती. त्याची ओळख ही चांगली अशी नसली तरी देखील प्रत्येक शोमध्ये असा चेहरा नक्कीच पुढे जातो जो काहीतरी वेगळं आणि विचित्र करतो. अभिजीत बिचुकलेचा स्वभावही काहीसा असाच आहे. तो क्षणात एक आणि क्षणात दुसरा असा आहे. पण तरीही या खेळात त्याला पाहिल्यामुळे त्याची आपली अशी मत असतात हे नक्की! वाद घालणे, मनोरंजन करणे यात तो माहीर असल्यामुळे घरात आल्यानंतर त्याचे अर्चनाशी चांगले की शिव यांच्या गटाशी चांगले होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पण हे नक्की की, त्याच्या येण्याने घरातील अनेक समीकरणं बदलणार आहेत. 

कोण आहे अभिजीत बिचुकले?

अभिजीत बिचुकले नेता आणि कवी आहे. मूळ सातारचा असलेला अभिजीत बिचुकले अनेक निवडणुका पराभूत झालेला आहे.  त्याला खरी ओळख मिळाली ती बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये. त्या सीझनमध्येही आपल्या विचित्र मतांमुळे आणि सणकी वृत्तीमुळे त्याची घरात भांडणं व्हायची. हजरजबाबी म्हणून उत्तर देताना तो कोणाचाही विचार करायचा नाही. बिग बॉस हिंदीच्या 15 व्या सीझनला येऊन त्याने थेट सलमान खानशी पंगा घेतला होता. त्यानंतर त्याला अधिक प्रसिद्धी मिळाली. 

दरम्यान अजून अभिजीत बिचुकलेच्या नावाची चर्चा आहे. तो येईल अशी खात्री अनेकांनी सोशल मीडियावरुन व्यक्त केली आहे. 

दीड वर्षातच मोडला संसार, मानसी नाईक घेणार घटस्फोट

Leave a Comment