प्रेक्षकांना नाही भावला महेश मांजरेकरांचा ‘सत्या’ मावळा, होत आहे ट्रोल

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Daudale Sat) या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. अक्षय कुमारला (Akshay Kumar) छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत (Chhatrapati Shivaji Maharaj) महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी निवडल्यानंतर तर प्रेक्षकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट काढून त्यांच्या इतिहासाची तोडमोड करून का दाखविण्यात येते? असा सवालही अनेकांनी विचारायला सुरूवात केली आहे. सध्या शिवरायांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या अनेक मावळ्यांच्या घटनांवर अनेक चित्रपट येत आहे. नुकताच ‘हर हर महादेव’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला आणि आता ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा झाली आहे. पण यावर सगळ्यात जास्त ट्रोल होत आहे तो म्हणजे सत्या मांजरेकर (Satya Manjrekar).

कोण आहे सत्या मांजरेकर (Who is Satya Manjrekar)

या चित्रपटाची घोषणा केली तेव्हा अनेक कलाकारांनी मावळ्याच्या वेशभूषेत कार्यक्रमात प्रवेश केला होता. मात्र त्यात लक्ष वेधून घेतले ते सत्या मांजरेकर याने. सत्या मांजरेकर हा महेश मांजरेकरांचा मुलगा असून तो देखील या चित्रपटात मावळ्याच्या भूमिकेत आहे. मात्र त्याला पाहिल्यानंतर मावळा असा असतो का? अशा टीकेला आता सामोरे जावे लागते आहे. तसंच सत्याने अनेक चॅनेल आणि वेबला मुलाखती दिल्या आहेत. त्यामध्ये त्याला मराठीही धड बोलता येत नसल्याने तो अधिकच ट्रोल झाला आहे. महेश मांजरेकरचा मुलगा असूनही त्याचे मराठी इतके घाण कसे असू शकते यावर आता कमेंट्स येऊ लागल्या आहेत. तर अनेकांनी त्याच्या दिसण्यावर आणि बोलण्यावरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे. केवळ महेश मांजरेकरचा मुलगा आहे म्हणून त्याला या चित्रपटात स्थान देण्यात आले आहे का? असाही प्रश्न आता सोशल मीडियावर विचारण्यात येत आहे. आता तर संभाजी ब्रिगेडनेही (Sambhaji Brigade) चित्रपटाबाबत नाराजी व्यक्त केली असल्याचे दिसून येत आहे. 

https://dazzlemarathi.com/jitendra-joshi-praises-to-vikas-sawant-in-bigg-boss-marathi-season4-in-marathi/

बिग बॉसची टीमही सामील

केवळ सत्याच नाही तर ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi Season 3) सीझन तीनमधील विशाल निकम (Vishal Nikam), जय दुधाणे (Jay Dudhane) आणि उत्कर्ष शिंदे (Dr. Utkarsh Shinde) हे कलाकारदेखील या चित्रपटात मावळे म्हणून झळकणार आहेत. या तिघांनाही नक्कीच आनंद झाला आहे. तर त्यांच्या चाहत्यांनाही आनंद झाला आहे. याशिवाय हार्दिक जोशीही या चित्रपटात दिसणार आहे. पण या ऐतिहासिक चित्रपटात या सर्व कलाकारांची गर्दी नक्की का आहे आणि कोणत्या कलाकाराला किती अभिनय दाखवता येणार आहे याबाबतही आता सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे. तसंच या सर्व कलाकारांमध्ये सत्या मांजरेकर नक्की कसा काय टिकून राहणार असाही प्रश्न विचारला जात आहे. 

सत्या मांजरेकर गेली अनेक वर्षे चित्रपटसृष्टीत काम करत आहे. मात्र मराठीत त्याने कधीही काम केलेले नाही. पहिल्यांदाच मराठी चित्रपटात येणार असला तरीही त्याची मुलाखत पाहिल्यानंतर मात्र त्याच्या अभिनयावर आतापासूनच प्रेक्षकांनी शंका घ्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे नक्की हा चित्रपट कसा घडणार याकडेच आता प्रेक्षकांचे लक्ष आहे. 

Leave a Comment