अनियमित मासिक पाळी आणि त्यावरील उपाय

मासिक पाळी साधारणपणे चार ते सात दिवस असते. मासिक पाळीच्या (Menstrual Cycle) अनियमिततेमध्ये सलग तीन किंवा अधिक पाळी न येणे, मासिक पाळी सामान्यपेक्षा कमी स्राव किंवा जास्त स्राव आणि 21 दिवसांपेक्षा कमी किंवा 35 दिवसांपेक्षा जास्त अंतर असलेले चक्र असणे यांचा समावेश होतो. सामान्य स्त्रीची मासिक पाळी (Monthly Cycle) चार ते सात दिवस टिकते. स्त्रीला साधारणपणे दर 28 दिवसांनी मासिक पाळी येत असली तरी, सामान्य मासिक पाळीचे चक्र हे 21 ते 35 दिवसांपर्यंत असते. याबाबतीत आम्हाला अधिक माहिती दिली आहे, डॉ. अशोक वर्षानी पंगा, पॅथॉलॉजिस्ट, अपोलो डायग्नोस्टिक्स, पुणे यांनी

अनियमित मासिक पाळी (कालावधी) चक्रांचे निदान कसे केले जाते?

Freepik.com

तुमची मासिक पाळी कधी सुरू होते आणि संपते, प्रवाहाची मात्रा आणि तुमच्या मासिक पाळीमध्ये कोणत्याही प्रकारे बदल झाला असल्यास तुम्हाला रक्ताच्या गुठळ्या होतात की नाही याची तपशीलवार नोंद ठेवा. मासिक पाळीत पेटके किंवा अस्वस्थता, मासिक पाळी दरम्यान रक्तस्त्राव आणि इतर लक्षणे देखील लक्षात घेतली पाहिजेत.

तुमचा वैद्यकिय इतिहास आणि मासिक पाळी याविषयी तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. तो किंवा ती शारीरिक तपासणी करतील, ज्यामध्ये पॅप चाचणी आणि पेल्विक परीक्षणाचा समावेश असू शकतो.

 • अशक्तपणा किंवा इतर वैद्यकीय परिस्थितींकरिता रक्त तपासणी
 • संक्रमण तपासण्यासाठी योनीवाटे नमुने घेतले जाऊ शकतात
 • ओव्हेरियन सिस्ट, पॉलीप्स किंवा गर्भाशयाचे फायब्रॉइड्स शोधण्यासाठी पेल्विक अल्ट्रासाऊंड तपासणी
 • एंडोमेट्रिओसिस, हार्मोनल असंतुलन किंवा घातक पेशी ओळखण्यासाठी, एंडोमेट्रियल बायोप्सी दरम्यान गर्भाशयाच्या अस्तरातील ऊतकांचा नमुना काढला जातो. लॅपरोस्कोपी म्हणून ओळखली जाणारी शस्त्रक्रिया, ज्यामध्ये डॉक्टर ओटीपोटात एक लहान चीर देतात आणि गर्भाशय आणि अंडाशय तपासण्यासाठी जोडलेल्या प्रकाशासह एक पातळ ट्यूब घालतात, याचा वापर एंडोमेट्रिओसिस किंवा इतर विकार ओळखण्यासाठी देखील केला जाऊ शकतो 

अनियमित मासिक पाळीच्या बाबतीत तुम्ही वैद्यकीय मदत कधी घ्याल?

Menstrual Cycle – Freepik.com

तुम्हाला खालीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास, त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्या:

 • मासिक पाळीपूर्वी, दरम्यान किंवा नंतर तीव्र अस्वस्थता
 • तीव्र प्रमाणातील रक्तस्त्राव (दोन ते तीन तासांनी प्रत्येक तासाला टॅम्पन किंवा पॅड भिजणे) किंवा रक्ताच्या गुठळ्या होणे
 • विचित्र वासाचा योनिवाटे होणारा स्राव
 • अति ताप
 • सात दिवसांपेक्षा जास्त कालावधी
 • मासिक पाळीच्या आधी किंवा नंतर किंवा रजोनिवृत्तीनंतर योनीतून रक्तस्त्राव होणे किंवा डाग येणे
 • सामान्य मासिक पाळीचा अनुभव घेतल्यानंतर, तुमची मासिक पाळी अत्यंत अनियमित होऊ लागते
 • मासिक पाळीदरम्यान उलट्या होणे किंवा मळमळ होणे
 • तीव्र लक्षणांमध्ये 102 अंशांपेक्षा जास्त ताप, उलट्या होणे, जुलाब होणे, डोके दुखणे किंवा मूर्च्छा येणे यांचा समावेश होतो.याकरिता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

 अनियमित मासिक पाळीचा धोका कसा कमी करता येईल?

 • व्यायाम आणि पौष्टिक आहाराचे सेवन करुन निरोगी जीवनशैली राखण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर तुमच्या कॅलरीजच्या वापरावर निर्बंध घालणे गरजेचे आहे
 • तुम्हाला पुरेशी झोप मिळत असल्याची खात्री करा
 • तणाव-कमी करणाऱ्या विश्रांती तंत्राचा अवलंब करा
 • जर तुम्ही क्रीडापटू असाल, तर तुम्ही कठोर क्रियाकलापांमध्ये गुंतलेला वेळ कमी करा. बर्‍याच खेळांमुळे अनियमित मासिक पाळी येऊ शकते 
 • गर्भनिरोधक गोळ्या किंवा इतर गर्भनिरोधक पद्धतींवरील निर्देशांचे पालन करा
 • संक्रमण टाळण्यासाठी, दर चार ते सहा तासांनी तुमचे सॅनिटरी नॅपकिन्स बदला
 • नियमित तपासणीसाठी डॉक्टरांना भेट द्या.

तुम्हालाही मासिक पाळीच्या अनियमितपणाच्या त्रासातून जावं लागत असेल तर हा लेख तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. या टिप्स वाचून तुम्ही याचा नीट वापर करून घ्यावा. 

Leave a Comment