Charu Rajeev Divorce: ‘तो बदलेल असं वाटत नाही’ चारूने केला गंभीर आरोप

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) भावाच्या राजीव सेनच्या (Rajeev Sen) आयुष्यात सध्या चढऊतार सुरू आहेत. राजीवची पत्नी चारू असोपाने (Charu Asopa) त्याच्यावर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. एका मुलाखतीदरम्यान राजीवने आपण गरोदर असताना फसवणूक केली असल्याचे सांगून आपण त्यानंतरही त्याच्यावर विश्वास ठेवल्याचे सांगितले. गेले वर्षभर दोघांच्या नात्यात चढउतार चालू असून या दोघांनीही अनेक वेळा एकमेकांना फॉलो आणि अनफॉलो केले असून घटस्फोटाचा खेळच मांडला असल्याचे दिसून आले आहे. 

चारू असोपाने गरोदरपणादरम्यान काय झाले सांगितले 

गेल्या कित्येक महिन्यापासून चारू आणि राजीव (Charu and Rajeev divorce controversy) या दोघांची भांडणं अक्षरशः चव्हाट्यावर आली आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चारूने एका मुलाखतीत राजीवने आपण गरोदर असताना आपली फसवणूक केल्याचा आरोप आता लावला आहे. ‘मी गरोदर असताना राजीव मुंबईतील बांद्रा येथे आपल्या जिममध्ये जाण्यासाठी सकाळी 11 वाजता निघत असे आणि रात्री 11 वाजता घरी येत असे. कधी कधी 7,8,9 दरम्यानदेखील यायचा’. यावेळी प्रश्न विचारल्यावर राजीवने ट्रॅफिकचे कारण देत बांद्रामधील एका ठिकाणी कॉफी पित असल्याचे सांगितले. या त्याच्या उत्तरावर आपण विश्वास ठेवल्याचे चारूने सांगितले. पण त्यानंतर राजीवच्या बॅगेतून अशा गोष्टी सापडल्या की, राजीव आपल्याला फसवत असल्याचे चारूला समजले. यानंतर चारूने कुटुंबातील सदस्यांनाही याबाबतीत कल्पना दिल्याचे सांगितले. 

‘तो बदलेल असं वाटत नाही’ – चारू 

चारू असोपा आणि राजीव सेन यांचा 2019 जून मध्ये प्रेमविवाह झाला होता. पण काही महिन्यातच ही जोडी वेगळी होणार याची कुजबूज सुरू झाली होती. तर चारूने राजीवपासून वेगळे राहायलाही सुरूवात केली होती. मात्र त्यावेळी सर्व काही आलबेल असल्याचे राजीवने सांगितले होते. तर गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2022) दरम्यान या जोडप्याने सर्व काही विसरून आपली मुलगी झियाना (Ziana Sen) हिच्यासाठी एकत्र येण्याचे ठरवले. पण पुन्हा एकदा चारूने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि सांगितले की, ‘जे व्हायला नको तेच घडलं, राजीव पुन्हा त्याच चुका करत आहे आणि मला आता कळून चुकलं आहे की, काही गोष्टी कधीच बदलणार नाहीत, तो बदलेल असं वाटत नाही’ आणि याच गोष्टीमुळे आपण वेगळं होण्याचं ठरवले आहे. याशिवाय सह-अभिनेत्यांपासून ‘दूर राहा’ असे मेसेजही राजीवने आपल्याला पाठविल्याचे आरोप चारूने लावले आहेत. इथकंच नाही तर राजीवने आपल्यावर हात उचलला असून शिव्या दिल्याचाही आरोप चारूने काही दिवसांपूर्वी लावला आहे. 

राजीवने फेटाळले सर्व आरोप 

मात्र दुसऱ्या बाजूला राजीवने हे सर्व आरोप फेटाळून लावत आपल्याला घटस्फोट नको असून आपलं कुटुंब एकत्र राहावं यासाठीच आपला प्रयत्न आहे असेही सांगितले. पण चारूलाच घटस्फोट हवा आहे असंही त्याने सांगत सर्व आरोप फेटाळले आहेत. चारूचा स्वभाव हा अत्यंत अहंकारी आणि समजून न घेण्याचा असून यामध्ये चारूच्या मित्रमैत्रिणींनीही आगीत तेल ओतल्याचे सांगितले आहे. तसंच चारूने युट्युबच्या आयुष्यात बाहेर येऊन संसारातही लक्ष घालावं असंही म्हटलं होतं. 

सध्या चारू आणि राजीवचे एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप चालू असून रोज वेगवेगळी बाजू समोर येत आहे. मात्र या सगळ्यातही आपली मुलगी झियाना हिचा पहिला वाढदिवस (Ziana 1st Birthday) या जोडप्याने एकत्र साजरा करण्याचे ठरवले असल्याचेही सध्या सांगितले जात आहे. 

Leave a Comment