यंदा कशावर आली आहे किंक्रांत, जाणून घ्या अधिक

 देशभरात सगळीकडे 15 जानेवारी 2023 रोजी मकरसंक्रात, पोंगल, लोहरी साजरी केली आहे. पण अनेकांना मकरसंक्रातीच्या दुसऱ्या दिवशीही काही येते हे माहीत नाही. मकरसंक्रातीचा दुसरा दिवस हा ‘किंक्रांत’ म्हणून ओळखला जातो. ‘क्रिंकांत’ ही देखील काही कारणासाठी महत्वाची मानली जाते. मकरसंक्रातीच्या दिवशी आनंद साजरा केल्यानंतर किंक्रांत काही ठिकाणी साजरी केली जात नाही. काही जण या दिवशी कोणतेही शुभ कार्य करत नाही तर काही जण मात्र हा दिवसही आनंदाचा भाग समजतात. या शिवाय क्रिंक्रांत ही कशावर तरी बसून येत असते असे देखील सांगितले जाते. याचा नेमका अर्थ काय या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया. 

क्रिंक्रांत म्हणजे काय?

संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येणारा दिवस म्हणजे किंक्रांत हे आता तुम्हाला कळलेच असेल. पण क्रिंक्रांत या दिवसाचेही काही खास महत्व आहे. पौराणिक दाखल्यानुसार संक्रांतीदेवीने या दिवशी किंकासूर या नरकासुराचा वध केला. त्याच्या ज्याचापासून लोकांना मुक्त केले म्हणून हा दिवस पाळला जातो. या दिवसाला करिदिन असेही म्हणतात. करिदिनाला खूप जण बऱ्याच गोष्टी करणे टाळतात. वेशीप्रमाणे या सगळ्या गोष्टी बदलत जातात. पण अनेक ठिकाणी क्रिंक्रांतीला काही शुभकार्य करण्याचे टाळतात.  या दिवशी हळदी कुंकू केले तरी चालू शकते.

महाराष्ट्रात हे सण होतात साजरे

नवीन वर्षात येणारा मकरसंक्रात हा पहिला सण असतो त्यामुळे हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महिलांनी एकत्र येऊन हा सण साजरा केला जातो. त्यामुळे त्याचा आनंद वेगळा असतो.  संक्रांतीच्या आधी येणारा भोगी( Bhogi) साजरी केली जाते. या दिवशी या सीझनमध्ये येणाऱ्या भाज्या एकत्र करुन मिक्स भाजी केली जाते. यात मटार, पावटा, बोरं, उसाचे कांड, गाजर, तुरीच्या शेंगा हे सगळे घालून भाजी केली जाते. त्यासोबत मस्त बाजरीची भाकरी केली जाते. या काळात असलेली थंडी कमी करुन उष्णता देण्याचे काम करते. तर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ देऊन ‘तिळगुळ द्या गोड गोड बोला’ म्हणत साखरफुटाणे आणि लाडू दिले जातात. हा एक आनंद साजरा केला जाते. त्यानंतर रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकू घातले जाते.

कोणावर बसून आली आहे यंदाची संक्रात

संक्रातीचे महत्व सांगताना संक्रात कशावर बसून आली हे देखील सांगितले जाते. यंदा संक्रातीचे वाहन सिंह असून त्याचे उपवाहन हा घोडा आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे.  तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. त्याच्या हाती गदा असून त्याने डोक्यावर केशराचा टिळा लावला आहे. हातात सुवासिक असे जाईचे फुल घेतले आहे. हातात सोन्याचे पिवळे कंकण परिधान केले आहे. 

हे आहे किंक्रांतीचे महत्व

Leave a Comment