‘भोगी’ का साजरी करतात, जाणून घ्या अधिक

 मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशी येणारा दिवस हा ‘भोगी’ नावाने ओळखला जातो. भोगी साजरी करण्याची पद्धतही तशी वेगळीच आहे. याबाबत तुम्ही असे बोलताना नक्कीच ऐकले असेल की, ‘करा भोगी अन्यथा नवरा मिळेल रोगी’ असे म्हणतानाही ऐकले असेल. भोगीच्या दिवशी विशेष जेवण केले जाते. तिळगुळाचा आनंद घेण्यापूर्वी समस्त सुवासिनींनी आणि कुमारिकांनीही या दिवशी काही खास करायचे असते. यंदा भोगी 14 जानेवारी 2023 रोजी आली आहे. मुळातच भोगी या सणामागील कारणं, तो सण साजरा करण्याची पद्धत या सगळ्याविषयी आता आपण जाणून घेऊया.मकरसंक्रातीला बोरन्हाण घाण्याची पद्धतही आहे.

भोगी का साजरी केली जाते?

भोगीच्या दिवशी नक्की केले जातात हे पदार्थ- ( सौजन्य : इन्स्टा्ग्राम)

मुळात ‘भोग’ या शब्दावरुन ‘भोगी’ हा शब्द आलेला आहे. देवाला जो दिला जातो त्याला भोग असे म्हणतात. मकरसंक्रातीच्या या काळात म्हणजे जानेवारी महिन्यात शेतकऱ्याच्या हाती त्याचे पीक आलेले असते. अनेक कष्ट आणि परिस्थितीतून तो आपल्या शेतात पीक घेण्यास यशस्वी झालेला असतो. त्यामुळे शेतकऱ्याच्या घरी भरपूर धन- धान्य आलेले असते. याचा आनंद साजरा करण्यासाठी आणि इंद्रदेवाची कृतज्ञता पाळण्यासाठी या भोगीच्या दिवशी इंद्रदेवतेला नमस्कार केला जातो. यावेळी पीक चांगले आले पुढल्या वर्षीही पीकं चांगली येऊ दे असे सांगून हा दिवस साजरा केला जातो. 

काही ठिकाणी यावेळी छोटी होळी पेटवली जाते. त्याला पंजाबमध्ये लोहरी असे म्हणतात.

भोगीच्या दिवशीचे विशेष

आपल्याकडे प्रत्येक सणाची अशी खासियत त्या दिवशीच्या पदार्थांवरही अवलंबून असते. प्रत्येक सणाला आपल्याकडे वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखता येते. भोगीच्या दिवशी शेतकऱ्याने केलेल्या कष्टाचे चीज भरुन निघावे आणि त्याला उर्जा मिळावी यासाठी भोगीची भाजी तयार केली जाते. या काळात मिळणाऱ्या भाज्या, बोरं, उस, पेरु, गाजर या सगळ्या गोष्टी एकत्र करुन भाजी तयार केली जाते. जी अत्यंत चविष्ट  आणि शरीराला उर्जा देण्याचे काम करते. या भाजीसोबत बाजरीची भाकरीही केली जाते. त्यामुळे थंडीच्या दिवसात शरीराला आवश्यक उष्णता मिळते.

सकाळी उठून स्नान करणे

हिंदू धर्मातील प्रत्येक सणामध्ये आपले पावित्र्य राखण्यासाठी सोप्या सोप्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. भोगीच्या दिवशी अगदी हमखास केस धुण्याची पद्धत आहे. महिलांना केस धुणे या दिवशी बंधनकारक असते. केस धुणे हे स्वच्छतेचे प्रतीक आहे. त्यामुळे केसांवरुन पाणी घेण्यास सांगितले जाते. मुळात थंडीत आपण फारवेळा केस धुवायला बघत नाही. आपण टाळाटाळ करतो. म्हणूनच या दिवशी केसांवरुन स्नान करणे आवश्यक असते.

भोगीची भाजी

भोगीची भाजी करण्याची प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगळी आहे. पण साधारणपणे सगळ्या भाज्यांना फोडणी देऊन त्यात  हळद, तिखट, मीठ, मसाला घालून ही भाजी शिजवली जाते. तीळ हा यामधील महत्वाचा घटक. याचे कारण असे की, यावेळी भाजीत अगदी हमखास तीळ घातले जातात. त्यामुळे भाजी अधिक चविष्ट लागते. 

आता भोगी का करतात याचे कारण तुम्हाला नक्कीच कळले असेल 

Leave a Comment