बेडरुममध्ये अशी आणा पॉझिटिव्हिटी

 घरात आल्यानंतर आपल्या बेडवर येऊन पाठ टेकवण्यापेक्षा अधिक सुख ते काय असते. त्यामुळे घरातील बेडरुम हे असे ठिकाण आहे जे कायम स्वच्छ आणि नीटनेटके असायला हवे. हल्ली अनेकांकडे बेडरुम ही संकल्पना आहे. खास झोपण्याच्या जागेला आपण बेडरुम असे म्हणतो. बेडरुम हा रिलॅक्स होण्याचा रुम आहे. पण त्यासोबतच अनेक महत्वाच्या गोष्टी देखील आपण बेडरुममध्ये ठेवत असतो. नव्या जोडप्यासाठीही बेडरुमही जागा खूपच महत्वाची असते. तुमचा बेडरुम कसा असावा असे विचाराल तर तुमच्या बेडरुममध्ये पॉझिटिव्हिटी असावी. त्यासाठीच काही टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला जाणून घेऊया काही सोप्या गोष्टी

असावे ॲक्टिव्ह

आनंद हा कशातून मिळतो. चांगल्या वाचनातून, विचारातून आणि संगीतातून अगदी सोपा उपाय तुमच्या बेडरुममध्ये पॉझिटिव्हिटी आणेल तो म्हणजे सतत ॲक्टिव्ह राहणे. बेडरुमचा उपयोग केवळ झोपण्यासाठी करु नका. तर तुम्ही त्या खोलीत वाचा, नाचा आणि संगीत लावा. या सगळ्या गोष्टी तुमची खोली आनंदी करत असतात. तुम्हाला सतत आनंदी ठेवण्यासाठी मदत करत असतात. त्यामुळे हा पहिला बदल तुम्ही करायला हवा. 

घराची दारे खिडक्या उघडा

अशी आणा बेडरुममध्ये पॉझिटिव्हिटी ( सौजन्य : इन्स्टाग्राम )

काही जणांच्या खिडक्या आणि दरवाजे सतत बंद असतात. तुमच्या बेडरुमची दारं आणि खिडक्या किमान 15 मिनिटांसाठी तरी उघडी ठेवा. त्यामुळे तुमच्या बेडरुममध्ये प्रकाश येतो. येणारा वारा आणि बाहेर दिसणारे दृश्य हे थोडेफार का असेना आनंद देत असते.  त्यामुळे तुम्ही त्या खोलीत राहून तुमची दारं- खिडक्या उघडा आणि तुमची कामे करा. 

चित्र लावा

बेडरुममध्ये आल्यानंतर तुमच्या डोळ्यांना आनंद देणारी अशी चित्रे तुम्ही लावा. ही चित्रे लावताना त्यात निसर्ग किंवा तुमच्या काही आनंदी क्षणांचा समावेश असेल तर अधिक उत्तम कारण त्यामुळे जगण्याची एक नवी प्रेरणा तुम्हाला मिळत असते. त्यामुळे तुमच्या आवडीची चित्र लावायला विसरु नका. 

सिंगलबेडवर झोपा

बेडरुममध्ये अशी आणा पॉझिटिव्हिटी (सौजन्य : इनस्टाग्राम )

बेडरुम म्हटल्यावर बेड आलाच खूप जण मॅट्रेस जोडून झोपतात म्हणजे सिंगल मॅट्रेस जोडून त्याचा डबलबेड करतात किंवा सिंगल बेड जोडून डबल बेड करतात. असे मुळीच करु नका. कारण त्यामुळे नात्यात दुरावा येण्याची शक्यता असते. त्यामुळे एक मोठा डबल बेड आणि त्याच मापाची गादी असेल तर उत्तम. (शक्य असल्यास जोडप्यांनी एका उशीचा वापर केला तर ते अधिक चांगले)

या सवयी मोडा

बेडरुम ही झोपण्याची जागा आहे. खूप जणांना बेडवर बसून जेवण्याची सवय असते. ही सवय तुम्हालाही लागली असेल तर ती आताच मोडा. बेडरुमही जेवणाची जागा नाही. त्यामुळे बेडरुममध्ये शक्यतो जेवण न करणेच कधीही चांगले. 

या शिवाय बेडरुममध्ये तुटलेल्या गोष्टी, फिशटँक, अडगळ ठेवू नका. असे केले तर बेडरुममध्ये पॉझिटिव्हिटी टिकून राहिल. 

Leave a Comment