तुमचीही मुलं विनाकारण खातात असं वाटतं का

लहान मुलं अगदी योग्य खात असतील तर कोणत्या पालकांना आवडणार नाही. आपल्या मुलांनी कोणतीही कटकट न करता खाणे हे कोणत्याही पालकांना आवडणार असे होणार नाही. पण हल्लीच्या मुलांची शरीरयष्टी पाहता 10 पैकी 8 जण तरी स्थुल असतात. यामागे कारण असते ते म्हणजे त्यांचे अति खाणे. खूप लहान मुल मॉलमध्ये पाहिल्यानंतर ते जितकं घरी खात नाही त्या तुलनेत अधिक बाहेर खातात. अर्थात यामध्ये जंक फूडचा समावेश असतो. त्यामुळे ते चवीला अधिक चांगलं लागतं. पण तुमच्या मुलांचे वाढते शरीर पाहता तुम्हालाही असे वाटते का की तुमची मुलं विनाकारण जास्तीचे खातायत का? मग तुम्हाला या गोष्टी माहीत हव्यात 

मखाणा (Makhana) खाण्याचे हे फायदे करतील आश्चर्यचकित

मुलांचे वजन तपासा

प्रत्येक वयोगटातील मुलांसाठी वजनाचा एक तक्ता डॉक्टरांकडे दिसतो. वय, उंची या नुसार वजन असणे अपेक्षित असते. खूप जणांना मुलं गुटगुटीत दिसली की, ती छान दिसतात असे वाटते. पण असे करताना तुम्ही तुमच्या मुलांना वजनाच्या काटावर उभे करुन त्यांचे वजन पाहा. जर त्यांच्या उंचीनुसार त्यांचे वजन हे खूप जास्त असेल तर वजन कमी करण्यासाठी त्यांचा आहार योग्य आणि प्रमाणात असेल याची काळजी घ्या. 

घरातील वातावरणाचा परिणाम

 बरेचदा मुलं अति खाण्यामध्ये घरातील वातावरणाचा खूप मोठा वाटा असते. अनेकदा घरातील वातावरण बिनसलेले असेल तर त्याचा परिणाम हा घरातील लहान मुलांवर होत असतो. अनेकदा असे दिसून आले आहे की, ज्यांच्या घरात अस्थिर असे वातावरण असेल तर अशावेळी मुलांना भावना व्यक्त करता येत नसेल तर त्यांचे खाणे अचानक वाढते. लहान मुलांच्या बाबतीतच नाही तर मोठ्यांच्या बाबतीतही तसेच आहे तणावाचे पर्यवसान खूप जण खाण्यात करतात. जर घरात असे वातावरण असे तर ते निवळण्याचा प्रयत्न करा.

जंकफूडची सवय

सौजन्य: Instagram

खूप पालक लहान मुलांना सतत बाहेरचे खाऊ घालतात. बाहेरचे खाण्यात काहीही वाईट नाही. पण लहान मुलांना घरच्या वरणभातापेक्षा बाहेर मिळणाऱ्या चटपटीत गोष्टी या अधिक आवडू लागतात. ज्या पदार्थांमध्ये मीठ अधिक असते.  फ्राईज, बर्गर, कोक असे पदार्थ मुलांना अधिक आवडतात. त्यामुळे त्यांना आपसुकच याची सवय लागते. त्यामुळे त्यांना इतर वेळी भूक लागत नसली तरी देखील त्यांना असे काही पदार्थ दिसले की, त्यांची भूक चाळवते यात काही शंका नाही. तुम्ही मुलांचे एकदा निरिक्षण करा जर ते घरी कमी पण बाहेर गेल्यावर जास्त प्रमाणात खात असतील तर त्यांना बाहेरचे खाणे जास्त खाऊ घालण्याचा हा परिणाम आहे.

सवय मोडा

 मुलांची अति खाण्याची सवय तुमच्या लक्षात आली असेल तर ती योग्य वेळी मोडणं हे केव्हाही चांगले असते. मुलांना लागलेली ही सवय मोडण्यासाठी त्यांना आवश्यक असलेला पोर्शन साईज द्या. त्यांना सकाळचा नाश्ता वेळेवर द्या. पोटभरीचा नाश्ता असेल तर मुलांना तशी जास्त भूक लागत नाही. शिवाय त्यांना काही दिवस बाहेरचे खायला देऊ नका. त्यांना जास्तीत जास्त गोष्टी घरात बनवून देण्याची सवय लावा. त्यामुळे नक्कीच त्यांच्या खाण्याच्या सवयीत थोडासा फरक पडेल. 

आता तुमची मुलंही अति खाऊ लागली असतील तर त्यांच्याकडे नक्कीच थोडं लक्ष द्या.

गर्भधारणेत अडचणी येणाऱ्या महिलांकरिता फॉलिक्युलर स्टडीचे महत्त्व

Leave a Comment