10 लाख पेक्षा जास्त ट्विट ट्रेंड झालेला शिव ठाकरे बिग बॉस 16 च्या इतिहासातला पहिला स्पर्धक

आपला माणूस “शिव ठाकरे” (Shiv Thakare) सध्या बिग बॉस 16 (Bigg Boss 16)  मध्ये खूप जबरदस्त खेळतो आहे आणि ज्या पद्धतीने शिव बिग बॉसच्या घरात सध्या वावरत आहे, प्रेक्षकांनीसुद्धा शिवला आपली पसंती दर्शवली आहे. तऱ्हेतऱ्हेच्या लोकांनी गजबजलेल्या या घरात, शिव आपली वेगळी आणि चांगली ओळख निर्माण करतो आहे तर घरा बाहेर शिवच्या चाहत्यांनी शिवनेच जिंकावं यासाठी चंग बांधला आहे.

24 तासात 10 लाखापेक्षा अधिक ट्विट्स 

 शिव प्रत्येकवेळी बोलतो की “मी आज जे काही आहे ते माझ्या फॅन्स मुळे, ते ज्या पद्धतीने मला जीव लावतात, ते फक्त फॅन्स नसून माझी फॅमिली आहेत” आणि याचा प्रत्यय आज प्रत्येकाला आला. सामन्यातून वर आलेल्या आपल्या माणसासाठी, त्याच्या समर्थकांनी ट्विटरला हादरवून सोडले आणि बिग बॉस 16 मधील शिव ठाकरे हा पहिला स्पर्धक ठरला ज्याच्यासाठी 10 लाखापेक्षा जास्त ट्विट (Tweets) मागील 24 तासात झाले. त्याच्या सर्व चाहत्यांनी इन्स्टाग्रामवर ‘शेरदिल शिव ठाकरे’ (Sherdil Shiv Thakare) ट्रेंड केला ज्याने प्रियांका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhury) आणि इतर सर्व स्पर्धकांचा रेकॉर्ड तोडून, इन्स्टाग्रामवर 1 मिलियनचा (1 Million) आकडा पार केला.

सलमानकडूनही प्रशंसा 

यात शंका नाही की, शिव हा एकमेव स्पर्धक आहे ज्याला प्रेक्षकांकडून आणि स्वतः सलमान खानकडून (Salman Khan) देखील प्रशंसा मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी, त्याचा जुना व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता ज्यामध्ये सलमान बिग बॉस मराठीमध्ये त्याच्या खेळाबद्दल शिवचे कौतुक करताना दिसला होता. स्टेजवरील त्याच्या परिचयादरम्यानही, सलमानने त्याची ओळख अशी व्यक्ती म्हणून करून दिली जी नेहमी ‘विजय’ म्हणून ओळखली जाते. हा मोठा टप्पा गाठल्याबद्दल त्याच्या सर्व चाहत्यांचे आणि स्वतः ‘मराठी माणूस’ शिवचे अभिनंदन. तर आता बिग बॉस हिंदीची ट्रॉफीदेखील शिवने घरी घेऊन यावी असंच त्याच्या चाहत्यांना वाटत आहे. 

घरातील सदस्यांसाठी टफ 

मराठीतील स्पर्धक हिंदीत टिकत नाहीत असं म्हटलं जातं. मात्र शिवने हे खोटं ठरवलं आहे. हिंदी बिग बॉसमध्ये शिवचाच बोलबाला आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि खेळ योग्य पद्धतीने ओळखून समोरच्याला गप्प करण्याची धमक असल्यामुळे शिव सध्या सर्वांचाच आवडता बनला आहे. केवळ प्रेक्षकच नाहीत तर अगदी सेलिब्रिटीदेखील शिवच्या प्रेमात असलेले दिसून येत आहे. शेखर सुमन, सलमान खान, उर्वशी ढोलकिया, इशान खट्टर, रणविजय सिंघा या सर्वांनीच शिवच्या खेळाचे कौतुक केले असून शिव या ट्रॉफीचा खरा दावेदार असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. घरात सर्वांना पुरून उरणारा असा हा खेळाडू आहे. 

Leave a Comment