Bigg Boss 16: शालिन – टीनाही बाथरूममध्ये एकत्र, यांनाही मिळणार का शब्दांचा मार…

बिग बॉस 16 (Bigg Boss 16) मध्ये रोमान्स, ब्रेकअप, भांडणे हे नेहमीच आणि प्रत्येक सीझनमध्ये पाहायला मिळते. गौतम विग आणि सौंदर्या शर्मा (Gautam Singh Vig) आणि सौंदर्या शर्मा (Soundarya Sharma) यांच्यावर गेले आठवडाभर घरातील सदस्य आणि सूत्रसंचालक सलमान खानदेखील तुटून पडले आहेत. विशेषतः दोघेही एकत्र बाथरूममध्ये गेल्यामुळे हा विषय खूपच चघळण्यात आला. मात्र आता घरातील दुसरी जोडी जी प्रेमात असल्याचे मान्य करत नाही आणि गौतम – सौंदर्या यांना फेक ठरवून मोकळे झाले आहेत. स्वतः मात्र तेच करत असल्याचे दिसून येत आहे आणि ते म्हणजे शालिन भानौत (Shalin Bhanot) आणि टीना दत्ता (Tina Dutta).  शालिनने दुसऱ्या आठवड्यातच आपल्या मनातील गोष्टी बोलून दाखवल्या आहेत मात्र टीनाने आपल्याकडून असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण ही जोडीदेखील बाथरूममध्ये एकत्र गेली होती. त्यामुळे यांनादेखील शब्दांचा मार मिळणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

काय आहे पूर्ण मामला

मागच्या भागात टीना आणि शालीन यांना एकत्र बाथरूममध्ये जाताना दाखविण्यात आले होते. विकेंड का वार च्या भागात दोघांनाही मध्यरात्री बाथरूममध्ये जाताना पाहण्यात आले आहे, त्यानंतर अर्चना गौतमने (Archana Gautam) या गोष्टीचा बोलबाला केलेला दिसून आला. शालिन आणि टीनाला एकत्र जाताना पाहून अर्चनाने सौंदर्याला म्हटले की, ‘आता बिग बॉसना हे दिसत नाही का, दोघेही आत बाथरूममध्ये आहेत. सगळ्या शो ची बदनामी करून ठेवली आहे. लोक बघत असतील आणि म्हणत असतील की, बिग बॉसमध्ये तर बाथरूममध्येच सर्वकाही चालते’

अर्चना गौतमने उडवली टीना – शालिनची खिल्ली 

हे सर्व झाल्यावर अर्चना इथेच थांबली नाही, तर तिने पुढे म्हटले की, ‘आता जर मी म्हटलं की तुमच्या दोघांचंही चालू आहे, तर म्हणतील नाही आम्ही फ्रेंड्स आहोत. कोणते फ्रेंड्स असे मुलगा – मुलगी बाथरूममध्ये जातात?’ याआधी या प्रकरणावरून सौंदर्या आणि गौतम दोघांनाही बिग बॉस, करण जोहर (Karan Johar) आणि सलमान खान या तिघांकडून ऐकून घ्यावं लागलं आहे. दिवाळीच्या आठवड्यात करण जोहरने हा मुद्दा उचलून धरला होता. त्यामुळे आता सलमान खान (Salman Khan) हा मुद्दा उचलणार का? शालिन आणि टीनाला शब्दांचा मार आज खावा लागणार का याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर गौतम आणि सौंदर्याला या गोष्टीसाठी खूप सहन करावे लागले होते आणि टीना आणि शालिननेही त्या दोघांना चांगलेच फटकारले होते. मग असे असताना स्वतःही तेच करत असल्याचा दुटप्पीपणा प्रेक्षकांच्या लक्षात आला आहे. आपले ते प्रेम आणि दुसऱ्याचा तो खोटेपणा असा दुटप्पीपणा कसा असू शकतो अशा चर्चेला आता सुरूवात झाली आहे. आजच्या भागामध्ये नक्की काय होणार याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 

Leave a Comment