स्वप्नील-शिल्पाच्या इंटिमेट सीनमुळे नवा वाद? कौटुंबिक मालिकेत दाखविण्याची गरज काय प्रेक्षकांचा सवाल

अनेक मराठी मालिका फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात. सध्या गाजत असलेली मराठी मालिका म्हणजे ‘तू तेव्हा तशी’. या मालिकेतील सौरभ अर्थात स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि अनामिका अर्थात शिल्पा तुळसकर (Shilpa Tulaskar) यांच्यातील केमिस्ट्री सर्वांनाच आवडते. आता ही मालिका एका मनोरंजनात्मक टप्प्यावर येऊन पोहचली आहे. मध्यंतरी अनामिका आणि सौरभच्या नात्यात पुन्हा एकदा ताटातूट होते की काय असे वळण आलेले असतानाच आता दोघांनीही लिव्ह इन (Live In Relationship) मध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. इथपर्यंत ठीक होते मात्र आता यातील दोघांच्या इंटिमेट सीनचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून यामुळे प्रेक्षकांमध्येही दोन गट पडल्याचे दिसून येत आहेत. 

बेडवरील किसिंग सीन (Bed Kissing Scene)

सध्या तू तेव्हा तशी ही मालिका अगदी मनोरंजक वळणावर येऊन ठेपली आहे. सौरभ आणि अनामिका एकमेकांच्या प्रेमात असून खूपच जवळीक वाढलेली दाखविण्यात आली आहे. तर वाहिनीने सोशल मीडियावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामुळे नवा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या व्हिडिओमध्ये सौरभ आणि अनामिकामधील इंटिमेट सीन दाखविण्यात आला असून यावर आता कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनामिका सौरभला किस करताना दिसून येत आहे.  यांची केमिस्ट्री दाखवताना अनेक नकारात्मक कमेंट्सचाही सामना आता करावा लागत आहे. 

नेटिझन्सची प्रतिक्रिया 

संपूर्ण कुटुंब ही मालिका एकत्र पाहते आणि असे असताना अशा पद्धतीने सीन दाखविण्याची काय गरज आहे? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. अशा मालिका बंद होण्याची गरज आहे अशी टोकाची भूमिकाही काही जणांनी घेतली आहे. या मालिकेत चाळीशीच्या वयातील प्रेम दाखविण्यात आले आहे. खरं तर हा विषय थोडा वेगळा आहे. समाजात असे घडू शकते. मात्र त्यानंतर या सगळ्या गोष्टी दाखविण्याचीदेखील खरंच गरज आहे का? अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. कौटुंबिक मालिकांमध्ये सध्या अशा पद्धतीने सीन्स वाढत आहेत अशीही तक्रार आता जाणवू  लागली आहे. अजूनही आपल्याकडे घरात मोठ्या माणसांसह अशा पद्धतीचे सीन पाहताना अवघडल्यासारखे होते आणि त्यामुळेच किमान मराठी मालिकांमध्ये असे सीन दाखवू नयेत अशाही प्रतिक्रिया या व्हिडिओखाली दिसून येत आहेत. 

टीआरपीसाठी कोणत्याही पद्धतीचे सीन दाखवू नयेत असंही अनेकांना वाटत आहे. चांगला विषय असेल तर मालिका नक्कीच प्रेक्षकांना आवडते आणि त्यासाठी हे सगळं करून इंटिमेट सीनची काहीच आवश्यकता नाही. स्क्रिप्टची गरज होती असं काहीही नसतं असेही अनेक प्रेक्षकांना वाटत आहे. काही गोष्टी या कमी शब्दात सहज कळतात त्यामुळे अशा पद्धतीचे इंटिमेट सीन दाखविण्याची काहीही गरज नाही असंही अनेकांना वाटत आहे. मात्र यावर शिल्पा तुळसकर आणि स्वप्नील जोशीने कोणतीही प्रतिक्रिया अजूनपर्यंत नोंदविलेली नाही. 

Leave a Comment