Bigg Boss Marathi 4 | बिग बॉसच्या घरात अपूर्वा बनू पाहतेय का डिक्टेटर

 Bigg Boss Marathi 4  सीझनची सुरुवात दणक्यात सुरु झाली आहे. अगदी दोनच दिवसात या घरात भांडणं देखील सुरु झाली आहेत. घरातील स्पर्धक अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) आणि स्पर्धक प्रसाद जवादे ( Prasad Jawade) यांच्यातील भांडण आता विकोपाला जाऊ लागली आहेत. घरात दोघंही एकमेकांना पाहू शकत नाही अशी परिस्थिती  निर्माण झाली आहे. अपूर्वा नेमळेकरचे एकूणच वागणे पाहता तिला आल्या आल्याच या घरात डिक्टेटर व्हायचे आहे असे दिसत आहे. त्यामुळे घरातील इतरांना चमकण्याची संधी फारच कमी वेळ मिळत आहे. मुळातच हा खेळ जास्तीत जास्त दिसण्याचा असल्यामुळे खेळासाठी अपूर्वा अशी वागतेय का? असाही प्रश्न पडू लागला आहे.

आदिपुरुषच्या टीझरवर सेलिब्सच्या संतप्त प्रतिक्रिया

भांडणात पुढे

घरात आल्या दिवसापासून आपली बाजूच बरोबर आहे हे सांगण्यात अपूर्वा पुढे राहिली आहे. पहिल्या ग्रुप नॉमिनेशनपासून तिने प्रसाद वाईट असून तो निरुपयोगी कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी ज्या काही गोष्टींचा आधार घेतला त्यामुळे इतरांच्या मनातही प्रसादबद्दलचे मत खराब झालेले दिसत आहे. प्रसाद हा सध्या सांगकाम्या असून त्याला अपूर्वा नेमळेकरचे ऐकायचे आहे. त्यामुळेच त्यांच्यामध्ये सतत वाद होताना दिसत आहे. आता हा वाद सांगकाम्याचा टास्क संपल्यानंतर तरी कमी होईल का? हे पाहावे लागणार आहे. 

चावडीवर घेतली जाईल का शाळा

Bigg Boss Marathi 4 चा पहिला आठवडा कधी संपतं याची प्रतिक्षाही अनेकांना असते. कारण आठवडयाचे प्रशस्तिपत्रक घेऊन महेश मांजरेकर हजर असतात. या आठवड्यात कोणाला दट्ट्या पडेल ? याची वाट अनेक जण पाहतात. कारण त्यामुळे कोण चुकलं कोण बरोबर हे कळायला मदत होते. या दोन दिवसांकडे पाहता अपूर्वा काही बाबतीत इतर स्पर्धकांवरही आपली मत थोपवताना दिसत आह. त्यामुळे तिला देखील या आठवड्यात चांगला ओरडा पडेल असे दिसत आहे.  कारण नसताना काही विषय उगाचच धरुन ठेवताना ती दिसली आहे. बॉडी शेमिंग आणि वुमन कार्ड खेळताना ती दिसली आहे. त्यामुळे आता तिला खरंच दट्ट्या पडतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

को स्टार्सवर बरसली होती अपूर्वा

अपूर्वा शेवंता या नावाने घराघरात पोहोचली आहे. या मालिकेत तिने साकारलेली शेवंता अनेकांना आवडली होती. पहिल्या आणि दुसऱ्या भागात शेवंताचे दाखवलेले भूत ही अनेकांच्या आवडीचे होते. पण अचानक शेवंता हे पात्र बदलले. तिने या मालिकेतून काढता पाय का घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला होता. 24 नोव्हेेंबर 2021 रोजी तिने एक पोस्ट लिहिली आणि त्यामध्ये तिने मालिकेच्या सेटवर काय घडले हे सांगितले. तिने दिलेल्या माहितीनुसार तिच्या वाढत्या वजनावरुन सह कलाकार तिच्यावर सतत हसायचे. त्या कलाकारांनी तक्रार करुन सुद्धा दिलगिरी व्यक्त केली नसल्याची खंत तिने बोलून दाखवली होती. इतकेच नाही तर  अपूर्वाला मालिकेकडून अन्य काही आश्वासने देण्यात आली होती. ती पाळली न गेल्यामुळेही ती नाराज असल्याचे तिने सांगितले होते आणि मालिकेतून काढता पाय घेतला होता. 

आता या Bigg Boss Marathi 4 च्या घरात तिचे काही पूर्वग्रह तिच्यासाठी त्रासदायक ठरणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

अधिक वाचा

सुष्मिता सेन दिसणार ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत, पहिला लुक समोर

‘हवाहवाई’तून पहिल्यांदाच उलगडणार फूड स्टॉल चालवणाऱ्या महिलांची संघर्षकथा

महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘चाणक्य’ अवतरणार रुपेरी पडद्यावर

Leave a Comment