षटकारांचा राजा युवराज सिंगने केली ‘सिक्सर’ या नवीन क्रिकेटिंग वेब सीरिजची घोषणा

अॅमेझॉन मिनिटीव्ही (Amazon Mini TV) या अॅमेझॉनच्या (Amazon) मोफत व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवेने आपल्या वैविध्यपूर्ण काँटेण्टच्या माध्यमातून प्रेक्षकांचे सातत्याने मनोरंजन केले आहे. मनोरंजनाचा स्तर आणखी उंचावत स्ट्रीमिंग सेवेने आज आपल्या आगामी सिक्सर या क्रीडानाट्याची घोषणा केली आहे. TVFची निर्मिती आणि चैतन्य कुंभकोणम यांचे दिग्दर्शन असलेल्या सिक्सरमध्ये बॅचलर्स व अस्पायरंट्स फेम शिवंकित सिंग परिहार प्रमुख भूमिकेत आहे. ही सीरिज 11 नोव्हेंबरपासून केवळ अॅमेझॉन मिनीटीव्हीवर मोफत स्ट्रीमिंगसाठी सज्ज आहे.

या आगामी क्रीडानाट्याचे ट्रेलर निकुंज शुक्ला अर्थात ‘निक्कू’ या इंदोरच्या विजयनगरमधील तरुण क्रिकेटपटूच्या आयुष्याची झलक दाखवते. शिवंकितची ही व्यक्तिरेखा ही खंद्या क्रिकेटप्रेमीची आहे, त्याला योग्य हेतूने क्रिकेटचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे.  

सिक्सर आणि युवराज योग्य समीकरण 

“आगामी क्रीडानाट्य ‘सिक्सर’च्या माध्यमातून अॅमेझॉन मिनीटीव्हीशी सहयोग करता आला याचा मला खूपच आनंद वाटतो. जहाँ है सिक्सर और क्रिकेट, वहाँ हे युवी! (जेथे षटकार व क्रिकेट आहेत, तेथे युवी आहे). ही कथा खूपच सुंदर आणि स्मरणात राहण्याजोगी आहे, आणि या कथेने मला मी टेनिस बॉलने क्रिकेट खेळायचो त्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून दिली. अॅमेझॉन मिनिटीव्ही भारतभरातील प्रेक्षकांसाठी एवढा अप्रतिम क्रीडाविषयक आशय मोफत आणत आहे याचा मला खूप आनंद वाटतो,” असे एकेकाळचा क्रिकेटिंग आयकन आणि किंग ऑफ सिक्सर्स युवराज सिंग (Yuvraj Singh) म्हणाला.

“क्रिकेट हा खेळ प्रत्येक भारतीयाच्या मनात निनादत असतो आणि आम्ही म्हणजेच अॅमेझॉन मिनीटीव्ही, क्रिकेटबद्दल सर्वांना वाटणाऱ्या या अजरामर उत्साहात व प्रेमात, आमच्या सिक्सर या वेबसीरिजच्या माध्यमातून भर घातलाना, खूपच रोमांचित झालो आहोत,” असे अॅमेझॉन अॅडव्हर्टायजिंगचे प्रमुख गिरीश प्रभू म्हणाले. “सिक्सर ही केवळ निकुंजची गोष्ट नाही, तर आपले तनमन ओतून कोणताही खेळ खेळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची गोष्ट आहे. ही सीरिज प्रेक्षकांमध्येही षटकार मारेल याची आम्हाला खात्री आहे.”

“सर्वांना आपल्याशा वाटणाऱ्या तरीही अनोख्या कथा सर्वांपुढे आणण्यासाठी TVF ओळखली आणि प्रशंसलीही जाते. सर्वांना खिळवून ठेवणारा आशय निर्माण करण्याचे आमचे स्वप्न सिक्सरच्या माध्यमातून आम्ही आणखी पुढे नेत आहोत. भारतात क्रिकेटचा चाहतावर्ग मोठा आहे आणि ‘सिक्सर’च्या अनोख्या पद्धतीने मांडलेल्या कथेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या हृदयाला स्पर्श करू अशी आशा आम्हाला वाटते. भारतीय प्रेक्षकांमध्ये स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या अॅमेझॉन मिनीटीव्हीशी व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवेसाठी सहयोग झाल्यामुळे आमचा आनंद व आशा द्विगुणित झाल्या आहेत,” असे TVFचे अध्यक्ष विजय कोशी म्हणाले.

जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी 

या प्रकल्पावरील अधिकृत ब्रॅण्ड स्पिनीचे संस्थापक नीरज सिंग या शोबद्दल म्हणाले, “क्रिकेटशी असलेले घट्ट नाते आणि स्पिनीचा महानगरांवर तसेच शहरांवर असलेला भर यांमुळे,  दैनंदिन आयुष्यातील सर्व प्रतिकूलतांवर मात करत स्थानिक क्रिकेट संघाने मिळवलेल्या विजयाची कथा,  हा धागा स्पिनीच्या सहयोगाशी मिळताजुळता आहे. यातील प्रत्येक व्यक्तिरेखेच्या प्रवासात मनोरंजन आणि पुढे जाण्याची ऊर्मी यांचे परिपूर्ण मिश्रण आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेच्या घडणीचा अनुभव आम्ही ज्या पद्धतीने घेतला आहे, त्यावरून प्रेक्षक या शोशी जोडले जातील आणि त्यातील कोणत्या ना कोणत्या व्यक्तिरेखेत स्वत:ला बघतील याची खात्री आमच्या मनांत निर्माण झाली आहे.”

सिक्सर ही आपल्या निखळ आनंदासाठी व खेळाबद्दल वाटणाऱ्या प्रेमापोटी क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येकाची कथा आहे. ही सीरिज 11 नोव्हेंबरपासून अॅमेझॉन मिनीटीव्हीवरून मोफत स्ट्रीम केली जाऊ शकेल. अॅमेझॉन मिनीटीव्ही अॅमेझॉन शॉपिंग अॅपद्वारे किंवा फायर टीव्हीद्वारे उपलब्ध आहे.

Leave a Comment