Sugar Addiction चे नेमके संकेत काय आहेत, जाणून घ्या

बऱ्याच जणांना शुगर क्रेव्हिंगचा (Sugar Craving) खूप जास्त सवय असते. शुगर क्रेव्हिंग अर्थात एखाद्या व्यक्तीला साखर खाण्याची इच्छा होणे. कधी कधी शुगर क्रेव्हिंग होणे हे अत्यंत कॉमन आहे. पण कधी कधी अनेक माणसांच्या बाबतीत हे नियंत्रणाच्या बाहेर जाते आणि केवळ क्रेव्हिंग न राहता, ते शुगर अॅडिक्शन अर्थात सवय होऊन जाते जे तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकते. शुगर क्रेव्हिंग (Sugar Craving) आणि शुगर अॅडिक्शन (Sugar Addiction) मध्ये नक्की काय अंतर आहे हे तुम्हाला माहीत आहे का? शुगर क्रेव्हिंग प्रत्येक माणसाला जाणवते पण त्याचा अर्थ असा नाही त्या व्यक्तीला सतत साखर खाण्याची सवय लागलेली आहे. कोणत्याही व्यक्तीला गोड खाण्यावर नियंत्रण राहिले नाही की, शुगर अॅडिक्शन झाले आहे हे हमखास समजावे. अनाहूतपणे अनेक व्यक्तींना मधुमेह, जाडेपणा आणि कॅन्सर अशा आजारांना सामोरे जावे लागते. वास्तविक या समस्येबाबत अनेकांना जाण नाही. त्यामुळे याबाबत तुम्हाला अधिक माहिती आम्ही सांगत आहोत. 

भूक नसतानाही गोड खाणे 

सौजन्य – Freepik.com

तसं तर हलकी भूक लागल्यानंतर आपण काही ना काही तरी खातच असतो. पण ज्या व्यक्तींना शुगर अॅडिक्शन असते त्या व्यक्ती भूक लागली अथवा नाही लागली तरी त्यांना काही ना काही गोड खायची सतत इच्छा होत असते. त्यांना सतत अशी इच्छा होत असल्यामुळे त्यांना साखर खाण्याची सवय लागते. 

प्रत्येक जेवणानंतर गोड खाणे 

अनेकदा जेवल्यानंतर गोड पदार्थ खाल्ला जातो. पण असं प्रत्येकवेळी प्रत्येकाला वाटतंच असं नाही. रोज घरी आपण तसं करत नाही. बरेचदा हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण गोड मागवतो पण घरी अजिबात रोज खात नाही. पण तुम्हाला घरीदेखील रोज जेवल्यानंतर गोड खाण्याची इच्छा होत असेल तर नक्कीच हा शुगर अॅडिक्शनचा संकेत आहेत. त्यामुळे वेळीच तुम्ही सावध होण्याची गरज आहे. 

हाय कार्ब फूड खाणे आवडणे 

जेव्हा शुगर क्रेव्हिंग (Sugar Craving) आणि शुगर अॅडिक्शन (Sugar Addiction) बाबत बोलायचे झाले तर, अशा व्यक्ती केवळ गोड खाण्याबाबतच बोलतात. पण साखर आपल्या शरीरात ग्लुकोजचे काम करते आणि इंधनासारखे याचे काम होते. हे ग्लुकोज सर्व पद्धतीच्या कार्बोहायड्रेटबेस्ड पदार्थांमधून प्राप्त होते. विशेषतः रिफाईंड कार्बोहायड्रेट शरीराद्वारे अत्यंत लवकर आणि सोप्या पद्धतीने साखर पसरते. त्यामुळे शुगर क्रेव्हिंग निघून जाते. याच कारणामुळे साखरेची सवय अधिक असणाऱ्या व्यक्तींना हाय कार्ब फूड अधिक प्रमाणात आवडते. 

तोंडाची चव निघून जाणे 

सौजन्य – Freepik.com

आपल्या शरीरात होणारे बदल हे काही वेळाने स्वीकारले जातात. अशा वेळी तुमच्या चवीचादेखील त्यामध्ये समावेश होतो. जेव्हा व्यक्तीचे शुगर क्रेव्हिंग्ज वाढते तेव्हा अधिक प्रमाणात साखर खाल्ली जाते. अशावेळी टेस्ट बड्स (Test Buds) काही काळातच साखरेच्या चवीसाठी असंवेदनशील होतात. जसजसे तुम्ही साखर खात राहाता, तसं तुमची साखर अधिक खाण्याची गरज वाढत आणि मग पुन्हा साखर खाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे जर तुम्हाला फळ गोड लागत नसेल अथवा तुम्हाला तुमच्या चहा आणि कॉफीमध्ये अतिरिक्त साखर घालण्याची गरज भासत असेल तर हे तुम्हाला शुगर अॅडिक्शन असण्याचे संकेत आहेत. 

जेवण जेवल्यानंतर पोट फुगणे 

असं तर पोट फुगण्याची अनेक कारणं असू शकतात. पण याचे प्राथमिक कारण म्हणजे तुमच्या पचनशक्तीमध्या साखरेचे फरमेंटेशन असणे. अधिक साखर ही तुमच्या पचनक्रियेला बाधित ठरते. त्यामुळे काहीही खाल्ल्यावर पोट फुगल्याचा त्रास होतो. तुमच्यासह असं होत असेल तर तुम्हाला साखर अधिक खाण्याची सवय लागल्याचे संकेत आहेत. 

तुम्हालादेखील असे संकेत दिसून येत असतील तर तुम्ही वेळीच सावध व्हायला हवे. त्यामुळे वेळीच तुम्ही या सवयीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. 

मधुमेही रूग्णांसाठी पोहे वा इडली काय आहे योग्य पर्याय

या बेकिंग टिप्स वापरा आणि राहा निरोगी

विषाणूजन्य आजारांचे वाढते प्रमाण, सणासुदीच्या काळात चिंतेचे वातावरण

Leave a Comment