किरण आणि विकासने मारली ‘बाजी’, आली रे आली आता टीम A ची बारी…

बीग बॉस मराठीमधील (Bigg Boss Marathi) मंगळवारचा ‘सी-सॉ’ टास्क चांगलाच रंगतदार ठरला. बीग बॉसच्या टास्कमधील ‘बाप’ मानल्या जाणाऱ्या खूर्ची टास्कचं एक नवं व्हर्जन काल पाहायला मिळालं. या सिझनमध्ये खूर्ची ऐवजी सी-सॉ ठेवण्यात आला होता. मात्र खेळाचे बाकी स्वरुप सारखेच होते. एका टीमच्या सदस्यांनी दुसऱ्या टीमच्या २ सदस्यांना सर्व प्रकारे त्रास देऊन उठवायचं आणि एलिमीनेट करायचा असा हा टास्क होता. या टास्कमध्ये टीम B च्या किरण माने आणि विकास सावंत या स्पर्धकांनी चांगलीच बाजी मारली. टीम A च्या सदस्यांकडून खूप जास्त प्रमाणात टॉर्चर सहन करुनही किरण आणि विकास शेवटपर्यंत टिकून राहिले आणि त्या फेरीचे ‘हिरो’ ठरले.

अपूर्वाने काढली का पर्सनल खुन्नस?

कालच्या संपूर्ण टास्कमध्ये अपूर्वा नेमळेकर आपल्या टीममेट्स सोबत प्रतिस्पर्धी किरण माने आणि विकास सांवतला टार्गेट करत होती. मात्र खेळापलीकडे जाऊन ती मानेंवर पर्सन कमेंट देखील करताना दिसली. ”माने तुम्ही बाहेर काय आहात ते आम्हाला सगळ्यांना माहितीये, तुम्हाला स्त्रियांचा आदर करता येत नाही, तुम्हाला आधीच्या शोमधून का काढलं ते सगळ्यांना माहितीये…” अशाप्रकारच्या पर्सनल कमेंट अपूर्वा खेळादरम्यान करताना दिसली. ‘त्यामुळे अपूर्वा नक्की गेम खेळत होती की किरण माने वर पर्सनल खुन्नस काढत होती?’ असा सवाल सोशल मीडीयवर किरणचे फॅन्स करताना दिसत आहेत. हा टास्कच असा असतो की समोरच्या टीममधील स्पर्धकांचे मोराल तुम्हाला डाऊन करायचे असते, त्यांना जमेल त्या प्रकारे टॉर्चर करायचे असते आणि एक तर चिडायला लावून किंवा निराश करुन त्यांना गेम मधून क्विट करायला बाहेर पाडायचे असते…पण म्हणून एखाद्यावर कचरा फेकणे किंवा पर्सनल कमेंट्स करणे कितपत योग्य आहे, याची जोरदार चर्चा सोशल मिडीयावर होते आहे.

किरण माने आणि विकास सावंत कालच्या टास्कमध्ये चांगले खेळले यात काहीच शंका नाही पण किरणने शिव्या देणं टाळलं पाहिजे होतं असंही लोक बाहेर म्हणत आहे. रोहितने केलेलं वर्तन हे कितीही चिड आणणारं असलं, तरी त्याची प्रतिक्रिया म्हणून मानेनी दिलेली घाणेरडी शिवी आम्हाला मान्य नाही… अशा प्रतिक्रिया लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसत आहेत.

टीम B मधून काल केवळ किरण आणि विकासनेच त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स दिला. त्या तुलनेच यशश्री आणि प्रसाद जवादे खेळात जास्तवेळ तग धरु शकले नाहीत. त्यांनी काही वेळातच हार मानली. त्यामुळे किरण आणि विकासने काल खऱ्या अर्थाने बाजी मारली असं म्हणायला हरकत नाही.

आज म्हणजेच शनिवारी टीम A ला हा टास्क खेळायचा आहे. तर टीम B च्या सदस्यांना त्यांना त्रास द्यायचा आहे. त्यामुळे काला झालेल्या टॉर्चरचा माने आणि विकास पुरेपुर बदला घेणार की कोणती वेगळी स्टॅटर्जी वापरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. याशिवाय टीम A या टास्कमध्ये कशी परफॉर्म करतेय हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असणार हे नक्की.

‘ही’ जोडगोळी तुटणार का? 

विकास आणि मानेंची जोडी न आवडणारे घरात अनेक सदस्य आहेत.  घराबाहेरी अनेक प्रेक्षकांना ही जोडगोळी आवडत फारशी आवडत नाहीये. ‘’विकासने स्वत:चं स्वत: खेळलं पाहिजे, किरण माने यांच्या इशाऱ्यावर नाचणं विकासने बंद करायला हवं, माने विकासचा फक्त वापर करुन घेत आहेत..’’ अशा अनेक प्रतिक्रिया घरातील सदस्य आणि घराबाहेरील प्रेक्षक वर्गाकडून येत आहे. ‘’मानेंनी आल्या दिवसापासून विकासला खेळणं बनवलं आहे, विकासच्या खांद्यावर बंदूक ठेवून माने निशाणा साधत आहेत..’’ अशा प्रकारच्या प्रितिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत. किरण माने आणि विकास यांची जोडी वेळीच तुटली नाही तर विकास थेट घराबाहेर जाईल.. अशा चर्चाही सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. त्यामुळे येत्या काळात किरण माने आणि विकासची जोडगोळी कायम राहतेय की तुटतेय? आणि याचे काय परिणाम होतात? हे येणारी वेळच सांगेल.

हेही वाचा:

Leave a Comment