मानसिक आरोग्य ढासळल्याने कोविड-19 नंतर ऑस्टिओपोरोसिसच्या प्रकरणांमध्ये वाढ

गेल्या वर्षांच्या कोविड 19 महामारीचा परिणाम आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावरही झाला आहे. लॉकडाऊननंतर अनेक रुग्ण मधुमेह, पीसीओडी/पीसीओएस, गुडघे आणि सांधेदुखीच्या तक्रारीने घेऊन रुग्णालयात दाखल होत आहेत. यामध्ये ऑस्टिओपोरोसिस (World Osteoporosis Day – 20 Oct) देखील आता पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात वाढला आहे. यामध्ये हाडांची घनता कमी होते तसेच हाडे कमकुवत होतात तसेच फ्रॅक्चर होतात. 

मागील दोन वर्षांत १०० हून अधिक महिलांवर उपचार

सौजन्य – Freepik.com

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. विश्वजीत चव्हाण म्हणाले की, कोविड कालावधीत साथीच्या रोगाची लागण होईल या भितीने अनेकांनी उचाराकरिता रुग्णालयात येणे टाळले. घरी राहून अनेकांच्या मनात विविध विचार येत असल्याने लोक उपचारासाठी रुग्णालयात येण्यास घाबरत होते. अशा वेळी वेदना वाढल्यामुळे अनेकांना ऑस्टिओपोरोसिस झाल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन वर्षांत 100 हून अधिक महिला रुग्णांवर उपचार करण्यात आले, त्यापैकी बहुतांश 55 ते 75 वर्षे वयोगटातील महिला होत्या. त्या सर्वांना गुडघेदुखी आणि सांधेदुखीच्या मुख्य तक्रारी होत्या कारण लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या होत्या.

लोकमान्य रूग्णालयातील रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. नरेंद्र वैद्य म्हणाले की, तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस आहे हे कळणार नाही जोपर्यंत तुम्हाला काही वेदना, फ्रॅक्चर होत नाही. साधारणपणे तुमचा खुबा, मणका किंवा मनगट या भागांमध्ये अशाप्रकारच्या तक्रारी जाणवू शकतात. वयाच्या 25 व्या वर्षी तुमचे हाडांची घनता कमी होण्यास सुरुवात होते. जर तुम्ही ते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला नाही तर तुमच्या हाडांची घनता हळूहळू कमी होऊन तुमची हाडे अधिक ठिसूळ होतील. काही वेळा पडल्यामुळे हाडं तुटु शकतात.

ऑस्टिओपोरोसिस गंभीर 


सौजन्य – Freepik.com

जरी पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही  वयानुसार हाडांची घनता कमी होऊ लागते तेव्हा असे दिसून येते की रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांना अधिक प्रमाणात हाडांसंबंधीच तक्रारी जाणवतात. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता, हार्मोनल असंतुलन, बैठी जीवनशैली, धूम्रपान आणि अल्कोहोलचे अतिसेवन हे इतर कारणीभूत घटक आहेत. लोकमान्य रुग्णालयात ऑस्टिओपोरोसिससाठी (Osteoporosis) दररोज 50 किंवा त्याहून अधिक रुग्णांवर उपचार केले जातात, त्यापैकी 5% प्रकरणे खुब्याचे हाड, मनगटाच्या फ्रॅक्चरच्या, ऑस्टियोपोरोटिक फ्रॅक्चरने पिडीत असतात. पुरुषांच्या तुलनेत ऑस्टिओपोरोसिसच्या अधिक महिला रुग्णांवर उपचार केले गेले आहेत, असेही डॉ नरेंद्र यांनी स्पष्ट केले.

ऑस्टिओपोरोसिस गंभीर आहे कारण त्यामुळे फ्रॅक्चर होण्याचा धोका दुप्पट किंवा तिप्पटीने वाढतो. प्रतिबंध करणे, वेळीच निदान, योग्य उपचार आणि बरा आजाराबाबतची जनजागृती आवश्यक आहे. गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊनमुळे, अनेक लोक तपासणीकरिता रुग्णालयात जाऊ शकले नाहीत, परिणामी ऑस्टियोपोरोसिसच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

डॉ. चव्हाण पुढे म्हणाले, कोरोनाच्या या काळात तरुण पिढी आरोग्याबाबत खूप जागरूक दिसून आले. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे अनेक महिला शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अशा वेळी लोक उपचारासाठी उशिरा आल्याने त्यांचा त्रास वाढतो. सांधेदुखी किंवा गुडघेदुखीचा त्रास असूनही अनेकजण शस्त्रक्रिया टाळतात. अशा वेळी या रुग्णांचे समुपदेशन करावे लागते. कारण वेळीच निदान आणि उपचार केल्यास ऑस्टिओपोरोसिसचा धोका टळू शकतो. 

खराडी येथील मदरहुड रूग्णालयातील सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रितिका शेट्टी म्हणाल्या की, स्टिरॉइडच्या अतिवापरामुळे महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिसच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तणाव आणि त्यामुळे हार्मोनल असंतुलनामुळे हाडांची झीज किंवा ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो. सूर्यप्रकाशाचा अभाव आणि व्हिटॅमिन डी 3 आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांचे नुकसान होऊ शकते.

रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये दिसतोय ऑस्टिओपोरोसिसचा धोका

तुम्हालाही सतत लघ्वीला जावं लागतंय का, काय आहे कारण

स्तनाच्या कर्करोगासाठी इम्युनोथेरपी उपचार पद्धती अधिक प्रभावी

Leave a Comment