मधुमेही रूग्णांसाठी पोहे वा इडली काय आहे योग्य पर्याय

आजकाल आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आपल्या शारीरिक काळजीसाठी व्यवस्थित जेवण करू शकत नाही. अनेकदा धावपळीमुळे घाईघाईत नाश्ता करणे विसरायला होते अथवा जेवणाकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो. अशावेळी अनेक जण पटकन आणि सोपा तयार होणारा नाश्त्याचा पर्याय शोधतात. पोहे, उपमा असे पर्याय मग उपलब्ध असतात. पोहे (Poha) हे तुमच्या आरोग्यासाठी केवळ चांगलेच नाहीत तर मधुमेही रूग्णांसाठी तर वरदान आहेत. आपल्या हृदयाला निरोगी ठेवण्यासाठीही पोह्यांची मदत मिळते. पोहे ग्लुटन फ्री (Gluten Free) असून फॅट फ्रीदेखील आहेत. तर काही जणांना नाश्त्यात इडली (Idli) खायला आवडते. पण या दोन्हीच्या पोषक तत्वाबाबत बोलायचे झाले तर मधुमेही व्यक्तीसाठी नक्की कोणता पदार्थ योग्य आहे याबाबत जाणून घेऊया. 

इडली की पोहे काय आहे अधिक चांगले?

सौजन्य – freepik.com

सकाळी नाश्त्यामध्ये पोहे खाणे हा चांगला पर्याय आहे. पोह्यांमध्ये साधारणतः 70% चांगले कार्बोहायड्रेट आणि 30% फॅट असते. यामध्ये असणारे फायबर हे हळूहळू रक्तात साखर पाठविण्याचे काम करते, जे अचानक वाढणाऱ्या साखरेपासून वाचवते. तसंच पोहे खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही. त्यामुळे तुम्ही दिवसभराची भूक भागवायचा विचार करत असाल तर तांदूळ, उडदाची इडली वा डोसा खाण्यापेक्षा पोहे (Poha or Idli for Healthy Breakfast) खाणं अधिक फायदेशीर ठरते. कारण हे खाल्ल्यामुळे तुम्हाला एक स्वस्थ आणि चांगला खुराक मिळतो.

पोहे आणि इडली या दोन्हीमध्ये प्रोबायोटिक्ससह विटामिन बी भरपूर प्रमाणात असते. पण सफेद तांदळाच्या तुलनेत पोह्यात लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. पोह्यात इडलीच्या तुलनेत ग्लासेमिक इंडेक्स अधिक असते. पोहे तुम्ही कच्चे वा शिजवून कशाही पद्धतीने खाऊ शकता आणि त्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होत नाही. 

पचनसाठी उत्तम ठरतात पोहे 

सौजन्य – freepik.com

पोहे हे पोटासाठी हलके असून लवकर पचतात, त्यामुळे सकाळी वा संध्याकाळी नाश्ता म्हणून तुम्ही पोहे खाऊ शकता. पोह्यामुळे कधीही तुमचे पोट सुजले आहे असे कारण समोर येणार नाही. तसंच पोहे खाल्ल्यास लवकर भूक लागत नाही आणि पोह्यामध्ये कॅलरीदेखील कमी असते. यामध्ये आवश्यक विटामिन, खनिज आणि अँटिऑक्सिडंट्स दिसून येते. पोह्यात कडीपत्त्याची फोडणी असल्याने हृदयासाठीही चांगले ठरते. तसंच यात शेंगदाणे मिसळल्यास, नाश्त्यातील कॅलरीचे प्रमाण वाढते. अँटिऑक्सिडंट आणि प्रोटीनचे एक चांगला स्रोत म्हणून पोह्यांकडे पाहिले जाते. त्यामुळे तुम्ही डाएट करत असाल अथवा तुम्हाला मधुमेह असेल तर इडलीपेक्षा पोहे हा चांगला पर्याय आहे. 

आरोग्यासाठो पोहे चांगले (Poha is good for health)

पोहे प्रोबायटिक समजण्यात येते. जसे जसे हे पोटात जातात, चांगल्या बॅक्टेरियाला राखून आतडीचे आरोग्य राखतात. पोह्यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असून ज्या व्यक्तींना लोहाची कमतरता आहे, त्यांनी नियमित खायला हवेत. पोह्यामध्ये जिंक, लोह आणि पोटॅशियम अशी अनेक खनिजे आहेत. जिंक हे प्रतिकारशक्ती (Immunity Power) आणि मेटाबॉलिजम (Metabolism) साठी मदत करते. तुमच्या वाढीसाठी लोहाची गरज आहे आणि पोटॅशियम फ्लूइड संतुलन राखण्यास मदत करते. 

पोहे खाण्याची पद्धत 

पोहे एक असा पदार्थ आहे जो तुम्ही कोणत्याही पद्धतीने खाऊ शकता. 

  • भाजी मिक्स करून आणि फोडणी देऊन हेल्दी पद्धतीने खा
  •  याचा स्वाद वाढविण्याासाठी यात लिंबू, खोबरं, शेंगदाणे घालू शकता  
  • दुधात गूळ अथवा साखर मिक्स करून त्यात पोहे घालून खाऊ शकता
  • पोह्यात दही मिक्स करून लाल मिरचीची फोडणी देऊन खाऊ शकता 
  • पोह्याचा पराठादेखील बनवता येतो 
  • पोह्याचा चिवडा बनवून खाता येतो 

तुम्हाला जर मधुमेहाचा त्रास असेल आणि साखर नियंत्रणात ठेवायची असेल तर तुम्ही नक्की पोह्याचा वापर करून घ्या. इडलीपेक्षा पोहे हे आरोग्यासाठी अधिक चांगले ठरतात. त्यामुळे तुम्ही याचा नक्कीच उपयोग करून घेऊ शकता. 

या बेकिंग टिप्स वापरा आणि राहा निरोगी

बाजारातून ताजा आणि योग्य हिरवा पालक कसा निवडाल, योग्य ट्रिक

काही केल्या मोदक (Ukdicha Modak) जमत नाहीत… ट्राय करा या ट्रिक्स

Leave a Comment