कपड्यांना इस्त्री करायला लागणार नाही जास्त वेळ, वापरा सोपे हॅक्स

आपले कपडे स्वच्छ असतील आणि इस्त्री केलेले असतील तर आपल्या व्यक्तित्वातही एक भारदस्तपणा आणि वेगळेपणा दिसतो. बरेचदा महिलांना घरात कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन असते त्यामुळे वेळ वाचतो. पण हाच वेळ खर्च होतो तो घरातील कपड्यांची इस्त्री करण्यात अर्थात कपडे प्रेस करण्यात (Cloths ironing). बऱ्याच घरांमध्ये आठवड्याचे कपडे एकत्र प्रेस करण्यात येतात. त्यामुळे महिलांनाही कंटाळा येतो. तसंच वेळ आणि बराच खर्चही होतो. पण तुम्हाला जर तुमचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचवायचा असेल तर काही सोपे हक्स आहेत. याच्या मदतीने तुम्ही कपड्यांना झटपट इस्त्री करू शकता. कसे ते आपण पाहूया. 

ड्रायरचा वापर करा (Use Dryer)

सौजन्य – Freepik.com

तुमच्या कपड्यांना जर हलक्याशा सुरकुत्या आल्या असतील आणि तुम्हाला स्मूद कपडा हवा असेल तर तुम्ही उगीच इस्त्रीचा वापर करू नका. इस्त्री काढून ती गरम करून प्रेस करण्यापेक्षा तुम्ही त्याऐवजी ड्रायरचा वापरदेखील करू शकता. तुम्हाला केवळ इतकंच करायचं आहे की, स्प्रे बाटलीच्या मदतीने कपड्यावर हलकेसे पाणी शिंपडा आणि मग ड्रायरचा वापर कार .ड्रायरच्या गर्मीमुळे कपड्यांवरील पाणी हे वाफेत बदलेल आणि त्यामुळे कपड्यांवर आलेल्या सुरकुत्या निघून जाण्यास मदत मिळेल. तुमचा वेळही वाचेल. 

रिंकल रिलीज स्प्रे चा करा वापर (Use Wrinkle Release Spray)

सौजन्य – Freepik.com

तुमचे कपडे अधिक सुरकुतलेले असतील आणि तुम्हाला तुमचा वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही स्प्रे बाटलीत पाणी घेऊन कपड्यांवर शिंपडा आणि मग इस्त्रीचा वापर करा. यामुळे पहिल्याच फटक्यात सुरकुत्या निघून जातील आणि कपड्यांना दोन तीन वेळा इस्त्री मारावी लागणार नाही. याशिवाय तुम्ही घरातच रिंकल रिलीज स्प्रे चा वापर करू शकता. यामुळे वेळ नक्की वाचतो आणि त्याशिवाय तुमची मेहनतही वाया जात नाही. 

योग्य पद्धतीने करा इस्त्री 

कपड्यांना इस्त्री करण्याचा क्रम लावल्यासदेखील तुमचा वेळ वाचू शकतो. बरेचदा अधिक सुरकुत्या आलेल्या कपड्यांना आधी इस्त्री करण्यात आल्याचं दिसून येतं. पण त्यासाठी इस्त्री अधिक गरम करावी लागते आणि मग इतर कपड्यांना इस्त्री करण्यासाठी वाट पाहावी लागते. त्यामुळे तुम्ही इस्त्री करताना पहिले लहान कपड्यांपासून सुरूवात करा, ज्यांना गरमीची अधिक आवश्यकता नाही. त्यानंतर जीन्सना इस्त्री करा. जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. 

कपड्यांना टांगा 

सौजन्य – Freepik.com

ही अत्यंत स्मार्ट आणि सोपी हॅक आहे. यामुळे इस्त्री करताना लागणारा वेळ हा अर्धा होईल. जेव्हा तुम्ही कपडे धुता तेव्हा हँगरवर सुकवा. शर्ट अथवा कॉटनचे टॉप तुम्ही हँगरवरच सुकवा. यामुळे कपड्यांवर जास्त सुरकुत्या पडणार नाही आणि इस्त्री करताना वेळ लागणार नाही. त्याशिवाय तुम्ही कपडे टांगूनही इस्त्री करू शकता. जे करणे अधिक सोपे होईल. 

या हॅक्सची मदत घ्या आणि तुमचे कपडे इस्त्री कमी वेळात करा. तुम्हाला यामुळे अधिक मेहनत करावी लागणार नाही आणि तुमचा वेळही वाचेल. 

स्किन पिअर्सिंगवर होणार नाही इन्फेक्शन, या गोष्टींची घ्या काळजी

प्लस साईज महिलांनी या टिप्स करा फॉलो आणि दिसा स्टायलिश

तुमच्या वॉर्डरोबमध्ये या साड्या असायलाच हव्यात

Leave a Comment