Vastu Tips: समृद्धी हवी असेल तर घराच्या दक्षिणेला ठेवा या गोष्टी

घराच्या दक्षिण दिशेला (South Side) कायम यमाची दिशा मानले जाते. दक्षिणेला यमाचा वास असतो असा समज आहे. तर दुसऱ्या बाजूला या दिशेला पितरांची दिशाही मानली जाते. त्यामुळे दक्षिण दिशेसाठी काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. अन्यथा घरात नकारात्मक ऊर्जा राहते असं म्हणतात. त्यामुळे दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये असंही म्हणतात कारण मृत्युनंतर शवाचे पाय हे यमाच्या बाजूला अर्थात दक्षिण दिशेला असतात. यानुसार घरात दक्षिण दिशेला काही वस्तू न ठेवणंही अधिक चांगले. वास्तुशास्त्रानुसार जर दक्षिणेला काही गोष्टी तुम्ही ठेवल्या असतील तर तुमच्या घरात नक्कीच समृद्धी सुख समाधान राहील असं मानले जाते. त्यामुळे दक्षिण दिशेला नक्की काय ठेवता येईल याबाबत महत्त्वाची माहिती. 

फिनिक्स पक्ष्याचा फोटो (Phoenix Bird Photo)

Phoenix Bird Photo – Freepik.com

वास्तुनुसार घरात काही फोटो लावणं हे शुभ मानले जाते. त्यापैकीच एक फोटो म्हणजे फिनिक्स पक्ष्याचा फोटो. हा फोटो घरात लावणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरात समृद्धी येते. दक्षिण दिशेला हा फोटो लावल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि हा फोटो सकारात्मकतेला अधिक आकर्षित करतो असं म्हटलं जातं. तुम्ही हा फोटो लिव्हिंग रूममध्ये लावल्यास याचा अधिक फायदा मिळतो. 

झाडू दक्षिण दिशेला ठेवावे 

Broom
Broom – Freepik.com

वास्तुशास्त्रानुसार, घरातील झाडूची योग्य दिशा म्हणजे दक्षिण. नेहमी दक्षिण दिशेला योग्य पद्धतीने झाडू ठेवावी. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळेच झाडूचा अपमान कधीच करू नये असंही म्हटलं जातं. झाडूच्या वास्तुच्या दिशेच्या बाबतीत सांगायचे झाले तर झाडू कधीही उत्तर – पूर्व दिशेला ठेऊ नये.  झाडू दक्षिण दिशेला ठेवल्यास, घरातील सुख शांती व्यवस्थित राहाते. 

जेड प्लांट (Jade Plant)

Jade Plant – Freepik.com

तुम्ही घरात धनलाभासाठी जर जेड प्लांट लावत असाल तर त्यासाठी दक्षिण दिशा ही योग्य मानली जाते. वास्तुमध्ये धनलाभासाठी जेड प्लांट आपल्या हॉल अथवा ड्रॉईंग रूमच्या दक्षिण पूर्व दिशेला ठेवण्याचा सल्ला देण्यात येतो. वास्तविक ही दिशा शुक्र ग्रहाची दिशा मानली जाते आणि या दिशेला जेड प्लांट ठेवल्याने समृद्धीची वाढ होते.

बेडचा वरील भाग दक्षिण दिशेला (Bed Side)

Bed Side – Freepik.com

वास्तुनासर जर तुम्ही बेडची दिशा अर्थात तुम्ही झोपणार त्याच्या डोक्याचा भाग दक्षिण दिशेला ठेवला तर हे शुभ ठरते. झोपण्यासाठी पूर्व आणि दक्षिण या दोन्ही दिशा चांगल्या मानल्या जातात. त्यामुळे झोपताना तुमचे डोके दक्षिण दिशेला असेल याची काळजी घ्या. यामुळे चांगले विचारही येतात आणि झोपही चांगली लागते. 

किमती सामान आणि दागिने (Valuable Things and Jewellery)

Valuable Things and Jewellery – Freepik.com

वास्तुनुसार, जर तुमच्या घराचे किमती सामान आणि दागिने हे घराच्या दक्षिण दिशेला ठेवले तर तुमच्या घरात कधीही धनाची कमतरता जाणवणार नाही. दागिने, पैशांची पेटी आणि अन्य महत्त्वपूर्ण विलेख तुम्ही दक्षिण दिशेच्या कोपऱ्यात ठेवावे. वास्तुशास्त्रानुसारस या दिशेला ठेवण्यात येणाऱ्या कोणत्याही किमती वस्तूंची किंमत ही दुपटीने वाढते, जे तुमच्या घरातील समृद्धीचे संकेत आहेत. 

विशेष सूचना – आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेला बढावा देत नाही. तर वास्तुशास्त्र हे अन्य शास्त्राप्रमाणे अभ्यासातील एक शास्त्र आहे. त्यानुसार अभ्यास करून या गोष्टी देण्यात आल्या आहेत याची नोंद घ्यावी. 

Leave a Comment