लावणी क्वीन गौतमी पाटील आहे कोण? का होतेय व्हायरल

लावणी म्हणजे खरंतर महाराष्ट्राची शान. अनेक नृत्यांगना यांनी लावणीला एका वेगळ्या दर्जावर नेऊन ठेवले आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. मेघा घाडगे (Megha Ghadge), सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) या लावणीसम्राज्ञी आणि याशिवाय चित्रपटांमधून अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) यांनीही लावणीला एक वेगळाच साज आणला आहे. पण सध्या एक नाव गाजतंय ते आहे गौतमी पाटीलचं (Gautami Patil). आपल्या अदाकारीने सोशल मीडियावर सध्या वेड लावणारी लावणीसम्राज्ञी आहे ती म्हणजे गौतमी पाटील. पण काही दिवसांपूर्वी मात्र लावणी करताना अश्लील अदा केल्यामुळे गौतमी पाटीलचं नाव व्हायरल झालं होतं. गौतमी पाटील उत्तम नृत्यांगना असून तिला लावणी डान्सर (Lavni Dancer) म्हणून ओळखलं जातं आणि अनेक ठिकाणी तिच्या लावणीचे कार्यक्रमही होतात. याशिवाय सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम (Instagram), युट्यूब (YouTube), फेसबुक (Facebook) या प्लॅटफॉर्मवरही तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाले आहेत. पण या व्हिडिओमधील काही स्टेप्समुळे सध्या गौतमी वादामध्ये अडकली असल्याचे दिसून येत आहे. 

आक्षेपार्ह नृत्यामुळे आली चर्चेत 

गौतमीला सोशल मीडियातील व्हिडिओमुळे अधिक प्रसिद्धी मिळवून दिल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर गौतमीने अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. तर आपल्या नृत्य आणि अदांनी अनेकांना गौतमीने घायाळ केल्याचेही दिसून येत आहे कारण तिला सोशल मीडियावर तुफान फॉलोअर्स आहेत. पण सध्या ती चर्चेत आहे त्याचे कारण म्हणजे सार्वजनिक कार्यक्रमात गौतमीने अशा काही नृत्याच्या अदा सादर केल्या की, ज्या अश्लील वाटाव्यात आणि यानंतर गौतमीने माफीही मागितली होती. सप्टेंबर 2022 मध्ये एका कार्यक्रमात लावणी सादर करताना अशा काही स्टेप्स करून तिने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते आणि त्यामुळे तिला अनेकांनी ट्रोल केले होते. तिचा हा व्हिडिओ मीडियावर खूपच व्हायरल झाला होता. या कार्यक्रमानंतर गौतमीला अधिक लोकांनी सोशल मीडियावर शोधून फॉलो केले असल्याचेही दिसून आले आहे. Negative Publicity चा एकप्रकारे गौतमीला फायदाच झाला असल्याचे दिसून आले आहे. 

कोण आहे गौतमी? 

गौतमी पाटील ही मूळची धुळे जिल्ह्यात राहणारी आहे. 26 वर्षीय गौतमीचे केवळ दहावीपर्यंतच शिक्षण झाले आहे. धुळ्यामधील सिंदखेडा येथील गावात तिचे शिक्षण झाले असून गेल्या साधारण 9-10 वर्षांपासून गौतमी लावणी नृत्य सादर करत आहे. मनोरंजनाच्या क्षेत्रात येण्यासाठी मात्र तिने कोणत्याही प्रकारचे नृत्याचे शिक्षण घेतलेले नाही. इतरांचे डान्स पाहूनच स्वतःहून तिने आपल्या नृत्यामध्ये सराव करून बदल केले असल्याचेही सांगण्यात येते. सराव आणि मेहनत यामुळेच गौतमी आतापर्यंत सोशल मीडियावर इतक्या प्रसिद्धीच्या उंचीवर पोहचली असल्याचे दिसून येत आहे. तर तिच्या या अदांमुळेच तिचे अनेक चाहतेही दिसून येत आहेत. दरम्यान नुकत्याच मिरज येथील बेडगमध्ये (Miraj Badga) लावणीच्या कार्यक्रमादरम्यान एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानेही गौतमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हा कार्यक्रम एका शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता. मात्र इतकी गर्दी जमली की अनेकांनी छतावर चढून हा कार्यक्रम पाहिले आणि छत कोसळल्याने नुकसानही झाल्याचे समोर आले आहे. 

Leave a Comment