‘खेळ घटस्फोटाचा’, चारू असोपा आणि राजीव सेनचा पुन्हा तमाशा

सेलिब्रिटी आणि त्यांचे लग्न आणि घटस्फोट हा प्रेक्षकांसाठी एक चघळायचा विषयच असतो. पण काही सेलिब्रिटी याबाबत अत्यंत गंभीरपणाने बोलतात आणि हाताळतात तर काही सेलिब्रिटींसाठी स्वतःचं आयुष्य म्हणजे एक खेळ झाल्याचे दिसूने येते. अशीच एक जोडी म्हणजे चारू असोपा (Charu Asopa) आणि राजीव सेन (Rajeev Sen). लग्नाच्या एका वर्षाच्या आतच दोघांमध्ये बिनसल्याच्या चर्चांना सुरूवात झाली होती. लग्नाच्या काही महिन्यातच दोघांनी एकमेकांना अनफॉलो केले. पुन्हा फॉलो केले. असे तीन ते चार वेळा झाले. त्यानंतर चारूने मुलीला जन्मही दिला पण पुन्हा काहीतरी बिनसले आणि गोष्टी घटस्फोटापर्यंत जाऊन पुन्हा नीट झाल्या. मात्र आता पुन्हा घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि प्रेक्षकांनाही आता यांचे लग्न म्हणजे एक खेळच वाटू लागला आहे. 

लग्न आणि घटस्फोटाचा खेळ

सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिचा भाऊ राजीव सेन याने दोन वर्षांपूर्वी अभिनेत्री चारू असोपा हिच्याशी लग्नगाठ बांधली. पण काही महिन्यांपूर्वीच तिने आपल्याला फसवले आणि तिच्या पहिल्या लग्नाबाबत ताकास तूर लागू दिली नाही असा आरोप राजीवने केला होता. तर चारूनेही आपण कधीच राजीवकडे परत जाणार नाही असं सांगितलं होतं. मात्र काही दिवसातच दोघेही पुन्हा एकत्र दिसू लागले आणि पुन्हा व्लॉग करू लागले. लग्नानंतरच काही महिन्यांपासून दोघांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या होत्या. त्यावेळी चारून मोठ्यामोठ्या कविता लिहित आपल्या सोशल मीडियावर याची हिंट द्यायला सुरूवात केली होती. मात्र राजीवने आपल्यात सर्व काही आलबेल असून आम्ही एकत्र आहोत असं सांगितलं. तर काही महिन्यातच त्यांची मुलगी झियानाचाही जन्म झाला. पण पुन्हा दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. यावेळी आपल्या लहान मुलीसाठी दोघांनी योग्य निर्णय घ्यावा असंच त्यांच्या चाहत्यांना वाटत होते. त्यानंतर पुन्हा एकत्र येऊन पुन्हा काही दिवसातच एकमेकांना फॉलो करून आता कधीही परत न जाण्याचा निर्णय चारूने घेतला असल्याचे सांगितले आहे. मात्र हे लहान मुलांच्या बाहुला बाहुलीच्या खेळाप्रमाणेच खऱ्या आयुष्याचा खेळखंडोबा केला असल्याचे अनेकांना वाटत आहे.  

स्वतःचे करून घेतले हसे 

सेलिब्रिटी म्हणजे पब्लिक फिगर (Public Figure) हे जरी खरे असले तरीही गोष्टी इतक्या उघड करून चारू आणि राजीव दोघांनीही आपले हसे करून घेतले आहे. तर आता चारूने आपल्यावर राजीवने हिंसाचार केला असल्याचा आरोप केला असून राजीवने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. आधी जसं चारू खोटं बोलली तसंच आताही खोटं बोलत आहे असं राजीवने स्पष्ट केले आहे. मात्र यामध्ये त्यांच्या मुलीचे हाल होत असल्याचे सर्वांनाच स्पष्ट दिसून येत आहे. झियाना अजून एक वर्षाचीही झाली नाही आणि चारू आणि राजीवच्या या नात्यातील गुंतागुंतीमुळे सगळीकडेच हसं झाल्याचं दिसून येते आहे. चारू आणि राजीव दोघांनीही एकमेकांना अनफॉलो तर केलेच आहे. त्याशिवाय एकमेकांचे फोटोही काढून टाकले आहेत. त्यामुळे आता पुन्हा ही जोडगोळी नक्की काय करणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र त्या लहान मुलीसाठी या दोघांनी सर्व विसरून एकत्र राहावे असंच त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे हे नक्की! 

Leave a Comment