ओव्हरफिडिंगने बाळांचे नुकसान होतंय, कसे कळेल

बेबी केअर (Baby Care) अर्थात बाळांची काळजी घेण्यासाठी नेहमी डोळ्यात तेल घालून राहावं लागतं. उदाहरणार्थ, बाळांना वेळोवेळी खाणे भरवणे हे अत्यंत आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाळाला योग्य वेळी दूध देणे हे यामध्ये समाविष्ट आहे. तुम्ही जर तुमच्या बाळाला ओव्हरफिडिंग (Over Feeding) करत असाल तर मात्र बाळाला यापासून नुकसान होऊ शकते. इतकंच नाही तर बाळामध्ये होणारे बदल याचे संकेतही देत असते. उदाहरणार्थ, ओव्हरफीड केल्यास अर्थात बाळाला अधिक अन्न भरवल्यास, बाळ बरेचदा उलटी करते. त्यामुळे बाळाला नक्की ओव्हरफिडिंग केल्यास कसे नुकसान होते हे जर तुम्हाला कळत नसेल तर जाणून घ्या. 

ओव्हरफिडिंगचे संकेत 

सौजन्य – Freepik.com

जेव्हा तुमचे बाळ प्रमाणापेक्षा अधिक अन्न आपल्या शरीरात घेते तेव्हा काही संकेत तुम्हाला दिसून येतात. त्याबाबत अधिक जाणून घ्या – 

 • गॅसीनेस (Gassiness) अथवा सतत ढेकर येणे 
 • सतत अन्न थुंकणे 
 • दूध प्यायल्यानंतर उलटी होणे
 • दूध प्यायल्यानंतर उलटीसारखे होणे, सतत चिडचिड करणे

काही मुलं या पद्धतीचे संकेत नेहमीच देत असतात. विशेषतः नवजात बालक जन्मल्यानंतर साधारण तीन चार महिने असे संकेत देतेच. ही सुरूवातीच्या काळात अत्यंत सामाईक समस्या आहे. लक्षात घ्या की, तुम्ही बाळांना दूध पाजल्यानंतर अथवा अन्न दिल्यानंतर त्यांच्याकडून ढेकर काढून घ्या. 

ओव्हरफिडिंगचे कारण (Reason Of Over Feeding)

सौजन्य – Freepik.com

बरेचदा मुलांना ओव्हरफीड होत नाही. मात्र काही स्थितीमध्ये ही परिस्थिती उद्भवू शकते. ज्यामुळे मुलांना शरीरात जास्त अन्न जाते. 

 • बाळ जेव्हा रडतं अथवा झोपेतून जागे होते तेव्हा प्रत्येक आईला आपलं बाळ भुकेमुळे जागे झाले आहे असंच वाटतं. अशावेळी मुलांना शांत करण्यासाठी दूध पाजलं जातं. अर्थात बऱ्याचदा लहान बाळं ही भूक लागल्यानंतरच रडतात. पण प्रत्येकवेळी हेच कारण असू शकतं असं नाही. त्यामुळे बाळाचे संकेत ओळखण्याचा प्रयत्न करा 
 • बरेचदा पालक आपल्या बाळाची तुलना दुसऱ्याच्या बाळांशी करतात आणि त्यामुळे त्याच्या आहारात आणि फिडिंगमधअये बदल करून आधीपासूनच त्याला अधिक अन्न खायला घालतात. त्यामुळे मुलांना ओव्हरफिडिंग करण्यात येते
 • काही मुलांचे पालक त्यांना बाटलीमधूनही दूध देतात आणि हे ओव्हरफिडिंगचे मुख्य कारण आहे. वास्तविक जेव्हा मूलं बाटलीने दूध पितात, तेव्हा त्यावर पालकांचे वा मुलांचेही नियंत्रण नसते. त्यामुळे बऱ्याचदा ओव्हरफीड होते. बरेचदा अधिक मोठी बाटली विकत घेतली जाते आणि इतकं पूर्ण बाटलीभर दूध बाळांना देण्यात येतं ज्याची अजिबात गरज नसते 
 • बऱ्याचदा बाळ दूध नको असेल तर तोंड फिरवते अथवा निप्पल चावत बसून त्याचे संकेत देते. पण काही पालक अशा परिस्थितीतही बाळाला जबरदस्ती दूध पाजण्याचा प्रयत्न करताना दिसतात
 • काही पालक वेळेच्या आधीच बाळांना सॉलिड फूड (Solid Food) सुरू करतात. किमान सहा महिने तरी बाळाला अन्न देऊ नये याची काळजी घ्यावी. अन्न दिल्यानंतर बाळ आपल्या शरीराच्या गरजेपेक्षा अधिक अन्न खाण्याचीही शक्यता असते. त्यामुळे ओव्हरफिडिंगची मुलांनाही सवय होते 

ओव्हरफिडिंगपासून वाचण्याचे उपाय (Over Feeding Remedies)

आपल्या बाळाने ओव्हरफिडिंग करू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर काही सोपे उपाय तुम्ही करू शकता. कारण तुमचे बाळ ओव्हरफिडिंग होत असल्याचे संकेत देत असते.ते ओळखून तुम्ही यावर उपाय करू शकता. 

 • बाटली वा स्तनांपासून बाळ तोंड फिरवते. तेव्हा त्वरीत दूध देणे थांबवावे 
 • दूध तोंडातून बाहेर काढून टाकले अथवा थुंकल्यास, लगेच बाटली काढून घेणे 
 • स्तनपान करत असताना बाळ उदासीन असेल तर त्वरीत स्तनपान थांबवावे 
 • स्तनपान करताना बाळ झोपल्यास, अजिबात त्याला स्तनपान करू देऊ नये 
 • तुमचे बाळ हे स्तन नुसतेच चोखत असेल तर त्याला स्तनपान करू नये. त्याला दूध पिण्याची इच्छा नाही आणि ओव्हरफीड होत आहे हे समजून त्वरीत त्याचे तोंड दूर करावे 

Leave a Comment