रवा इडली बनविण्याच्या सोप्या टिप्स, इडल्या होतील अधिक मऊ

इडली आणि सांभार (Idli Sambar) खरं तर दाक्षिणात्य पदार्थ. पण केवळ दक्षिणेतच नाही तर जगात सगळीकडेच नाश्त्यासाठी प्रसिद्ध आहे. हा पदार्थ केवळ चविष्टच नाही तर हेल्दी आणि अगदी व्यवस्थित पोटभर खाता येतो. पण सगळ्यांना घरी मऊ इडली बनवता येतेच असं नाही. इडली तयार होण्यासाठी जास्त वेळ लागतो असं वाटतं त्यामुळे बरेचदा कंटाळा केला जातो. मात्र तुम्ही मुलांसाठी अत्यंत सोप्या पद्धतीने रवा इडली बनवू शकता. तांदळाच्या पिठाची इडली बनविल्यास जास्त वेळ लागतो. मात्र तुम्ही रवा आणि उडीद डाळ याचे मिश्रण वापरल्यास इडली लवकर तयार होते आणि त्याशिवाय याची चव अधिक चांगली लागते. रवा इडली बनविण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया (How To Make Rava Idli At Home). 

रवा इडली तयारीसाठी लागणार वेळसाधारण 10 मिनिट्स 
शिजण्यासाठी लागणारा वेळसाधारण 15 मिनिट्स 
एकूण लागणारा वेळ1 तास 

रवा इडली बनविण्यासाठी साहित्य (Rava Idli Ingredients) 

Rava Idli
 • एक वाटी उडदाची डाळ
 • 3 वाटी रवा
 • 1 वाटी दही
 • ½ चमचा खाण्याचा सोडा
 • मेथी दाणे 
 • आवश्यकतेनुसार पाणी
 • चवीनुसार मीठ
 • आवश्यकतेप्रमाणे तेल 

बनविण्याची पद्धत 

Rava Idli
 • उडीद डाळ आणि रव्याची इडली बनविणे सोपे आहे.यासाठी सर्वात पहिले भांड्यात पाणी घ्या आणि त्यात मेथीदाणे आणि उडदाची डाळ भिजत घाला. साधारण 2 तास भिजू द्या
 • तसंच रवादेखील निवडून अर्धा तास पाण्यात भिजत घाला
 • यानंतर मेथीदाणे आणि उडीद डाळीतील पाणी काढून मिक्सरमधून वाटून घ्या आणि व्यवस्थित त्याचे बॅटर करून घ्या 
 • त्यानंतर रव्यातील पाणी काढून त्यात दही, उडदाच्या डाळीची पेस्ट, खाण्याचा सोडा, मीठ हे सर्व व्यवस्थित मिक्स करा आणि साधारण एक – दोन तास बाजूला ठेवा 
 • त्यानंतर इडली पात्र घ्या. त्यात पाणी घाला. इडलीच्या भांड्यात तेल लावा आणि त्यात इडलीचे बॅटर घालून शिजवायला ठेवा 
 • साधारण 7-8 मिनिट्स वाफवा आणि मग झाकण उघडून नीट शिजल्या की नाही सुरीच्या सहाय्याने बघा. नंतर बाहेर काढून घ्या आणि चटणी-सांभारसह खायला द्या
 • हवं असल्यास तुम्ही इडलीला वरून मोहरीची फोडणीही देऊ शकता. हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करावे 

रवा इडली तुम्हाला अशा पद्धतीने केल्यास मऊ आणि लुसलुशीत मिळेल. तसंच हे करायला जास्त मेहनत लागत नाही. तसंच बाहेरून तयार पीठ आणण्यापेक्षा घरच्या घरी केलेली इडली ही अधिक हेल्दी असते. शिवाय मुलं अधिक चवीनेही खातात. 

Leave a Comment