का घातले जातात संक्रातीला काळे कपडे

नव्या वर्षातील पहिला सण म्हणजे ‘मकरसंक्रात’( makar sankranti ) येत्या 14 जानेवारी 2023 रोजी मकरसंक्रात येणार आहे. मकरसंक्रातीचे हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे. सूर्याचा मकर राशीतील प्रवेश या शिवाय वातावरणातील बदल त्यामुळे या दिवशी खाल्ले जाणारे पदार्थ हे देखील वेगळे असतात. या सगळ्याची माहिती आपण घेणार आहोत.याशिवाय ‘बोरन्हाण’ का घातले जाते हे आधीच आपण जाणून घेतले आहे. पण मकरसंक्रातीला काळे कपडेच का घातले जातात?( Black color) असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?

मकरसंक्रातीचे महत्व

तिळगुळ घ्या गोडगोड बोला

हिंदू धर्मात बदलते वातावरण हे नेहमीच वेगळ्या पद्धतीने साजरे केले जाते. त्यानुसार आहारातही बदल होत असतो. दसरा, दिवाळीनंतर येणारा सगळ्यात मोठा जानेवारीतील सण म्हणजे मकरसंक्रात. पौष महिन्यात मकरसंक्रात येते. पौष महिन्यात सूर्य ज्यावेळी मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस मकरसंक्रात म्हणून साजरा करतात. या आधी वातावरणात कमालीचा थंडावा असतो. सूर्याचे उन जाणवत नाही. पण मकरसंक्रातीपासून उनाची उष्णता जाणवायला सुरुवात होते. त्यामुळे हा दिवस साजरा केला जातो. हा सण साजरा करण्यामागे आणखी एक कारणं सांगितले जाते. ते म्हणजे हा सण शेतीशीही निगडीत आहे. कारण या दिवसापासून पुन्हा एकदा दिवस मोठा होऊ लागतो आणि रात्र लहान होऊ लागते. त्यामुळे शेतात आलेले पीक झोडपायला मदत मिळते. शिवाय शेतातून काढलेला हरभरा, बोरं आणि इतर धान्यही पुरशी असतात. 

मकरसंक्रातीत काळ्या रंगाचे महत्व

हलव्याचे दागिने घेतलेले जोडपे

मकरसंक्रात म्हटली की आपल्याला तिळगुळासोबत आठवतात ते म्हणजे काळ्या रंगाचे कपडे. मकरसंक्रातीच्या या काळात काळे कपडे घालण्याची पद्धत आहे. यामागील शास्त्रीय कारण असेल की, काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. या काळात शरीराला उष्णतेची गरज असते. त्यामुळे काळ्या रंगाचे कपडे घातले जातात.  शिवाय या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत रात्र कमी होऊ लागते. त्या कमी होणाऱ्या रात्रीला निरोप देण्यासाठी काळे कपडे घालण्याची पद्धत आहे. त्यामुळे या मागे असलेले कारण फार काही मोठे नसले तरी देखील ही परंपरा पूर्वीपासून सुरु आहे. एरव्ही सुवासिनींना काळे रंग घालण्याची परवानगी नसते. पण या निमित्ताने काळे कपडे घातला येतात.

मकरसंक्रातीला वाटला जातो तिळगुळ

मकरसंक्रात म्हटली की, आपल्याला आठवतो तो तिळाचा लाडू… या काळात प्रत्येक घरात तिळाचा लाडू, तिळाची वडी, तिळाची चिक्की असे बनवले जाते. तिळ आणि गुळ हे उष्ण असतात.  त्यामुळे शरीलाला उष्णता मिळण्यास मदत मिळते. थंडीला पळवून लावून शरीरालातील उष्णता वाढवण्यासाठी या गोष्टी मदत करतात. शिवाय एखाद्यासोबत झालेले भांडण मिटवून नात्यात गोडवा आणण्यासाठी हा उत्तम दिवस आहे.  

आता मकरसंक्रातीला काळे कपडे घातले जातात ते माहीत करुन घेतल्यानंतर ही माहिती इतरांनाही शेअर करा. 

Leave a Comment