Period Smell: मासिक पाळीत येत असेल अधिक दुर्गंध तर टाळा या चुका

मासिक पाळीदरम्यान दुर्गंध येणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. पण काही वेळा हा दुर्गंध अधिक वाढीस लागतो आणि त्यामुळे अनेक महिलांना लज्जास्पद वाटते. पण तुम्ही कधी यावर विचार केला आहे का? तुम्ही केलेल्या काही चुकांमुळेच तुम्हाला अशा गोष्टीला सामोरे जावे लागते. नक्की या चुका कोणत्या आहेत ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? तर त्यासाठी तुम्ही हा लेख नक्की वाचा. 

अधिक काळ एकच पॅड वापरणे (How Often Should You Change Your Pad)

सौजन्य – Freepik

अनेकदा महिला कितीतरी तास पॅड बदलत नाहीत. त्यामुळे दुर्गंध वाढीला लागतो. तुम्ही साधारण 4-5 तासाने तुमचे पॅड बदलायला हवे. काही वेळा बाजारातील पॅड्स हे मासिक पाळीतील वाहणारे रक्त नीट शोषून घेत नाहीत. त्यामुळे तुम्ही हे वेळीच काही तासात बदलणे गरजेचे आहे. ज्यामुळे दुर्गंध जास्त जाणवत नाही आणि त्याशिवाय पॅडमधून लीक होण्याची भीतीही राहात नाही. 

केमिकलयुक्त पॅडचा उपयोग (Why We Should Not Use Chemical Pads)

तुम्ही बाजारातून पॅड विकत घेता मात्र त्यामध्ये किती केमिकल अर्थात किती रसायन मिसळण्यात आले आहे याची माहिती वाचत नाही. केमिकलयुक्त अर्थात सेंटेड पॅड (Scented Pad). या पॅडमुळे दुर्गंध अधिक येतो कारण सेंटचा सुगंध आणि रक्ताचा दुर्गंध असे मिक्स झाल्यामुळे भयानक दुर्गंध निर्माण होतो. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान दुर्गंधीची समस्या होत असेल तर तुम्ही असे पॅड वापरणे बंद करा. खरं तर तुम्हाला पुढे त्रास होऊ नये यासाठी तुम्ही सहसा सेंटेड पॅड न वापरणे अधिक योग्य. यापेक्षा तुम्ही कॉटन अथवा मायक्रोफायबरपासून तयार करण्यात आलेल्या पॅड्सचा वापर करावा. यामध्ये केमिकल्सचा उपयोग करण्यात येत नाही. म्हणूनच हे सर्वात सुरक्षित पॅड आहे. तसंच सेंटेड पॅडमुळे अनेकदा इन्फेक्शनलादेखील सामोरे जावे लागते. 

घाणेरडी चड्डी अर्थात अंडरवेअरदेखील असू शकते कारणीभूत (Is Dirty Underwear Cause Smell)

बरेचदा मासिक पाळीदरम्यान पॅडमधून रक्त बाहेर येते आणि त्याचे डाग अंडरवेअरलादेखील लागतात. ही अशी खराब झालेली पँटी (panty) अर्थात अंडरवेअर वेळीच बदलण्यात न आल्यास, दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे याकडे महिलांनी विशेष लक्ष पुरविणे गरजेचे आहे. वेळोवेळी वॉशरूमला गेल्यानंतर तुम्ही हे तपासून पाहायला हवे. तसंच नेहमी मासिक पाळीदरम्यान कॉटनची अंडरवेअरच घालावी. कारण येणारा घाम आणि हवा यासाठी कॉटनची अंडरवेअर उपयुक्त ठरते. त्वचेला इन्फेक्शन होण्यापासून वाचविण्यास मदत करते. 

दुर्गंधीपासून वाचण्याची पद्धत (How to Get Rid Of Stink)

सौजन्य – Freepik

मासिक पाळीदरम्यान दुर्गंधीपासून वाचण्यासाठी सर्वात चांगी पद्धत म्हणजे मेन्स्ट्रूअल कपचा उपयोग (Use Of Menstrual Cup) करणे. हे अत्यंत हायजिनिक असून महिलांसाठी फायदेशीर आहे. यामुळे अजिबात दुर्गंधीचा त्रास होत नाही. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कमीत कमी 6 तास याचा वापर करता येतो. याचा उपयोग केल्यानंतर फेकून देण्याचीही गरज भासत नाही. केवळ वापरून त्याची योग्य काळजी घेऊन पुन्हा वापरता येतो. 

या गोष्टीची काळजी घ्या 

  • पॅडचा वापर करण्यापूर्वी सर्वात आधी हात नक्की धुवा. यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका कमी होतो 
  • पॅडच्या ऐवजी तुम्ही टॅम्पॉनचाही उपयोग करून घेऊ शकता. यामुळे दुर्गंध येत नाही 
  • वैयक्तिक हायजीनची देखभाल करण्यासाठी प्युबिक हेअर नियमित स्वच्छ करा. विशेषतः मासिक पाळीच्या आधीच तुम्ही प्युबिक हेअर (Pubic Hair) काढून घ्या

तुम्हाला या लेखातील टिप्स आवडल्या असतील तर तुम्ही नक्की याचा वापर करा आणि हा लेख शेअर करायला विसरू नका. 

Leave a Comment