तळलेले तेल साठविण्याच्या टिप्स

तळलेले पदार्थ खाणे कोणाला आवडत नाही आणि त्यातही गरमागरम पुरी असेल तर सोने पे सुहागा! ताजी पुरी आणि श्रीखंड असो वा शिळी पुरी चहात बुडवून खाणे असो सर्व चविष्टच वाटते. चहा – कॉफी बरोबर तळलेल्या गरमागरम भजी, बटाटेवडे, पापड हे खाणंही खूपच जणांना आवडतं. पण या सगळ्या पदार्थांना तळण्यासाठी कढईत तेलही जास्त ओतावे लागते. पण हे सर्व पदार्थ तळून झाल्यानंतर या तेलाचं नक्की काय करायचं आणि ते कसं साठवायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. बरेचदा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भाजी बनविण्यासाठी हे तेल वापरले जाते. त्यामुळे हे तेल व्यवस्थित स्टोअर करणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा तेल खराब होते आणि या तेलाला एक विचित्र वासही येतो. सर्वात महत्त्वाचे पुरी तळण्यासाठी योग्य अंदाजाने तेल घ्या. उगीच कढई भरू नका आणि उरलेले तेल कशा पद्धतीने तुम्ही साठवा (How To Store Oil After Frying Food) याबाबत काही टिप्स. 

व्यवस्थित थंड होऊ द्या 

पदार्थ तळून झाल्यानंतर त्वरीत गरम तेल डब्यात भरू नका. तर हे तेल थंड होऊ द्या. बरेचदा घाईघाईत आपण कोमट तेलही डब्यात ओतून ठेवतो. पण यामुळे त्यातील गरमपणामुळे वाफ लागून राहाते आणि मग या वाफेचे पाणी होऊन ते तेलात पडते. त्यामुळे तुम्ही अशी चूक अजिबात करू नका. तेल संपूर्ण थंड झाल्यानंतरच जार अथवा डब्यात घालून स्टोअर करून ठेवा. यामुळे तेलाला ना वास येणार ना तेल खराब होणार. 

गाळल्याशिवाय कधीही तेल भरू नका 

How To Store Oil After Frying Puri – Freepik.com

अनेकजण ही चूक करतातच. तेल थंड करून भरले तरीही काही जण ते गाळल्याशिवाय डब्यात भरतात. त्यामुळे कोणताही तळलेल्या पदार्थाचा गाळही जमा राहातो. अर्थात पुरी तळताना यामधील पार्टिकल्स तेलात पडतात आणि ते खाली जमा होतात. तसंच तेल साठवायचे असल्यास, हे पदार्थ खराब झाल्याने तेलही खराब होते. त्याशिवाय हे तेल असंच वापरल्यास, फूड पॉईझनिंग (Food Poisoning) होण्याचाही धोका असतो. त्यामुळे तुम्ही पुरी तळलेले तेल स्टोअर करताना नेहमी गाळूनच स्टोअर करावे. केवळ पुरीच नाही तर वडा, भजी, पापड अशा अन्य पदार्थांच्या बाबतीतही हीच खबरदारी घ्यावी. 

तेल कसे गाळावे?

तसे तर बाजारामध्ये अनेक पद्धतीचे फिल्टर्स अथवा गाळणी असतात. मात्र तुम्ही हे तेल गाळण्यासाठी प्लास्टिक अथवा स्टीलच्या चाळणीचा वापर करू शकता. बारीक जाळीची चाळण घेऊन त्यातून हे तेल गाळून घ्या. यामुळे तेलातील बारीक कण अडकतील आणि व्यवस्थित तेल गाळून जमा होईल. तेल खराब होण्याची शक्यताही राहात नाही. तसंच किमान दोन ते तीन  वेळा हे तेल तुम्ही गाळून घ्याल याची खात्री करून घ्या. 

फ्रिजमध्ये कसे साठवाल तेल?

फ्रिज तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्येच गाळून घ्या आणि स्टोअर करून फ्रिजमध्ये ठेवा. पण फ्रिजमध्ये ठेवण्यापेक्षा तुम्ही तेल एअर कंटेनरमध्ये भरून स्वयंपाकघरातच ठेवा. कारण फ्रिजमध्ये प्रत्येक तेल व्यवस्थित राहीलच असं नाही. तसंच दुसरं कारण म्हणजे तुम्ही तेल फ्रिजमध्ये ठेवल्यास ते गोठेल आणि वापरण्यापूर्वी तुम्हाला काही तास आधी ते काढून ठेवावे लागेल. त्यामुळे सहसा फ्रिजमध्ये तेल ठेवले जाणार नाही हे पाहा. 

कधीपर्यंत करा स्टोअर?

How To Store Oil After Frying Puri – Freepik.com

हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. तुम्ही तेल जास्त काळ साठवून ठेऊ नका. तळलेले तेल हे जास्त काळ साठवू नये कारण त्यातून खराब वास येतो. तसंच तेलाचे टेक्स्चर अधिक चिकट होते. यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल अधिक वाढून त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे आठवड्याच्या आत हे तेल वापरून संपवून टाकावे.

फेकण्याच्या ऐवजी करा हे काम – 

तुम्हाला तळलेले तेल पुन्हा वापरायचे नसेल तर तुम्ही इतर पद्धतीने याचा पुन्हा वापर करू शकता. कशाप्रकारे ते घ्या जाणून – 

  • तुम्ही उरलेले तेल हे गंज लागलेल्या वस्तूंसाठी वापरू शकता. उदा. दरवाजावरील हुक्स, खिळे अथवा घरातील इतर सामानासाठी वापरावे 
  • उरलेले तेल फेकण्याऐवजी तुम्ही त्याचा वापर दिव्यासाठीही करू शकता. दिव्यासाठी लागणारे तेल तुम्ही या तेलातून वापरू शकता

अशा पद्धतीने तळलेल्या पदार्थांमधून वाचलेले तेल स्टोअर करावे. तुम्हाला या टिप्स नक्की आवडल्या असतील तर हा लेख नक्की शेअर करा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावर जाणून घ्यायचे असल्यास लेखाखाली कमेंट करून नक्की सांगा. 

Leave a Comment