मुंबईतील ‘मुकेश मिल्स’ सर्वात भयावह जागा, भुतांच्या गोष्टींसाठी प्रसिद्ध

देशातील सर्वात मोठे आणि स्वप्नांचे शहर म्हणून मुंबई (Mumbai City) ओळखली जाते. मुंबईची नाईट लाईफ (Night Life) ही सर्वाधिक प्रसिद्ध आहे. याशिवाय भारताची आर्थिक राजधानी म्हणूनही मुंबईकडे पाहिले जाते. पण या मुंबईत अशा काही जागा आहेत, ज्याबाबत ऐकल्यानंतर धडकीच भरते. तसं तर मुंबईत फिरण्यासाठी अनेक जागा आहेत. देशी-विदेशी पर्यटक इथे फिरायला येतात. पण आम्ही या लेखातून तुम्हाला अशा एका जागेबाबत सांगत आहोत, जिथे जाण्यापासून लोकं घाबरतात आणि हाँटेड प्लेसेस (Haunted Places) पैकी ही एक जागा मानली जाते. 

मुकेश मिल्स (Mukesh Mills)

होय, मुंबईतील भयावह जागांमध्ये एक जागा आहे ती म्हणजे मुकेश मिल्स. मुंबईत ही जागा खूपच प्रसिद्ध आहे. या ठिकाणी हॉरर चित्रपटांचे (Horror Movies) चित्रीकरणही अनेकदा केले जाते. साधारण 160 वर्षांपासून ही जागा अशीच रिकामी आहे. सकाळच्या प्रकाशातही एकट्याने जाणं इथे शक्य होत नाही. मुकेश मिल्स 10 एकर्सपेक्षाही जागेत स्थित आहे. या जागेबाबत अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. पण त्यातही इथे अनेक आत्म्यांचा अनुभव आल्याचे अनेकांनी स्पष्ट केले आहे. इतकेच काय तर महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि बिपाशा बासू (Bipasha Basu) यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनाही या जागेची भिती बसल्याच्या कहाण्या आहेत. 

मुकेश मिल्समधील भुतांच्या अनुभवाच्या गोष्टी 

Mukesh Mills – Instagram

मुकेश मिल्समध्ये घडलेल्या घटनांच्या गोष्टी हा अत्यंत मनोरंजक आहे. असं म्हटलं जातं की, 1970 च्या आसपास या मिल्समध्ये कोणत्या तरी कारणाने आग लागली आणि त्यामध्ये अनेक लोकांचे जीव गेले होते. त्यावेळी आगीवर नियंत्रण आणण्यात आले होते. पण काही वर्षांनी पुन्हा एकदा या मिलमध्ये आग लागली आणि त्यामध्येही अनेक लोकांचे जीव गेले आणि त्यानंतर ही मिल बंद झाली. त्यानंतर या मिलचे रूपांतर हे अशा खंडरमध्ये झाल्याचे पाहायला मिळाले. पण यामध्ये जीव गेलेल्या व्यक्तींचे आत्मा अजूनही तडफडत आहेत अशा स्वरूपाच्या गोष्टी नेहमीच सांगितल्या जातात. 

भयपट चित्रपटांचे होते चित्रीकरण (Horror Movie Shooting)

मुकेश मिल्स पाहिल्यानंतर भीती वाटली नाही असं होतच नाही. तसंच बॉलीवूडमधील अनेक भयपट चित्रपट अर्थात हॉरर मुव्हीजचे चित्रीकरण या ठिकाणी करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन, बिपाशा बासू, कार्तिक आर्यन (Kartik Aryan), वरूण धवन (Varun Dhavan) यांनीही इथे चित्रीकरण केले आहे.  

का वाटते इथे भीती?

Mukesh Mills in the night – Instagram

इथे शूटिंग होत असले तरीही अनेक कलाकार इथे येऊन चित्रीकरण करण्यासाठी घाबरतात. अमिताभ बच्चन यांचे जुम्मा चुम्मा गाणे इथेच चित्रीत करण्यात आले होते. मात्र त्यावेळी इथे अनेक अशा घटना घडल्या होत्या जेव्हा इथे काहीतरी चुकीचे आहे याची जाणीव झाली होती असे सांगण्यात येते. तर वरूण धवन ‘बदलापूर’ (Badlapur) चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आला असता अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) हिलादेखील वाईट अनुभव आल्याचे सांगण्यात येते. तसंच चित्रीकरणादरम्यान क्रू मधील एक मुलगी अशा पद्धतीने वागली की सर्वच लोकांना भीती वाटली होती. तर बिपाशा बासूलाही इथे वेगळाच अनुभव आल्याची कथा आहे. 

दरम्यान या ठिकाणी आजही चित्रविचित्र आवाज येतात आणि रात्री कोणीही इथे जाण्याची हिंमत करत नाही असे सांगण्यात येते. ही जागा म्हणजे अत्यंत भयावह असून इथे एकट्याने जाण्याची कोणीही हिंमत करत नाही. समुद्रकिनारा आणि खंडर झालेली मिल असे हे समीकरण सगळ्यांसाठी गूढ आहे. 

आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. एक माहिती या स्वरूप या लेखातून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. समज आणि अनुभवांवरून ही माहिती देण्यात आली आहे. 

Leave a Comment