राजमा योग्य पद्धतीने शिजविण्यासाठी करा या सोप्या ट्रिक्स 

राजमा म्हटलं की, तोंडाला पाणी सुटतं. त्यातही राजमा चावल (Rajma Chawal) हे कॉम्बिनेशन तर प्रत्येक राज्यातील रेस्टॉरंट आणि ढाब्यात मिळतं. केवळ पंजाबी कम्युनिटीच नाही तर महाराष्ट्रीयन कुटुंबातही आता राजमा भात हा अत्यंत आवडीचा पदार्थ होतोय. पण प्रत्येकाला राजमा व्यवस्थित शिजवून बनवता येतेच असं नाही. राजमा रात्रभर भिजवून ठेवावा लागतो. तर काही जणांना राजमा शिजवायचा नक्की कसा हेदेखील कळत नाही. पण तुम्हाला कमी वेळात राजमा बनवायचा असेल तर यासाठी सोप्या ट्रिक्स आहेत. तसं तर 20 ते 30 मिनिट्स लागतात. पण तुम्हाला राजमा कमी वेळात बनवायचा असेल तर तुम्हाला आम्ही टिप्स सांगत आहोत.  

गरम पाण्यात रात्रभर भिजवा राजमा 

Rajma – Freepik.com

जेव्हा आपण बाजारातून राजमा आणतो तेव्हा ते कडक असतात, पण राजमा उकडून घ्यायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही रात्रभर गरम पाण्यात राजमा भिजवल्यास, तुम्हाला त्याचा चांगला परिणाम मिळतो. एका भांड्यात अधिक प्रमाणात पाणी घ्या. हे कोमटपेक्षाही अधिक गरम असायला हवे. त्यानंतर तुम्ही राजमा या पाण्यात भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी हा राजमा पाण्यासह प्रेशरकुकरमध्ये घाल आणि झाकण लावा. त्यानंतर गॅसवर ठेवा आणि 2 शिट्या होऊ द्या. तुमचा राजमा परफेक्ट उकडेल आणि अत्यंत चांगला शिजलेला राजमा स्वादिष्ट होईल. 

मिठाचा करा वापर 

ही ट्रिक वापरणे अधिक सोपी आहे. तुम्हाला कुकिंग ट्रिक (Cooking Trick) माहीत नसतील तर हे नक्की करून पाहा. राजमा शिजवताना तुम्ही मिठाचा वापर करा. खरं तर काही जण बेकिंग सोड्याचा वापर करतात. पण मिठाचा वापर केल्यास राजमा अधिक चांगल्या पद्धतीने आणि मऊ शिजतो. त्यासाठी तुम्ही मीठ, राजमा एकत्र पाण्यात घाला आणि शिजवा. यावेळी थंड पाण्याचा उपयोग करा. 

प्रेशर कुकरचा करा वापर 

तुम्ही राजमा पातेल्यात न उकडवता प्रेशर कुकरचा वापर करावा. यामुळे राजमा पटकन शिजतो आणि मऊ राहातो. या गोष्टी लक्षात ठेवा की, यामध्ये पाणी जास्त घालू नका. कारण पाणी जास्त असल्यास, राजम्याचा स्वाद बिघडतो. त्यामुळे प्रमाणात पाणी घालून तुम्ही राजमा प्रेशर कुकरमध्ये शिजवा. तसंच तुम्ही राजमा प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यानंतर झाकण उघडण्याची घाई करू नका. प्रयत्न करा की, प्रेशर कुकरमधून संपूर्ण वाफ निघून जाईल याची वाट पाहा आणि मगच झाकण उघडा. 

या गोष्टीची घ्या काळजी 

How to boil Rajma – Freepik.com
  • जेव्हा तुम्ही राजमा शिजवाल तेव्हा तुम्ही तो आधी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या 
  • राजमा सर्वात पहिले थंड पाण्यात 10 मिनिट्स भिजवून ठेवा. त्यानंतर वर सांगितल्याप्रमाणे रात्री गरम पाण्यात भिजवा 
  • राजमा शिजवताना बेकिंग सोडा वा खाण्याचा सोडा घालण्याची काही जणांना सवय असते. पण यामुळे पोट अधिक फुगते. त्यामुळे याचा वापर न करता मिठाचा वापर करण्यावर भर द्या

आम्हाला आशा आहे की, तुम्हाला हा लेख आणि यातील सांगितलेल्या ट्रिक्स नक्की आवडल्या असतील. तुम्हाला या लेखाबाबत काय वाटतंय हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. 

Leave a Comment