का नाव पडले कोल्हापूर, कोल्हापूर नावाचा मनोरंजक इतिहास

आपल्याला सर्वांना बाकी काही नाही आवडलं तरीही फिरायला मात्र नक्कीच आवडते. महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणं आहेत ज्याच्या इतिहास आपल्याला माहीत नसतो. आपण नेहमी या शहरांची अथवा गावांची नावं घेत असतो. पण कधीच विचार करत नाही की एखाद्या शहराला वा गावाला हे नाव नक्की का देण्यात आले. असंच महाराष्ट्रातील एक शहर म्हणजे कोल्हापूर (Kolhapur). अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय असं कोल्हापूर हे अंबाबाईच्या मंदिरासाठी ओळखण्यात येते. शहरातील खाणं-पिणं आणि आपल्या पारंपरिक कलांसाठीही हे कोल्हापूर प्रसिद्ध आहे. कोल्हापूर पाहण्यासाठी देशी विदेशी अनेक लोक येतात. पण या कोल्हापूर शहराला कोल्हापूर या नावाने कसे ओळखण्यात येऊ लागले तुम्हाला माहीत आहे का? या लेखातून आम्ही कोल्हापूरच्या या नावाबाबत खुलासा करणार आहोत. घ्या जाणून. 

कोल्हापूरचा इतिहास (History Of Kolhapur)

या शहराचे नाव कोल्हापूर का बरं झालं यासाठी सर्वात आधी आपण या शहराचा प्राचीन इतिहास जाणून घेऊ. या शहाराचा इतिहास हा अतिशय मनोरंजक आहे. हे शहर ब्रिटीश भारताच्या वेळी भारतीय मराठा समाजाचा भाग होता अर्थात मराठा समाजाची हुकूमत होती. त्यावेळी हा विभाग दख्खन विभागाच्या अंतर्गत होता. असं म्हटलं जातं की,मराठा साम्राज्याचा हा सर्वात महत्त्वपूर्ण असा चौथा भाग होता. 

कोल्हापूरचे प्राचीन नाव 

प्राचीन काळात आणि मध्यकाळात या शहराला अनेक नावांनी ओळखण्यात येत होते. या शहराला ‘दक्षिण काशी’ आणि ‘अंबाबाई’ या नावानेही ओळखण्यात येत होते. तर भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी हे शहर 19 तोफांची सलामी या नावानेही प्रसिद्ध होते. 

कोल्हापूर नाव कसे रूढ झाले?

पौराणिक मान्यतेनुसार या शहरात एक कोल्हासुर नावाचा राक्षस राहात होता. ज्याच्या अत्याचारामुळे स्थानिक लोक अत्यंत हैराण झाले होते. त्यावेळी गावातील लोकांनी महालक्ष्मी देवीचा धावा केला आणि तिला या राक्षसापासून आपली सुटका करण्यासाठी प्रार्थना केली. देवी प्रसन्न झाली आणि त्यानंतर कोल्हासुर आणि महालक्ष्मी यांच्यादरम्यान नऊ दिवस युद्ध चालले आणि यामध्ये कोल्हासुराची हार झाली. युद्ध हरल्यानंतर कोल्हासुराने माता महालक्ष्मीजवळ जाऊन एक वर मागितला तो असा की, आपल्या नावाने हे गाव ओळखण्यात यावे. त्यानंतर कोल्हासुराच्या नावाचा अपभ्रंश होत या गावाचे नाव कोल्हापूर असे झाले असा समज आहे. कोल्हापूर हे केवळ मंदिरासाठीच नाही तर तेथील चपलेसाठीही तितकेच प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी चप्पल ही अत्यंत प्रसिद्ध असून जगभरात या चपलेला मागणी आहे. 

कोल्हापूरच्या नावाचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. असेच काही वेगळे आणि माहितीपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तुम्हाला आवडल्यास, नक्की शेअर करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. 

प्रवासात नक्की कॅरी करा या महत्वाच्या गोष्टी

Cooking Hacks: आता पराठा होणार नाही चिवट, वापरा या सोप्या हॅक्स 

Leave a Comment