मकरसंंक्रातीसाठी हलव्याच्या दागिन्यांच्या खास डिझाईन्स (Halvyache Dagine)

 अगदी काहीच दिवसांवर आता मकरसंक्रात येऊन ठेपली आहे. अनेक ठिकाणी काळ्या साड्यांच्या खरेदीने जोर धरला आहे. ठिकठिकाणी हरभरा, ऊस, बोरं, भुईमुगाच्या शेंगा दिसू लागल्या आहेत. हलवा अर्थात साखरफुटाण्याची पाकिटंही आता अनेक दुकानांमध्ये दिसत असतील. पण या सगळ्यामध्ये आकर्षित करतात ते म्हणजेे या हलव्यापासून बनवलेले ‘हलव्याचे दागिने’  खास संक्रातीचे निमित्त साधून नव्या नवरीच्या पहिल्या संक्रातीला हलव्याचे दागिने (Halvyache Dagine) घातले जातात. या शिवाय लहान मुलांचे बोरन्हाण घातले जाते त्यावेळीही हलव्याचे दागिने घातले जातात. त्यामुळेच या काळात बाजारात हलव्याच्या दागिन्यांची वेगवेगळी डिझाईन पाहायला मिळते. तुम्हीही यंदा हलव्याचे दागिने घालण्याचा विचार केला असेल तर हलव्याच्या या डिझाईन खास तुमच्यासाठी

हलव्याचे मंगळसूत्र

हलव्याचे सुंदर दागिने डिझाईन्स

 हलव्याचे इतर कोणताही दागिना सुवासिनीने घातला नाही तरी चालेल पण मंगळसूत्र घालायलाच हवे. हल्ली हलव्याच्या दागिन्यांमध्ये सुंदर अशा मंगळसूत्राच्या डिझाईन्स मिळतात. या डिझाईन्स तितक्याच सुंदर आणि नाजूक असतात. जर तुम्ही इतर कोणतेही हलव्याचे दागिने घालणार नसाल तर यामध्ये मिळणारे तीन-ते चार सरींचे असे मोठे घसघशीत मंगळसूत्र निवडा. जर नाजूक काहीतरी घालायला आवडत असेल तर तुम्हाला सिंगल सरीचे मंगळसूत्र घेता येईल. यात फॅन्सी अशा मंगळसूत्राचाही समावेश आहे. अनेक ठिकाणी तुमच्या आवडीच्या पेडंटना हलव्याची सर लावून देतात जी दिसायला खूपच सुंदर दिसतात. (halvyache dagine in marathi )

हलव्याचा मेखला

खरंतरं हलव्याच्या दागिन्याचा तुम्ही सेट पाहिला तर तुम्हाला त्यामध्ये कमरपट्टा हा येतोच. पण खूप जणांना कमरपट्टा घालायला आवडत नाही. कारण डोहाळ जेवणासाठी जसे दागिने असतात तसे हे दागिने वाटतात म्हणून खूप जण घालायला पाहात नाही. त्याला पर्याय म्हणून मेखला घातला तरी देखील चालू शकते. मेखला हा दिसायला खूपच छान दिसतो. मेखल्यामध्येही तुम्हाला सरी दिसतील. तुमच्या उंचीनुसार तुम्ही हलव्याचा मेखला निवडा.काळ्या रंगाच्या साडीवर मेखला सुंदर दिसतो. त्यामुळे मेखला नक्की घ्या. संक्रातीला काळे कपडे घालण्यामागेही विशेष कारण आहे

हलव्याच्या बांगड्या

हलव्याचे सुंदर दागिने

हलव्याच्या दागिन्यांमधील आणखी एक प्रकार म्हणजे बांगड्या. हलव्याच्या दागिन्यांमध्ये बांगड्यांचे वेगवेगळे आणि खूप असे प्रकार बघायला मिळत नाहीत. साधारणपणे एखाद्या बांगडीला हलवा चिकटवूनच हा दागिना तयार केला जातो. त्यामुळे हा दागिना नाजूक होऊन जातो. हा दागिना तुम्हाला बाहेर मिळाला पण आवडला नसेल तर तुम्ही घरीही फुटाणे आणून एखाद्या साध्या बांगडीवर फेविकॉलच्या साहाय्याने हलवा लावून तयार करु शकता. तो दिसायला सुंदर दिसतो. 

शाहीहार किंवा ठुशी

गळ्यात काहीतरी वेगळे घालायचं असेल तर तुम्ही दोन सरींचे हार निवडा. म्हणजे एक गळ्यालगत आणि एक लांब हार निवडला तर तो अधिक चांगला दिसतो. ठुशी आणि शाहीहार यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स मिळतात.त्या दिसायला खूपच सुंदर दिसतात. त्यामध्येही तुम्ही हार निवडा. यातही तुम्हाला सरींचा पर्याय मिळतो. तुमच्या साडीचा काठ आणि तुमची दागिन्यांची आवड हे लक्षात घेऊन तुम्ही त्याची निवड करा.

वापरण्यात आलेले सगळे फोटो हे इन्स्टाग्रामवरुन घेण्यात आलेले आहे.

Leave a Comment