प्लास्टिकच्या बाटल्यांवर लाईन्स का असतात, जाणून घ्या

शाळा, महाविद्यालय, कार्यालय अथवा कुठेही आणि कोणत्याही ठिकाणी आपल्याला प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीची (Plastic Water Bottle) गरज भासते. कधीकधी घरातून पाण्याची बाटली विसरल्यानंतर आपल्याला बाहेरून पाण्याची बाटली कधी ना कधीतरी घ्यावीच लागते. कोणत्याही कंपनीची पाण्याची मोठी बाटली बघितल्यानंतर आपल्याला त्यावर मध्यभागी काही आडव्या लाईन्स दिसतात. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवर नेहमी लाईन्स का बरं असतात? पाण्याच्या बाटल्या सहसा प्लेन नसतात. त्यावर लाईन्स अथवा कोणते ना कोणते तरी डिझाईन्स दिसून येतेच. पण मग असं का? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या लेखातून नक्की मिळेल. याबाबत असणारी मजेदार गोष्ट आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 

मजबूत पकड 

वास्तविक आपण कोणतीही प्लेन वस्तू हातात पकडली की ती पटकन घसरून पडते. त्यामुळे प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीवर पकड मजबूत करण्यासाठी या लाईन्स असतात. आपल्या हाताची पकड या लाईन्समुळे बाटलीवर अगदी घट्ट होते आणि बाटली सरकून पडत नाही. अर्थात लाईन्सच असायला हवे असेही नाही. कोणतेही डिझाईन्स असले तरीही पकड मजूबत होण्यास मदत मिळते. पण अधिक बाटल्यांवर आपल्याला लाईन्स दिसून येतात हेदेखील तितकेच खरे आहे. 

प्लास्टिकचा दर्जा (Plastic Quality)

सौजन्य – Freepik

ज्या प्लास्टिकच्या बाटलीचा आपण वापर करतो ते अत्यंत सॉफ्ट अर्थात मुलायम प्लास्टिकपासून बनलेले असते, जे लवचिक असते आणि दोन – तीन वेळा वापरल्यानंतर ते खराब होते. त्यामुळे अशा बाटल्या अत्यंत तकलादू असतात आणि त्यावरील अशा लाईन्स बाटलीला थोडे मजबूत करण्यास फायदेशीर ठरतात. तुम्ही पाहिले असेल की काही व्यक्ती या प्लास्टिकच्या बाटल्या हाताने तोडून टाकतात. तर या बाटल्यांचा दर्जा हा अत्यंत हलका असतो. 

स्टाईल आहे मुख्य कारण (Style is Main Reason)

बाजारातील प्रत्येक वस्तू ही त्याच्या स्टाईल आणि त्याच्या पॅकिंगनुसार विकली जाते. मग ते कोणतेही उत्पादन असो. त्यामुळे प्लास्टिकच्या बाटलीवर लाईन्स असण्याचे मुख्य कारण याची स्टाईल हेदेखील आहे. या लाईन्स पाण्याच्या बाटलीला अधिक स्टायलिश दिसण्यास फायदेशीर ठरतात. आजकाल वेगवेगळ्या डिझाईन्सदेखील दिसून येतात. पण तरीही लाईन्स असणाऱ्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या या अधिक प्रमाणात दिसून येतात हे नक्की. 

कशी वाटली ही मजेशीर माहिती तुम्हाला? आम्ही तुम्हाला वेगवेगळी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला आमचे लेख चांगले वाटत असतील तर नक्की शेअर करा. आता तुम्हीदेखील पाण्याची बाटली घेताना लाईन्सच्या बाबतीत नक्कीच निरीक्षण करू शकता आणि आमच्या लेखाशी सहमत होऊ शकता. 

Leave a Comment