या बेकिंग टिप्स वापरा आणि राहा निरोगी

बेकिंग (Baking) करणे हे नक्कीच अनेकांसाठी आनंदाचे काम आहे. बॅटर तयार करण्यापासून ते बेक करणे आणि डेकोरेट करेपर्यंत सर्व तणाव निघून जातो आणि त्यात आपली एक कलाही दिसून येते. काही जणांना बेकिंग करणे आणि बेक्ड पदार्थ खाणे खूपच आवडते. पण काही जण बेकिंग करणे यासाठी टाळतात कारण यामध्ये अधिक प्रमाणात वापरण्यात येणारी साखर आणि वाढणाऱ्या कॅलरी याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. वजन वाढ होण्यासाठी बेकिंग अधिक जबाबदार ठरल्यामुळे अनेक जण बेकिंग करणे आणि बेक्ड पदार्थ (Baked Food) खाणेही टाळतात. तुम्हाला केक बनवणं आणि पेस्ट्री (Cake and Pastries) तयार करणं अधिक आवडत असेल आणि तुम्हाला निरोगीदेखील राहायचं असेल तर तुम्ही तुमचे बेकिंग अधिक हेल्दी (Healthy) करू शकता. यासाठी काही टिप्स आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. 

बटर अथवा तेलाच्या जागी वापरा ग्रीक योगर्ट (Use Greek Yogurt Instead Of Butter Or Oil)

तुम्हाला तुमचे बेकिंग हेल्दी करायचे असेल तर तुम्ही बेकिंग करताना यामध्ये बटर अथवा तेलाच्या जागी ग्रीक योगर्टचा वापर करावा. यामध्ये प्रोटीन अधिक प्रमाणात असते. तसंच याच्या मदतीने तुमच्या गोड पदार्थामध्ये कॅल्शियम आणि विटामिन डी चे प्रमाणदेखील वाढेल. तुम्ही यामध्ये प्लेन अनस्वीटन्ड योगर्ट (Plain Unsweetened Yogurt) हा पर्याय निवडू शकता. तसंच ग्रीक योगर्टचा वापर केल्यामुळे यामध्ये अधिक क्रिमी कनसिस्टन्सी दिसून येते. तुम्ही एक कप आंबट क्रिमच्या जागी एक कप या योगर्टचा वापर करून पाहू शकता. तसंच तुम्ही एक कप बटर वापरणार असाल तर त्याऐवजी तुम्ही अर्धा कप बटर आणि अर्धा कप ग्रीक योगर्ट वापरा. हे अजिबात तुमच्या शरीराला नुकसान पोहचवत नाही. 

मैद्यामध्ये गव्हाचे पीठ करा मिक्स (Mix Wheat Flour)

सौजन्य – Freepik.com

बेकिंगदरम्यान आपण मैदा वापरतो. पण जर तुम्हाला हेल्दी बेकिंग करायचे असेल तर तुम्ही मैदा अर्धा आणि त्यामध्ये अर्धा कप गव्हाचे पीठ (Wheat Flour) वापरा. यामुळे तुमच्या बेकिंग पदार्थांमध्ये फायबर, बी विटामिन, पोटॅशियम आणि आयर्नसारखे पोषक तत्वदेखील समाविष्ट करून घेता येतील. या मिश्रणाने तुम्ही मफीन तयार करू शकता. तसंच केकदेखील तुम्ही बनवू शकता.  

डार्क चॉकलेटचा पर्याय निवडा (Use Dark Chocolate As An Option)

सौजन्य – Freepik.com

तुम्ही बेकिंगदरम्यान कोणत्याही रेसिपी तयार करत असाल, ज्यामध्ये चॉकलेट्सची गरज आहे तर तुम्ही मिल्क चॉकलेट्सच्या (Milk Chocolate) ऐवजी डार्क चॉकलेट्सचा (Dark Chocolate) पर्याय निवडा. यामुळे तुमच्या पदार्थाला अधिक चव येईल. तसंच साखरेचं प्रमाणही कमी होईल. उदाहरणार्थ तुम्ही चॉकलेट चिप बनवताना चार्क चॉकलेटचा वापर करू शकता. डार्क चॉकलेटमध्ये फ्लेवोनॉईड्स असतात, जे एक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असून शरीरासाठी चांगले मानण्यात येते. 

रिफाइंड स्वीट्सच्या जागी वापरा फळं (Use Fruits Instead Of Refined Sweets)

सौजन्य – Freepik.com

तुम्ही बेकिंगसाठी रिफाईंंड स्वीट्स वापरत असाल तर त्याऐवजी तुम्ही फळांचा वापर करण्याचा प्रयत्न करा. फळांमध्ये नैसर्गिकतः साखर असते. त्यामुळे याची चव अधिक चांगली लागते. याशिवाय यामधून तुम्हाला फायबर आणि विटामिन सी सारखे पोषक तत्वही मिळते. तुम्हाला बेकिंगदरम्यान सफरचंद आणि केळ्याचा वापर चांगला करता येऊ शकतो हे जाणून घ्या. अनेकदा मोठमोठे बेकर्स केकसाठी केळ्याचा वापर करताना दिसून येतात. 

आईसिंग करा हेल्दी (Healthy Icing)

सौजन्य – Freepik.com

तुम्ही केक बेक केला असेल तर त्यानंतर आईसिंगसाठी तुम्ही हेल्दी आईसिंगचा पर्याय निवडू शकता. यासाठी तुम्ही केक टॉपिंगसाठी बटर आईसिंगपेक्षा (Butter Icing) ग्लॅस आईसिंगचा वापर करावा अथवा आईसिंग शुगरने लाईट स्प्रिंकल करून बेकिंग पूर्ण करा. त्यामुळे तुम्ही हेल्दी केक बनवू शकता. 

ही सोपी ट्रीक वापरा 

तुम्हाला बेकिंगची खूप जास्त आवड असेल, पण तुम्ही तुमच्या शरीराला अधिक जपत असाल तर तुम्ही या ट्रीकचा नक्की वापर करा

उदा. तुम्ही जास्त मोठ्या आकाराचे बेकिंग पदार्थ तयार न करता लहान आकाराचे पदार्थ बनवा. यामुळे तुम्हाला चवही घेता येईल आणि तुमची बेकिंगची इच्छाही पूर्ण होईल. तसंच कॅलरीही वाढणार नाही आणि तुम्ही मनापासून खाऊ शकता, तुमच्याकडून पदार्थ जास्त बनला गेला आहे म्हणून संपविण्यासाठी जास्त खाल्लाही जाणार नाही. 

बाजारातून ताजा आणि योग्य हिरवा पालक कसा निवडाल, योग्य ट्रिक

काही केल्या मोदक (Ukdicha Modak) जमत नाहीत… ट्राय करा या ट्रिक्स

Diwali 2022: लक्ष्मीपूजनाला लाह्या आणि बत्ताशांचाच प्रसाद का, जाणून घ्या

Leave a Comment