पेरी-मेनोपॉज म्हणजे काय, सुधारण्यासाठी टिप्स

आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक महिलांकडून मेनोपॉज (Menopause) लवकर आल्याच्या गोष्टी ऐकू येतात. यामध्ये आता हल्ली पेरिमेनोपॉज (Perimenopause) हा शब्दही ऐकू येतो.  पेरिमेनोपॉज म्हणजे काय तर ‘मेनोपॉजच्या आसपास’. तुमचे शरीर हे नैसर्गिकरित्या आता मेनोपॉजच्या जवळ तयार होत आहे हे सूचित करणारा हा काळ आहे. पेरिमेनोपॉजला मेनोपॉजल ट्रान्झिशन (Menopausal Transition) असेही म्हणतात. प्रत्येक महिलेचा हा काळ वेगवेगळ्या वयात असतो. कधीकधी 40 वर्षापासून मेनोपॉजचे संकेत दिसू लागतात. मासिक पाळीतील अनियमितता दिसून येऊ लागते. तर काही महिलांना हल्ली वयाच्या 35 वर्षानंतरही मेनोपॉज आल्याचे दिसून येत आहे. आपल्या शरीरातील अॅस्ट्रोजन पातळी, मुख्य हार्मोन हे पेरिमेनोपॉजदरम्यान असामान्य स्वरूपात वाढते आणि खाली येते. तुम्हालाही पेरिमेनोपॉजचे लक्षण दिसून येत असेल, जसे की, हॉट फ्लॅशेस, झोपेची समस्या अथवा तुमच्या योनीमध्ये कोरडेपणा येणे तर त्रास करून घेऊ नका. काही टिप्सचा वापर करा आणि स्वतःला यातून जपा. तुम्ही तुमच्या आयुष्यात काही बदल करून घ्या आणि पेरिमेनोपॉजपासून दूर राहा. 

दीर्घ श्वास घ्या

सौजन्य – Freepik.com

पेरिमेनोपॉजचा त्रास होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरूवात ही 5 वेळा दीर्घ श्वास (Take a Deep Breath) घेऊन करा. हे तुमच्या शरीरातील पॅरा सिम्पथेटिक नर्व्हस सिस्टिम अॅक्टिव्ह करण्यासाठी मदत करते आणि शरीराला आराम देते. त्यामुळे तुम्हाला मेनोपॉजच्या दिवसात जास्त त्रास होत नाही आणि तुमची जास्त चिडचिड होत नाही. 

गवतावर चाला 

सौजन्य – Freepik.com

सकाळी उठल्यानंतर साधारण अर्धा तास चपलांशिवाय गवतावर चाला (Walk on Grass). हे शरीरातील एंडोर्फिन मुक्त करण्यासाठी मदत करते. शरीरातील हॅप्पी हार्मोन असल्यामुळे तुम्हाला बरं वाटतं आणि तुम्ही पेरिमेनोपॉजच्या दिवसातही स्वतःला सकारात्मक ठेऊ शकता. 

स्मूदी प्या 

सौजन्य – Freepik.com

नाश्ता करताना तुम्ही कोको अँटिऑक्सिडंट अशी स्मूदी प्या. (Have Smoothie) कोको वॅलरिक अॅसिड आणि मॅग्नेशियमयुक्त असते जे शरीरातील तणावाची प्रक्रिया कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे तुम्ही किमान आठवड्यातून अशी स्मूदी प्यायल्यास तुम्हाला त्रास होणार नाही अथवा त्रास होणे कमी होईल. 

आळशीचे सेवन 

सौजन्य – Freepik.com

फळं, सलाड आणि स्मूदी तुम्ही खाणार अथवा पिणार असाल तर त्यात तुम्ही एक चमचा आळशी मिक्स करावी. यामध्ये फायटोअॅस्ट्रोजनचे प्रमाण असल्यामुळे पेरिमेनोपॉजचे लक्षण कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. तसंच तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलदेखील यामुळे कमी होते आणि तुम्हाला ताजेतवाने वाटते. 

राजगिरा लाडू 

सौजन्य – Freepik.com

संध्याकाळच्या वेळात जी भूक लागते तेव्हा तुम्ही एखादा राजगिरा लाडू (Rajgira Ladoo) खा. हाडांची मजबूती टिकवून ठेवण्यास आणि ऑस्टियोपोरोसिस रोखण्यासाठी याची मदत मिळते. ऑस्टियोपोरोसिस ही समस्या मेनोपॉजनंतर महिलांना अधिक त्रासदायक ठरते. 

एड्रेनल उत्तेजक चहा 

सौजन्य – Freepik.com

झोपण्यापूर्वी तुम्ही एड्रेनल उत्तेजक चहा प्या. तणाव सुधारण्यासाठी याची मदत होते आणि पेरिमेनोपॉजचे लक्षण रोखण्यासाठीही याची मदत होते. हा चहा नक्की कसा बनवायचा ते पण जाणून घ्या. 

साहित्य 

  • 1 इंच मुलेठी 
  • 1 इंच दालचिनी 
  • 1 चिमूटभर जायफळ 
  • 1 ग्लास पाणी 

करण्याची पद्धत 

  • एक ग्लास पाण्यात वरील सर्व साहित्य मिक्स करा आणि उकळून हे पाणी अर्ध होऊ द्या
  • त्यानंतर हे तयार झालेले पाणी प्या 

डोसा खा 

सौजन्य – Freepik.com

दुपारी जेवण्यासाठी तुम्ही फर्मेंटेड बाजरीचा डोसा (Bajra Dosa) का. यामध्ये कॅल्शियम, लोह अधिक असून तुमच्या शरीरातील एनर्जी पातळी आणि आतडीचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो. यामुळे पेरिमेनोपॉजचे लक्षण रोखण्यास मदत मिळते. 

तुमचे वय 45 पेक्षा अधिक असेल आणि तुम्हाला पेरिमेनोपॉजचे लक्षणाची जाणीव होत असेल तरत तुम्ही हे टिप्स नक्की वापरा आणि पेरिमेनोपॉजचे लक्षण कमी करण्यासाठी मदत घ्या. 

Leave a Comment