तुमचा जन्म झालाय का नोव्हेंबर महिन्यात, कशा असतात या व्यक्ती

प्रत्येक व्यक्तीला आपले व्यक्तित्व नक्की कसे आहे आणि इतरांना आपल्याबाबत काय वाटते हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. लोक आपल्या व्यक्तित्व आणि स्वभावाच्या बाबतीत जाणून घेण्यासाठी नेहमी ज्योतिषांना वेगवेगळे प्रश्न विचारत असतात. आपण ज्या महिन्यात जन्म घेतो त्यावरून आपला स्वभाव आणि आपले व्यक्तित्व दिसून येते. इतर महिने आणि नोव्हेंबर महिन्यात जन्म घेणाऱ्या व्यक्तींमध्ये खूपच फरक असतो. नोव्हेंबर महिन्यात जन्म घेतलेल्या व्यक्ती असतात कशा हे या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुमचाही जन्म नोव्हेंबर महिन्यात (November Month) झाला असेल तर तुम्ही नक्की जाणून घ्या. 

नोव्हेंबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्ती असतात क्रिएटिव्ह 

नोव्हेंबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्ती या इतर व्यक्तींच्या तुलनेत वेगळा विचार करणाऱ्या असतात. कोणत्याही गोष्टीवर वेगळा विचार करणे अथवा प्रत्येक गोष्टीला एक वेगळा अँगल देणे या व्यक्तींसाठी अजिबात कठीण नाही. प्रत्येक गोष्टीत या व्यक्ती क्रिएटिव्ह असतात आणि दिलेले प्रत्येक काम हे अत्यंत रचनात्मक स्वरूपात करणे या व्यक्तींना अधिक आवडते. अभ्यासापासून ते ऑफिसमधील कामापर्यंत प्रत्येक ठिकाणी या व्यक्ती आपला वेगळेपणा आपल्या विचारांमुळे जाणवून देतात. त्यामुळेच नोव्हेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती प्रत्येक ठिकाणी आपली वेगळी ओळख निर्माण करतात. 

स्वभावाने असतात अत्यंत मेहनती 

November Born Personality – Instagram

ज्या व्यक्तींचा जन्म नोव्हेंबर महिन्यात होतो त्या व्यक्ती स्वभावाने अत्यंत मेहनती असतात. तसंच कोणत्याही कामात आपल्याकडून 100% देण्याचा प्रयत्न या व्यक्ती करतात. हातात घेतलेले कोणतेही काम पूर्ण केल्याशिवाय या व्यक्ती मागे हटत नाहीत. कितीही वेळा अपयश आले तरीही यश मिळेपर्यंत या व्यक्ती लढत राहतात हे या व्यक्तींचे वैशिष्ट्य आहे. मेहनतीपासून कधीही मागे हटत नाहीत. त्यामुळेच या व्यक्ती नेहमी उशीरा का होईना पण यशाच्या शिखरावर आरूढ होतात. तर कामाच्या ठिकाणीही अशाच व्यक्तींना लीडरशिप करण्याची संधीही नेहमी प्राप्त होते. 

नात्यात अत्यंत विश्वास असतात नोव्हेंबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्ती 

नोव्हेंबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्ती हा अत्यंत विश्वासू असतात. कोणतेही नाते निभावण्याची वेळ येते तेव्हा या व्यक्ती आपल्याकडून संपूर्ण झोकून देतात. प्रेम असो, मैत्री असो अथवा विवाह असो कोणत्याही नात्यात या व्यक्ती साथ सोडून जात नाहीत. मैत्री आणि नाते सांभाळण्याची वेळ येते तेव्हा नोव्हेंबरमध्ये जन्म घेतलेल्या व्यक्तींसारखी व्यक्ती कुठेच मिळणार नाही. प्रेमात कधीही या व्यक्ती विश्वासघात करत नाहीत. तसंच मैत्रीमध्येही कधीच या व्यक्ती मागे बोलून मित्रांना धोका देत नाहीत. जे आहे ते तोंडावर बोलून मोकळ्या होतात. समोर खरं बोलून एखाद्याचं मन दुखावणं यांना मान्य असतं, पण मागून एखाद्याला त्रास देणं या व्यक्तींना कधीच मान्य नसतं आणि म्हणूनच यांना अनेक मित्रमैत्रिणी असतात. 

भावुकतादेखील असते अति प्रमाणात 

ज्या व्यक्ती नोव्हेंबरमध्ये जन्म घेतात त्या जास्त प्रमाणात भावनिक असतात आणि कोणत्याही गोष्टीवर कधीही भावुक होतात. यांचा हा भावनिक स्वभाव बरेचदा त्यांच्यासाठी समस्या निर्माण करताना दिसून येतो. कोणत्याही समस्या सोडविणे अथवा योग्य सल्ला देणे हे यांचे वैशिष्ट्य असले तरीही स्वतःचा स्वभाव भावनिक असल्यामुळे खऱ्या गोष्टी माहीत असूनही भावनेच्या भरात अनेकदा चुकीचे निर्णयही घेतात. विश्वासघात या व्यक्तींना सहन होत नाही. पण यांच्या भावनिक स्वभावामुळेच अनेकदा जवळची माणसे यांचा फायदा घेऊन विश्वासघात करतात. 

वेगळ्या विचारांची माणसे 

नोव्हेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती या नेहमीच वेगळ्या विचारामुळे इतरांपेक्षा विशिष्ट ठरतात. या व्यक्ती दयाळू असतात. पण राग आल्यानंतर या व्यक्तींना आवरणे शक्य नसते. त्यामुळे समोरच्या व्यक्ती त्यांना चुकीचं ठरवून आणि त्यांच्याबाबत गैरसमज करून मोकळ्या होतात. अनेकांना यांच्याबाबत वाटते की या व्यक्ती स्वार्थी आहेत पण खरंतर या व्यक्ती ज्यांना आपलं मानतात त्यांच्यासाठी कधीही मरायलादेखील तयार असतात. आपली दुःख सांगत फिरणं या व्यक्तींना अजिबात आवडत नाही. नव्या व्यक्तींवर विश्वास ठेवणं यांना कठीण जातं. तर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव यांना पटकन कळतो आणि माणसं ओळखण्यात या व्यक्ती हुशार असतात. प्रत्येकाशी मिळवून जुळवून घेण्याचा यांचा स्वभाव असतो. जितक्या भावनिक तितकाच कर्मठ असा स्वभाव असतो.  

तुमचाही जन्म नोव्हेंबरमध्ये झालाय का? तुमच्या जवळच्या व्यक्ती असतील नोव्हेंबरमधील तर करा टॅग आणि जाणून घ्या त्यांचा स्वभाव. 

Leave a Comment