टॉयलेटमध्ये मोबाईलचा वापर करणे योग्य की अयोग्य, घ्या जाणून

काही माणसं अशी आहेत जी फोनशिवाय राहूच शकत नाहीत. अगदी टॉयलेटला जातानाही आपला मोबाईल आत घेऊन जाणारी माणसं तुम्ही पाहिली असतील. जेवताना, उठता बसताना मोबाईल कायम हातात असणारी माणसं ही नक्कीच मोबाईलच्या पूर्णतः आहारी गेलेली असतात. पण टॉयलेटमध्ये मोबाईलचा वापर करणे (Why We Should Not Use Mobile In Toilet) कितपत योग्य आहे? यावर अनेक जण हुज्जत घालताना आपण पाहिले आहेत. बरं तुम्ही पण या यादीत आहात का? पण एका शोधानुसार टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाणे हे अयोग्य असल्याचे सांगण्यात आले आहे. यामागे नक्की काय कारण आहे आणि रिसर्चमधून काय सांगण्यात आले आहे, हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. 

टॉयलेटमध्ये मोबाईल का वापरू नये 

सौजन्य – Freepik.com

PR News Wire द्वारे प्रकाशित एका जर्नलनुसार, टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने स्वच्छतेची कमतरता राहते आणि बॅक्टेरिया आणि व्हायरस अधिक प्रमाणात पसरण्याचा धोका असतो. ही गोष्ट समजून घेण्यासाठी साधारणतः 1,100 व्यक्तींचे सर्व्हेक्षण करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे ज्या व्यक्तींचे सर्व्हेक्षण केले त्याच व्यक्तींनी मोबाईल टॉयलेट मध्ये वापरणे योग्य नाही असे सांगितले. 2016 मध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार 41 टक्के ऑस्ट्रेलियामधील व्यक्ती (Australians) या शौचालयात आपल्या मोबाईलचा उपयोग करत होते आणि त्यांच्या मोबाईलवर अनेक किटाणूदेखील सापडले आहेत. तर एका ब्रिटीश (British Research) अभ्यासानुसार, अन्य ठिकाणापेक्षा टॉयलेटमध्ये मोबाईल नेल्यावर स्मार्टफोनची स्क्रिन (Smartphone Screen) अधिक खराब होत असल्याचे दिसून आले. बॅक्टेरियासारख्या (Bacteria) अनेक कारणांमुळे आणि मानसिक स्वास्थ्यही बिघडण्याच्या दृष्टीने मोबाईल टॉयलेटमध्ये घेऊन जाणे चुकीचे आहे. 

पडण्याचीही भिती 

शोधामध्ये देण्यात आलेल्या कारणाशिवाय टॉयलेटमध्ये मोबाईल पडण्याचाही धोका असतो. वास्तविक फोन वापरता वापरता पकड कधी सैल होते हे कळतही नाही आणि अचानक टॉयलेटमध्ये फोन पडल्याच्याही अनेक घटना समोर आल्या आहेत. एकदा मोबाईल टॉयलेटमध्ये पडल्यानंतर तो कधीच तुम्ही वापरू शकत नाही. यामध्ये जाणारं पाणी, बॅक्टेरिया आणि लागलेली घाण यानंतर तुम्ही हा मोबाईल पुन्हा वापरण्याचे धाडसही करू शकणार नाही. याशिवाय तुम्ही मोबाईलमध्ये अधिक गुंतता आणि तुम्ही ज्या कामासाठी टॉयलेटमध्ये गेलात त्याकडे तुमचे दुर्लक्ष होते आणि पोट साफदेखील होत नाही. याचे प्रमाणही अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. 

त्यामुळे ही महत्त्वाची कारणं आहेत ज्यामुळे तुम्ही टॉयलेटपासून मोबाईल लांब ठेवणे गरजेचे आहे. तुम्हालाही ही घाणेरडी सवय असेल तर तुम्ही ती वेळीच बदला आणि सावध व्हा!

Leave a Comment