बिग बॉस मराठीच्या सीझन 4 चा ग्रँड सोहळा रविवारी मोठ्या दिमाखात पार पडला. सीझन 4 च्या ट्रॉफीवर अक्षय केळकरने आपले नाव कोरले आहे. त्यामुळे अक्षयच्या फॅन्सना चांगलाच आनद झाला आहे. टॉप 5 चा विचार करता सगळेच स्पर्धक हे विजेत्यापदाचे दावेदार होते. शेवटी टॉप 2 मध्ये असलेल्या अक्षय केळकर (Akshay Kelkar) आणि अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) मध्ये अटीतटीचा सामना होता. यात अक्षय केळकरने बाजी मारली आहे. अगदी पहिल्याच दिवसापासून अक्षयमध्ये एक विजेता दिसत होता. पण त्यासोबत घरातील इतरांनीही आपला उत्तम खेळ दाखवला होता. त्यामुळे विजेता कोण होईल? याची उत्कंठा शेवटपर्यंत होती

अक्षय- अपूर्वामध्ये लढत
टॉप 2 मध्ये अपूर्वा आणि अक्षय या दोघांची नावे होती. हे दोघेही स्पर्धक अनेक कारणांमुळे घरातील सगळ्यांपेक्षा वेगळे आणि विजेता क्वालिटी असलेले स्पर्धक होेते. स्पष्ट मतं आणि खेळण्यातील त्यांचे स्पिरिट पाहता या दोघांपैकी कोणीही विजेता झाले तरी ते त्या पदासाठी योग्य होते. पण अखेर अक्षय केळकरने यात बाजी मारुन ट्रॉफी पटकावली. शिवाय 15 लाख 55 हजारांचे बक्षीसही मिळवले. 100 दिवसांपासून सुरु असलेला हा प्रवास आता संपला आहे. अक्षय या स्पर्धेत पुढे निघाला असून त्याने विजेतेपदाचा मान पटकावला आहे.
राखीने घेतला स्मार्ट निर्णय
बिग बॉसच्या खेळात असे अनेक टप्पे येतात ज्यामध्ये तुम्हाला ट्रॉफीपेक्षा कधीकधी काही वेगळ्या गोष्टींना प्राधान्य द्यावे लागते. राखी सावंत (Rakhi Sawant) ही या खेळात माहीर आहे. तिने आतापर्यंत या खेळात चांगले निर्णय घेतले आहे. ती इमोशनली नाही तर ती प्रॅक्टिकली विचार करते हे अनेकदा दिसून आले आहे. यावेळीही तिने मराठी बिग बॉसच्या टॉप 5 मध्ये आली. ती कदाचित जिंकू शकली असती. पण तिला यावर विश्वास नव्हता त्यामुळे तिने आलेली ऑफर म्हणजेच 9 लाख रुपये स्विकारून खेळ सोडला. त्यामुळे ती काहीही न घेता नाही तर लोकांचे प्रेम आणि पैसे दोन्ही घेऊन बाहेर पडली.