तुमच्या पिरेड्सचा रंग (Period Blood Flow) सांगतो तुमच्या आरोग्याविषयी

दर महिन्याला येणारे पिरेड्स हे महिलांसाठी काही नवे नाही. महिन्यातून येणारे हे 5 दिवस खूप जणांना नकोसे होतात. कारण पिरेड्स क्रॅम्प्स, पोटदुखी, चिडचिड, वेगवेगळ्या क्रेव्हिंग्ज यामुळे महिन्यातील हा काळ थोडासा कठीण असतो. पण तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या पिरेड्सचा रंग तुमच्या आरोग्यासंदर्भात काही निष्कर्ष काढतो. तुम्हाला हे माहीत नसेल तर तुमच्यासाठी ही माहिती आहे खूपच जास्त महत्वाची. चला जाणून घेऊया पिरेड्सचा रंग आणि तुमच्या आरोग्याविषयी महत्वाच्या गोष्टी. या शिवाय मासिक पाळीच्या दुर्गंधी संदर्भातही अधिक माहिती घ्या 

लाल रंग ( Red Color)

पिरेड्सचा रंग लाल असेल तर

रक्ताचा रंग लाल असतो हे आपण सगळेच जाणतो. पण पिरेड्सच्या फ्लोचा रंग हा सगळ्यांचा वेगवेगळा असतो. पिरेड्सचा फ्लो लाल रंगाचा असेल तर तो फ्रेश ब्लड फ्लो आहे असे सांगितले जाते. हे रक्त ताजे रक्त असते आणि रक्ताचा हा फ्लो सगळ्यात ताजा मानला जातो. आरोग्याच्यादृष्टिकोनातूनही हा रंग चांगला आहे असे सांगितले जाते. 

गडद लाल ( Dark Red)

10 पैकी 5 जणींच्या पिरेड्सचा फ्लो हा गडद लाल रंगाचा असतो. गडद लाल रंग हा हे जुने रक्त असते. पिरेड्समध्ये शरीरशुद्धीकरणाचे कामच होत असते. त्यामुळे जुने रक्त यातून बाहेर येणे अगदी स्वाभाविक आहे. असे होत असेल तर त्यात तुम्हाला काळजी करण्याचे तसे काही कारण नाही. कारण काही दिवसानंतर रक्ताचा फ्लो हा लाईट होत जातो. 

गुलाबी रंग (Pink Color)

गुलाबी रंगाचा फ्लो

हो, खूप जणांना यावर विश्वास बसणार नाही. पण हो खूप जणांच्या रक्ताचा फ्लो हा गुलाबी रंगाचा असतो. जर अशाप्रकारे गुलाबी रंगाचा पिरेड्सचा फ्लो असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे किंवा तुम्ही तुमचे वजन खूपच जास्त कमी केले आहे. खूप वेळा अति वजन कमी करणे यामुळे देखील पिरेड्सचा रंग हा गुलाबी असू शकतो. तुमचे वजन झपाट्याने उतरत असेल तर तुम्ही योग्य ती काळजी घ्यायला हवी. 

चॉकलेटी रंग ( Brown Color)

पिरेड्सच्या रक्ताचा रंग जर चॉकलेटी असेल तर असा रंग प्रेग्नंन्सी दर्शवतो.जर तुमची मासिक पाळी चुकली असेल आणि तुम्ही शारिरीक संबंधात असाल तर तुम्ही गरोदर असण्याची शक्यता असू शकते. ( या काळात खूप जणांना चॉकलेटी रंगाचा एखादा स्पॉट किंवा रेषा असे होऊ शकते. त्यामुळे तुम्ही योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले. 

फिकट भगवा रंग (Orange Color)

 रक्ताचा असा रंग असूच शकत नाही. पण पिरेड्समध्ये खूप जणांच्या रक्ताचा फ्लो हा भगव्या रंगाचा असतो.  या रंगाचा फ्लो हा अधिक त्रासदायक असतो. कारण भगव्या रंगाचा हा फ्लो तुम्हाला बॅक्टेरीअल एलर्जी दर्शवतो. जर तुम्हाला त्या जागी खूप खाज येत असेल किंवा स्रावाला खूप वास येत असेल तर तुम्ही त्वरीत डॉक्टरांकडे जायला हवे. 

आता तुमच्या पिरेड्सचा रक्त कोणता आहे ते नक्की जाणून तुमच्या आरोग्यविषयक समस्याही जाणून घ्या. 

पिरेड्सचा फ्लो

मखाणा (Makhana) खाण्याचे हे फायदे करतील आश्चर्यचकित

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग करणार सोसायट्यांना डिजिटल हेल्थ बोर्डचे वितरण

Leave a Comment