घनदाट भुवया या प्रत्येक महिलेला हव्या असतात. आपल्या चेहऱ्याचा सर्वात महत्त्वाचा भाग भुवया (Eyebrows) मानल्या जातात. आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी याचा अधिक उपयोग होतो. भुवयांमुळे आपल्या लुकमध्येही फरक पडतो हे नाकारता येत नाही. आजकाल प्रत्येकाला सुंदर आणि घनदाट भुवया हव्या असतात. पण प्रत्येकाला अशा घनदाट भुवया मिळतातच असं नाही. काही जण तर आजकाल भुवया घनदाट दिसण्यासाठी (5 Easy Steps to Highlight your thin eyebrows) मायक्रोब्लेडिंग आयब्रोज (microblading eyebrows) करून घेतात. तुमच्याही भुवया पातळ असतील तर तुम्ही त्रस्त होऊ नका. आम्ही तुम्हाला तुमच्या पातळ भुवया घनदाट दिसण्यासाठी काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत. याचा वापर करून तुम्हीही तुमच्या भुवया सुंदर, आकर्षक आणि घनदाट बनवू शकता.
भुवया घनदाट करण्यासाठी स्टेप 1

सर्वात पहिले तुम्ही भुवयांना तुमच्या चेहऱ्यानुसार आकार द्या. लक्षात ठेवा की, जर तुमच्या भुवया जास्तच पातळ असतील तर तुम्ही यांना हायलाईट करण्यासाठी आयब्रो पेन्सिलचा (Eyebrow Pencil) वापर करावा अथवा जेल बेसचा वापर करावा. यामुळे तुमच्या भुवया घनदाट होतील. तसंच तुम्हाला अधिक खर्चही करावा लागणार नाही.
भुवया घनदाट करण्यासाठी स्टेप 2
जेल लावून झाल्यावर वा आयब्रो पेन्सिलचा वापर करून झाल्यावर तुम्ही त्यावरून व्यवस्थित आयब्रो ब्रश (Eyebrow Brush) फिरवा. त्यानंतर त्यावर मस्कारा (Mascara) लावा.
भुवया घनदाट करण्यासाठी स्टेप 3

आता तुम्ही तुमच्या भुवयांवर जेल पावडर (Gel Powder) लावा आणि ही पावडर लावताना तुम्ही चांगल्या दर्जाच्या कन्सीलरचा (Concealer) वापर करावा. कन्सीलर लावल्यामुळे आयब्रो अर्थात भुवया दिसायला अत्यंत आकर्षक आणि सुंदर दिसतात. तसंच तुम्ही भुवयांवर जेल अथवा पावडर हायलायटर लावल्याने त्यामध्ये तुमचा लुक हा अधिक उजळून दिसतो अर्थात उठावदार दिसून येतो.
भुवया घनदाट करण्यासाठी स्टेप 4
भुवयांना जेल पावडरने हायलाईट करून झाल्यानंतर त्यावर पुन्हा एकदा ब्रश फिरवा. यामुळे भुवयांवरील अधिक असणारे जेल निघून जाईल आणि भुवया या नैसर्गिक घनदाट असल्यासारख्या दिसतील. तसंच तुमच्या भुवया अजिबात पातळ दिसणार नाहीत आणि तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक पडेल.
भुवया घनदाट करण्यासाठी स्टेप 5
यानंतर तुम्ही ब्रशमध्ये ट्रान्सल्युसेंट पावडर मिसळून भुवयांना व्यवस्थित लावा आणि भुवया चारही बाजूने दाबून घ्या. भुवयांमध्ये पावडर दिसणार नाही आणि अत्यंत स्वच्छ, घनदाट आणि काळ्या दिसतील याची काळजी तुम्ही घ्या आणि मग तुमचा लुक तुम्ही आरशात निरखून पाहा.
भुवया घनदाट करण्यासाठी अन्य टिप्स (Tips For Highlight Thin Eyebrows )

- तुमच्या भुवयांना तुम्ही कमीत कमी 2-3 वेळा पेट्रोलियम जेली नक्की लावायला हवी. यामुळे भुवयांचे केस हे मॉईस्चराईज्ड दिसतात. तसंच भुवया घनदाट होण्यास मदत मिळते
- भुवयांचे केस चिमट्याने वा वॅक्सिंगने काढून टाकू नका. तसंच लवकरात लवकर भुवया कोरत बसू नका. भुवया कोरण्याच्या प्रक्रियेत किमान दोन ते तीन महिन्यांचा फरक तरी ठेवा
- भुवया घनदाट दिसण्यासाठी जास्त मेकअप तुम्ही करू नका.
- लक्षात ठेवा की, भुवयांवर पेन्सिलचा वापर करताना हा अत्यंत हलक्या हाताने करा. तसंच भुवया जास्त जोरात रगडू नका
आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल आणि तुम्ही भुवया घनदाट करण्यासाठी या टिप्सचा नक्की वापर करा.