संक्रांतीला या कारणासाठी घातले जाते ‘बोरन्हाण’

 नवीन वर्षाची सुरुवात ही मकरसंक्रातीने होते. मकरसंक्रातीला तिळाचे लाडू आणि फुटाणे अगदी आवर्जून खाल्ले जाते.नव विवाहित स्त्रिया हलव्याचे दागिने घालतात. या काळात हळदीकुंकूही घातले जाते. या शिवाय संक्रातीच्या या काळात लहान मुलांचे ‘बोरन्हाण’ घातले जाते. लहानमुलांचे हे बोरन्हाण नेमके काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? बोरन्हाण घालण्यामागेही काही शास्त्र आहे ते जाणून घेणे गरजेचे असते. संक्रातीच्या काळात बोरन्हाण करण्याचा विचार करत असाल तर ही अत्यंत महत्वाची माहिती तुम्ही वाचायला हवी.

या कारणासाठी घातले जाते बोरन्हाण

बोरन्हाणसाठी तयार झालेली चिमुकली

संक्रात ही साधारण जानेवारी महिन्यात येते. या काळात थंडीचे वातावरण असते. बदलते वातावरण यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. अशावेळी शिशूसंस्काराचा भाग म्हणून लहान मुलांना बोरन्हाण घातले जाते. फार पूर्वीपासून ही पद्धत सुरु आहे. ‘बोरन्हाण’ घालताना त्यात बोरं, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा,तिळाची वडी,तिळाचे लाडू, कुरमुरे असे लहान मुलाच्या डोक्यावरुन घातले जाते. लहान मुलं त्यातील कोणतीही गोष्ट ग्रहण करत असेल तर त्यामुळे त्याला उर्जा आणि वातावरणासाठी हवी असलेली प्रतिकारशक्ती मिळण्यास मदत मिळते.  

घरात लहान मुलं असेल तर त्याच्या जन्मानंतरच्या पहिल्या संक्रातीला बोरन्हाण (what is bornahan) घातले जाते. जर बाळ लहान असेल आणि आईच्या दुधावर असेल तर अशावेळी पुढची संक्रात केली तरी चालेल. शिवाय जर काही जणांची बोरन्हाण करणे राहून गेले असेल तर तुम्ही ती नंतरही केली तरी चालू शकते. 

अशी करा बोरन्हाणाची तयारी

बोरन्हाण करण्यासाठी फारशी तयारी करावी लागत नाही. हा एक छोटेखानी आणि घरगुती असा कार्यक्रम आहे. 

संक्रातीच्या दिवशी काळे कपडे घालण्याचे एक विशेष महत्व आहे. त्यामुळे बोरन्हाण करतानाही काळे कपडे घाला. लहान मुलांसाठी हल्ली छान फ्रॉक आणि कुडते मिळतात. जे खूप सुंदर दिसतात. 

बोरन्हाणसाठी जे मिश्रण करायचे आहे त्यामध्ये कुरमुरे, छोटी बोरं, तिळवडी, चॉकलेट असे घालून मिश्रण एकजीव करा. 

 एका स्वच्छ कपड्यावर लहान बाळाला बसवावे. आरतीची थाळी तयार करुन आप्तेष्टांकडून ओवळावे. 

त्यानंतर मुलाच्या डोक्यावरुन हे मिश्रण टाकावे. लहान मुलाने ते खाणे गरजेचे असते. घरात आलेल्या मुलांना त्यातील थोडेच दिले तरी चालेल. मुलांसाठी हा एक मजेचा कार्यक्रम असतो. 

जर तुम्हाला यंदा मुलांचे बोरन्हाण करायचे असेल तर तुम्ही यंदा ते नक्की करायला हवे.

(बोरन्हाणसाठी वापरण्यात आलेले सगळे फोटो सोशल मीडियाच्या ओपन अकाऊंटवरुन घेतलेले आहेत)

Leave a Comment