KGF च्या चाहत्यांसाठी खुशखबर… 3 भाग येणार लवकरच

 KGF च्या चाहत्यांसाठी आजची ही बातमी खूप महत्वाची असणार आहे. कारण KGF 3 संदर्भात एक नवी बातमी समोर आली आहे. कारण ज्यांनी 2022 साली KGF चा दुसरा पार्ट पाहिला आहे त्यांना तिसऱ्या पार्टची प्रतिक्षा आहे. या भागाबद्दल अजून कुठूनच काही बातमी येताना दिसत नव्हती. पण काल रॉकी भाई अर्थात अभिनेता यशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने याच्या पुढच्या भागाचे संकेत मिळाले आहे. होम्बले प्रॉडक्श्न ( homble production)ने यशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पुढील भागाविषयी जे लिहिले आहे ते KGF च्या चाहत्यांसाठी जाणून घेणे आहे फारच गरजेचे आहे

तिसऱ्या भागाची लवकरच होणार सुरुवात

8 जानेवारी हा अभिनेता यशचा वाढदिवस असतो. KGF मुळे त्याचे जगभरात चाहते आहेत. त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव अजूनही होत आहे. पण यामध्ये एका पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे होमले प्रॉडक्शनने कारण यशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अजून एका माँन्सटरच्या प्रतिक्षेत आहोत असे लिहिले आहे. असा KGF चाहत्यांना यामधील माँस्टर हे गाणं नक्कीच माहीत असेल .त्यामुळे यातील खरा मॉन्स्टर कोण? हे कळतेच. शिवाय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसारत 2025 मध्ये तिसऱ्या भागाची सुरुवात होणार असे कळत आहे. त्यामुळे अजूनही दोन वर्ष या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे.

कुठे असेल रॉकी

KGFच्या अलडोरोडो भागाचा शेवट हा इंडियन ओशनमध्ये झाला होता. त्याला पकडण्याच्या आधी तो सगळे सोने घेऊन निघतो. तो भारतातून पळण्याचा प्रयत्न करत आहे असे वाटत असताना तो स्वत:च इंडियन नेव्हीच्या दिशेने येत असतो.त्याच्यावर हल्ला करण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर त्याच्या जहाजाचे तुकडे होतात. तो पाण्यात पडतो. त्याच्या आजुबाजूला सोन्याचे बिस्कीट असतात. यामध्ये तो मेला असे कुठेच दाखवण्यात आले नव्हते. पण त्याने कमावलेले इतके सोने तो पाण्यात तेही समुद्रात का टाकतो ? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. पण यामागेही त्याचा नक्कीच काहीतरी प्लॅन असणार यात काहीही शंका नाही. हे पाहिल्यानंतर रॉकीने पुढे काय केलं असेल? हे पाहण्याची इच्छा सगळ्यांनाच आहे.

केली इतकी कमाई

आतापर्यंत KGF चे दोन भाग आले आहेत. पहिला भाग हा 2018 साली आला होता. हिंदीत डब केलेला असल्यामुळे याला हिंदी भाषिकांकडूनही चांगले प्रेम मिळाले. त्यावेळीही हा चित्रपट सुपर डुपर हिट होता. पहिल्या भागाने चांगली कमाई केली होती. त्यानंतर दुसरा भाग तब्बल 4 वर्षांनी आला. त्याने 1हजार कोटीच्या वर कमाई केली. पहिल्यापेक्षा दुसरा भाग हा अधिक सरस होता.  आता 2025 मध्ये त्याचा पुढचा भाग येणार म्हणजे तोही तितकाच दमदार असेल यात काही शंका नाही. 

आता KGF च्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. तुम्हाला KGFचा कोणता भाग आवडला? आम्हाला नक्की कळवा

Leave a Comment