राखी सावंतचे लग्न पुन्हा एकदा ड्रामा, आदिलमुळे सगळे पडले बुचकळ्यात

अखेर राखी सावंतने लग्न केले या बातमीने सगळ्यांन आनंद झाला होता. पण आता या लग्नात पुन्हा एक नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण राखीचा नवरा अर्थात आदिल दुर्रानी (Adil Durrani) याने दिलेला एक इंटरव्ह्यू आता थोडा संशयास्पद वाटू लागला आहे.आदिलने मीडियासमोर येण्यासाठी 10 -12 दिवसांचा कालावधी मागितला आहे. त्याच्या बोलण्यावरुन आता राखीच्या लग्नाचे नेमके सत्य काय? याचा उलगडा होणार आहे. पण पुन्हा एकदा राखीने लग्नावरुन कांगावा केला असेल असे काही नेटीझन्सचे म्हणणे आहे. 

7 महिन्यांपूर्वी केले लग्न

राखी सावंतने आदिलशी 7 महिन्यांपूर्वी लग्न केल्याची माहिती राखीनेच दिली आहे. तिने तिचा निकाहनामादेखील सगळ्यांसमोर ठेवला आहे. या निकाहनाम्यानुसार तिने आदिलशी लग्न केले असून तिने तिचे नाव राखी सावंत फातिमा असे लावले आहे. गेल्यावेळी तिने केलेल्या लग्नात लग्नाचे कोणतेही पुरावे तिच्या हाती नव्हते. पण आता तिने लग्न केल्याचे सगळे पुरावे तिच्याकडे आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तिच्याकडे तिच्या मॅरेज सर्टिफिकेट आहे. पण असे असतानाही आदिलने लग्न केल्याचे कोणतेही फोटो टाकलेले नाहीत. शिवाय त्याने लग्नाबद्दल बोलणेही टाळले आहे. त्याचा एक इंटरव्ह्यू घेण्यात आला आहे. त्याला त्यात लग्नाबद्दल विचारले. पण तरीही त्याने त्याबद्दल बोलणे टाळले. त्याने या सगळ्या गोष्टी स्पष्ट करण्यासाठी  काही कालावधी मागितला आहे. त्यानंतरच तो मीडियाशी येऊन त्याबद्दल बोलणार आहे.

राखीची पुन्हा फसवणूक? 

राखीचे लग्न झाले तेही तिला आवडणाऱ्या व्यक्तिसोबत म्हटल्यावर तिच्या चाहत्यांना आनंद झाला होता. आदिल- राखी हे कायम एकत्र असतात. अनेक ठिकाणी ते एकत्र प्रवास करतात. असे असताना आदिलने लग्न का झाले? कोणत्या परिस्थितीत झाले? लग्नामागची सत्यता काय हे सांगण्यासाठी वेळ मागणे म्हणजे संशयास्पद आहे. कारण राखीने आधीच्या लग्नाच्यावेळीही अनेक टोमणे झेलले आहेत. आता निकाहनामा असूनसुद्धा आदिल लग्नाची कबुली देत नाही म्हटल्यावर तिलाही धक्का बसला आहे. तिचा एक टेलिफोनिक इंटरव्ह्यू तिने टाकला आहे. त्यामध्ये आदिल खान आहे. जो लग्नाला नकार दिला नाही. पण मला वेळ हवाय असे सांगतोय. इतकेच नाही तर राखीला मी कुठेही सोडून जात नाही. राखी एकटी आहे असे कधीही होणार नाही. त्यामुळे त्याने दिलासा दिला असला तरी देखील काही बाबतीत राखीची पुन्हा फसवणूक तर होत नाही ना? असा प्रश्न आहे. 

वयाचे अंतर

प्रेमाला वय नसते हे कितीही खरे असले तरी देखील कही वेळा वय हे देखील नात्यामध्ये अडथळा ठरु शकते. राखी सावंत ही आता 44  वर्षांची आहे तर आदिल हा केवळ 27 वर्षांचा बिझनेसमन आहे. प्रेम  खरे असेल तर वय हा केवळ आकडा राहतो. पण आता राखीच्या बाबतीत राखीचे वय हा अडथळा ठरेल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

दरम्यान तुम्हाला राखी- आदिलच्या लग्नाबद्दल काय वाटले नक्की कळवा.

Leave a Comment