पारंपरिक दागिन्यांची श्रृंखला म्हणजे ‘प्राजक्तराज’, अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नवे कलेक्शन

कितीही फॅन्सी दागिने आले तरी आजही अनेक जण साडीवर किंवा एखाद्या ड्रेसवर पारंपरिक ज्वेलरी घालणेच अधिक पसंत करतात. अशाच विस्मृतीत गेलेल्या पारंपरिक दागिन्यांच्या डिझाईन्स घेऊन आली आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी. नुकतेच तिने तिच्या ब्रँड ‘प्राजक्तराज’(Prajaktaraaj) चे अनावरण केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते तिच्या या सुंदर  दागिन्यांचे अनावरण करण्यात आले आहे. चला जाणून घेऊया प्राजक्ताच्या या कलेक्शनविषयी अधिक

 जुन्या दागिन्यांना नवी चमक म्हणजे ‘प्राजक्तराज’ 

खरंतर हल्ली प्रत्येकाला जुने दागिने घालायला आवडतात. हल्लीच्या ट्रेंडमध्ये लग्नसराईसाठी कोल्हापुरी साज, लक्ष्मीहार, पाटल्या, वाळे, चिंचपेटी, मोत्यांचे हार ,नथ असे कितीतरी प्रकार घालायला नवरीलाही आवडतात. जर लग्न मराठमोळं असेल तर अशावेळी हे दागिने हमखास घातले जातात. पण सगळ्यांनाच यामध्ये हवी असते ती म्हणजे व्हरायटी. सोन्यात हे दागिने मिळत असले तरी देखील सगळ्यांनाच सोन्या- चांदीत हे दागिने करणं परवडतील असे होत नाही. अशावेळी आपण सगळे इमिटेशन ज्वेलरीचा पर्याय निवडणे पसंत करतो हो ना? पण तुम्हीच आठवून पाहा की, आपल्याला किती प्रयत्न करुन अशा पारंपरिक ज्वेलरीज मिळतात त्या. त्यासाठीच प्राजक्ता माळी(Prajakta Mali) चा हा प्रयत्न आहे. तुम्हाला हव्या असलेल्या सगळ्या पारंपरिक दागिन्यांचा डिझाईन्स तुम्हाला या कलेक्शनमध्ये पाहायला मिळणार आहेत.

कलेक्शन पाहण्यासाठी वेबसाईट सज्ज

प्राजक्ताचे हे कलेक्शन तुम्हाला इन्स्टाग्रामवर देखील पाहता येणार आहे. पण सध्या तिने त्यात काही मोजकेच व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत.पण तिचं खरं कलेक्शन हे तुम्हाला तिच्या वेबसाईटवर पाहता येणार आहे. तिचं कलेक्शन जितकं सुंदर आहे. तिने त्याची नावंही तितकीच सुंदर ठेवली आहेत. म्हाळसा, तुळसा, सोनसळा असे तिच्या कलेक्शनचे नाव असून यामधील सगळ्या डिझाईन्स या अगदी युनिक दिसत आहेत. 

प्राजक्ताला दागिन्यांचे वेड

प्राजक्ताचे फोटोज जर तुम्ही पाहिले असतील तर तिला पारंपरिक पोषाख हा सगळ्यात जास्त आवडतो असे दिसून येईल. वेस्टर्न आऊटफिटमध्ये ती जितकी सुंदर दिसते. त्याहून अधिक सुंदर ती पारंपरिक वेषात अर्थात साडीत दिसते. साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसते यात काही वाद नाही. पण त्यासाडीसोबत तिने घातलेले दागिने हे नेहमीच सुंदर असतात. तिच्या साडीवरील दागिन्यांची निवड ही नेहमीच युनिक असते. त्यामुळे अर्थातच तिचे कलेक्शन तिच्या याच नजरेतून तयार झालेले आहे. 

लग्नसराई जवळ असेल आणि तुम्हाला पारंपरिक दागिने घालायचे असतील तर तुम्ही नक्कीच हे निवडू शकता. 

Leave a Comment